Maharashtra News LIVE Update | ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होणार नाही : नाना पटोले

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होणार नाही : नाना पटोले
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 05 Sep 2021 21:02 PM (IST)

  ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होणार नाही : नाना पटोले

  महाविकास आघाडीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव घातला आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. यावर बोलतांना नाना पटोले म्हणाले की, जो संविधानिक अधिकार ज्या समाजाचा आहे तो त्याला मिळायला पाहिजे आणि महाविकास आघाडी सरकारने सुद्धा तोच प्रयत्न केला आहे. ओबीसींचं आरक्षण कमी करण्यात भाजपचा सिंहाचा वाटा आहे. आजही भाजप ओबीसींना आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न करत आहे.

 • 05 Sep 2021 18:41 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 229 नवे कोरोनाबाधित, 278 जणांना डिस्चार्ज

  पुणे :
  दिवसभरात २२९ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
  – दिवसभरात २७८ रुग्णांना डिस्चार्ज.
  – पुण्यात करोनाबाधीत ०८ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०४.
  – २०८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९६७७२.
  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २२५८.
  – एकूण मृत्यू -८९४९.
  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८५५६५.
  – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७९८७.

 • 05 Sep 2021 17:56 PM (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजू शेट्टींना बैठकीचे निमंत्रण, उद्या 3 वाजता वर्षा बंगल्यावर बैठक होणार

  राजू शेट्टींच्या आंदोलनाची राज्य सरकारडून दखल, नृसिंहवाडी इथं इचलकरंजीचे प्रांताधिकारी ड्रॉ. विकास खरात पोहोचले, खरात यांच्या हातात सरकारच्या आश्वासनाचं पत्र

  राजू शेट्टी यांच्या भाषणातील मुद्दे :

  प्रयाग चिखली इथं दत्त महाराजांना ताकद दे अस साकडं घातलं आणि चालत इथे आलो

  माणसाने निसर्गाचे लचके तोडले आता निर्सग त्याच काम करत आहे

  पूर्वी एक दोन दिवसात पूर येऊन जायचा आता 15 दिवस पूर जात नाहीत

  याला भराव टाकलेले पूल कारणीभूत

  राज्याकडे पैसे नाहीत म्हणतात मग मंत्र्यांची दालन कशी सजली आहेत जाऊन पहा

  मंत्र्यांना गाड्या घ्यायला पैसे आहेत मग पुरग्रस्तांना द्यायला पैसे कसे नाहीत

  काल पर्यंत साधा तलाठी भेटायला आला नाही

  मी मेलोय की जगलोय ते ही पाहिलं नाही

  पण आज आंदोलनाचा अंदाज आल्यावर धावपळ सुरू झाली

  पुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संघर्ष करावा लागेल

  महाराष्ट्रातील अनेक नेते राज्याच्या अस्मितेच्या गप्पा मारत असतात .मग आता काय झालं?

  मुख्यमंत्र्यानी केंद्राकडून होणाऱ्या अन्यायवर आवाज उठवावा. आम्ही तुमच्यासोबत येऊ

  केंद्रान आपत्ती निवारण निधी मधून राज्याला भरघोस निधी द्यावा

  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारचं चांगलं पटतं

  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करण्यासाठीच राणे शिवसेना वाद काढला

  आमचं आंदोलन सुरू झाल्यावरच मुख्यमंत्र्यांना बारा आमदारांबाबत राज्यपालांना भेटायला वेळ मिळाला

  मुख्यमंत्र्यांचे बैठकीचे निमंत्रण

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजू शेट्टींना बैठकीचे निमंत्रण

  उद्या 3 वाजता वर्षा बंगल्यावर बैठक होणार

 • 05 Sep 2021 17:34 PM (IST)

  सत्तेत आल्यानंतर महिलांच्या सबलीकरणाची व्याख्या बदलते का? चित्रा वाघ यांचा सवाल

  चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया :

  – सत्तेत आल्यानंतर महिलांच्या सबलीकरणाची व्याख्या बदलते का ? विरोधात असताना घसा कोरडा होईपर्यंत महिला सबलीकरणावर बोलायचे ते कुठे गेलेत, सुप्रिया सुळेंना टोला

  – आत्ताची राष्ट्रवादी साहेबाची राष्ट्रवादि नाही, असंच दिसतंय,

  – करुणा मुंडे यांना आज बोलू द्यायला पाहिजे होते,

  – मला असं काही वाटत नाही भाजपामध्ये सम्मान मिळत नाही, मी भाजपमध्ये काम करतोय, मला सम्मान मिळतोय, मला माहित नाही मंदा म्हात्रे यांना कसा सम्मान अपेक्षित आहे ? भारती पवार यांना केंद्रीय मंत्री केले

  सरपंच गौरी गायकवाड यांची प्रतिक्रिया :

  – राष्ट्रवादीकडून मला त्रास दिला जातो,

  – ग्रामपंचायतीमध्ये काम करताना मला त्रास दिला जातो,

  – लसीकरणावरून राष्ट्रवादीकडून माझ्यावर दबाव आहे,

  – मात्र उद्यापासून मी पुन्हा ग्रामपंचायतीचे जोमाने काम करणार,

  – रुपाली चाकणकर यांनीही विचारपूस केली नाही

 • 05 Sep 2021 16:17 PM (IST)

  स्वाभिमानीचं पंचगंगा नदीत जलसमाधी आंदोलन, पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल

  कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची परिक्रमा यात्रा, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याचं जलसमाधी आंदोलन, स्वाभिमानीचं पंचगंगा नदीत जलसमाधी आंदोलन, पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल, काही कार्यकर्ते नदी पात्रात पोहोचण्यात यशस्वी

 • 05 Sep 2021 16:07 PM (IST)

  राजू शेट्टी यांची परिक्रमा यात्रा थोड्याच वेळात नृसिहवाडीत दाखल होणार

  कोल्हापूर :

  राजू शेट्टी यांची परिक्रमा यात्रा थोड्याच वेळात नृसिहवाडीत दाखल होणार

  करुंदवाडकडून नृसिंहवाडी कडे जाणाऱ्या पुलावर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त

  नदीमध्ये रेस्क्यू फोर्सची ही गस्त

 • 05 Sep 2021 16:04 PM (IST)

  केडीएमसी निवडणुकीत काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीचाही स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा

  कल्याण : केडीएमसी निवडणूकीसाठी राष्ट्रवादीची प्रभाग स्तरावर तयारी सुरु झाली आहे. काँग्रेस नंतर आत्ता राष्ट्रवादीने सुद्धा स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिला आहे. याबाबतची भूमिका जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी स्पष्ट केली आहे. आमची भूमीका स्वबळाची आहे. त्या धारे प्रभागातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु आहे. पुढचा निर्णय पश्रश्रेष्ठी घेतील, असे शिंदे यांनी सांगितले आहे.

 • 05 Sep 2021 15:38 PM (IST)

  भाजप नेत्या चित्रा वाघ कदमवाक वस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांची भेट घेणार

  पुणे :

  – भाजप नेत्या चित्रा वाघ घेणार कदमवाक वस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांची भेट,

  – गौरी गायकवाड यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाण,

  – लसीकरणाच्या वादावरून झाली मारहाण,

  – या घटनेनंतर राष्ट्रवादीवर टीका झाली होती,

  – राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता सुजित काळभोरला गुन्हा दाखल,

  – थोड्याच वेळात चित्रा वाघ दाखल होणार

 • 05 Sep 2021 13:24 PM (IST)

  देशाला महासत्ता बनवायचं असेल तर विद्यार्थी घडविणं आवश्यक : नितीन गडकरी

  What is the need to scrap old vehicles and trucks Nitin Gadkari tell detail reason

  नितीन गडकरी, केंद्रीय परिवहन मंत्री

  नितीन गडकरी म्हणाले, “शिक्षणातून मानवाचं जीवन बदलत असतं. देशाला महासत्ता बनवायचं असेल तर त्यासाठी विद्यार्थी घडविणे आवश्यक आहे. शिक्षक, पालक, मॅनेजमेंट, विद्यार्थी हा एक परिवार आहे आणि या परिवारात ऐक्य असेल तर चांगले विद्यार्थी घडतील. त्याचा देशाला फायदा होईल. आपल्या देशातील परिवार पद्धती ही संस्कारी आहे. पाश्चात्य देशात ते पाहायला मिळत नाही. सुशिक्षित असणं आणि सुसंस्कृत असणं यात मोठं फरक आहे. त्यामुळे सुशिक्षित बनत असताना सुसंस्कृत बनणं महत्वाचं आहे. 100 टक्के परिपूर्ण कोणीच असू शकत नाही. कितीही चांगला माणूस असला, तरी त्यात काही न काही गुणदोष असतात. गुणदोष कमी करणं सातत्यानं करण्याची गरज आहे.”

 • 05 Sep 2021 13:20 PM (IST)

  शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडतो; राऊतांचं चंद्रकांतदादांना ओपन चॅलेंज

 • 05 Sep 2021 13:18 PM (IST)

  मुख्यमंत्र्यांकडून टास्कफोर्ससह राज्यभरातील डॉक्टरांशी संवाद

  ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्ससह राज्यभरातील डॉक्टरांशी कोविडची संभाव्य तिसरी लाट, उपाययोजना आणि राज्याची सज्जता याविषयी संवाद साधताना.

 • 05 Sep 2021 13:08 PM (IST)

  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते “माझा डॉक्टर” या ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाकडून आयोजित “माझा डॉक्टर” या ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन केले.

 • 05 Sep 2021 12:05 PM (IST)

  सरकार आपलं असूनही गुन्हे दाखल होत असतील तर गंभीर, शरद पवारांशी बोलेन : संजय राऊत

  sanjay-raut

  sanjay-raut

  संजय राऊत म्हणाले, “कालपासून जुन्नर मंचर चाकण शिक्रापूर संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या बाबतीत जल्लोषाचं वातावरण दिसतंय. हे अनेक वर्षांपासून इथं वातावरण आहे. पाण्याच्या प्रश्नावर लढणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. जर सरकार आपलं असूनही गुन्हे दाखल होत असतील तर गंभीर आहे. तो विषय बघितला आहे. मी या विषयावर शरद पवार आणि दिलीप वळसे यांच्याशी बोलेन.”

 • 05 Sep 2021 11:36 AM (IST)

  Tokyo Paralympics 2020: स्टार पॅराबॅडमिंटनपटू सुहास यथिराज यांना रौप्य पदक, चुरशीच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक थोडक्यात हुकलं

 • 05 Sep 2021 11:35 AM (IST)

  जालन्यातील अंबड तालुक्यात मध्यरात्री मुसळधार, गल्हाटी नदीला मोठा पूर

 • 05 Sep 2021 11:34 AM (IST)

  दुकाने चालवा, पैसे कमवा, बरं चाललंय सरकारचं, सरकारलाच आता निवडणुका नकोय; राज ठाकरेंचा हल्लाबोल

 • 05 Sep 2021 10:59 AM (IST)

  एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षेला 40 टक्के विद्यार्थी गैरहजर

  एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षेला 40 टक्के विद्यार्थी गैरहजर, कोरोनामुळे तब्बल 6 वेळा परीक्षा पुढे ढकलली, एमपीएससीची विविध पदांसाठीची संयुक्त पूर्व परीक्षा शनिवारी राज्यभरात पार पडली, मात्र, या परीक्षेसाठी अर्ज केलेल्यांपैकी केवळ 60 टक्के उमेदवारांची उपस्थिती, पुण्यात सर्वाधिक उमेदवारांची नोंदणी, संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पुण्यात सर्वाधिक 42 हजार उमेदवारांची नोंदणी, यापैकी 28 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, जवळपास 14 हजार विद्यार्थी गैरहजर

 • 05 Sep 2021 10:25 AM (IST)

  VIDEO : मुंबई आणि उपनगरात आज मुसळधार पावसाचा इशारा

 • 05 Sep 2021 10:24 AM (IST)

  पडळकरांचं वडेट्टीवारांना पत्र, उद्धव ठाकरे स्टाईल कानपिचक्या, 6 वेळा किंबहुना शब्दाचा प्रयोग

 • 05 Sep 2021 10:24 AM (IST)

  संजय दत्त नागपुरात नितीन गडकरींच्या भेटीला, कारण काय?

 • 05 Sep 2021 10:23 AM (IST)

  आमदाराच्या जशा मर्यादा, तशा अधिकाऱ्यांच्याही मर्यादा ठरलेल्या : जयंत पाटील

 • 05 Sep 2021 09:02 AM (IST)

  कोल्हापूरमध्ये राजू शेट्टी जलसमाधी आंदोलन करणार, नृसिंहवाडीत पोलिसांचा चोख बंदोबस्त

  Raju Shetti

  Raju Shetti

  कोल्हापूरमध्ये राजू शेट्टी यांच्या जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडी इथं पोलिसांचा चोख बंदोबस्त, अनेक ठिकाणी बेरॅकेत लावून नृसिंहवाडीला जाणारे रस्ते बंद, नृसिंहवाडीमध्येही पोलिसांचा मोठा बंदोबस्त, दुपारी साडेतीन वाजता राजू शेट्टी शेकडो कार्यकर्त्यांसह विविध मागण्यांसाठी जल समाधी आंदोलन करणार

 • 05 Sep 2021 08:58 AM (IST)

  हवामान खात्याचा मुंबईसाठी यलो अलर्ट, मुंबई, ठाणे, पालघरला येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा

  हवामान खात्याचा मुंबईसाठी आज (5 सप्टेंबर) यलो अलर्ट, मुंबई, ठाणे, पालघरला येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा, 7 सप्टेंबरला काही ठिकाणी ऑरेंज अलर्टचा इशारा, पुढील 48 तासांमध्ये उत्तर आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यानं महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवसांमध्ये सक्रिय पावसाचा जोर जाणवण्याची शक्यता, जास्त पावसाची अपेक्षा, काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडेल, कोकणातील वेगळ्या ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता

 • 05 Sep 2021 08:16 AM (IST)

  बारामती-जुन्नरमध्ये सर्वाधिक हॉटस्पॉट गावं, एकूण 91 गावांमध्ये कडक उपाययोजनांच्या सूचना

  पुणे जिल्ह्यातील भोर, मावळ, वेल्हा तालुक्यात एकही गाव कोरोना हॉटस्पॉट नाही, मात्र बारामती आणि जून्नर तालूक्यात जिल्ह्यात सर्वाधिक हॉटस्पॉट गावं, एकूण 91 गावं अजूनही कोरोना हॉटस्पॉट, जिल्हा प्रशासनाकडून हॉटस्पॉट गावात कडक उपाययोजना करण्याच्या सूचना, कमी झालेल्या हॉटस्पॉट गावांची संख्या वाढल्यानं प्रशासनाची चिंता वाढली

 • 05 Sep 2021 08:13 AM (IST)

  नागपुरात यंदा कमी पाणी साठा, शेतीला पाणी मिळणार का यावर प्रश्नचिन्ह

  नागपुरात पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाची पातळी मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा अजूनही कमीच, नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातही मागच्या वर्षीपेक्षा कमी साठा, पिण्याच्या पाण्याची गरज पुरवेल एवढा साठा उपलब्ध, मात्र शेतीसाठी पाणी मिळणार का यावर प्रश्नचिन्ह, धरण क्षेत्रात अजूनही चांगल्या पावसाची अपेक्षा

 • 05 Sep 2021 08:11 AM (IST)

  नाशिकमध्ये गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक, गौऱ्या पाठवत मोदी सरकारचा विरोध

  नाशिकमध्ये गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक, पोस्टाने गौऱ्या पाठवत मोदी सरकारचा विरोध, थाळी नाद करत मोदी सरकार विरोधात घोषणा, प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वात आंदोलन

 • 05 Sep 2021 08:10 AM (IST)

  नाशिकमध्ये ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’च्या यशानंतर आणखी एक शक्कल, 2 तास समुपदेशन ऐकावं लागणार

  नाशिकमध्ये नो हेल्मेट, नो पेट्रोलच्या यशानंतर पोलीस आयुक्तांची आणखी एक शक्कल, हेल्मेट वापर वाढवण्यासाठी पोलीस देणार अनोखी शिक्षा, विना हेल्मेट गाडी पकडल्यास ऐकावे लागणार 2 तासांचे समुपदेशन, समुपदेशन ऐकल्याचे सर्टिफिकेट घेतल्यावरच गाडी सोडणार, कारवाईंसाठी पोलिसांनाची 4 पथकं तैनात, पोलीस आयुक्तांच्यावतीने अधिसूचना जारी, सध्या शहरात नो हेल्मेट नो पेट्रोलमुळे 80 टक्के वाहनधारकांच्या डोक्यावर हेल्मेट

 • 05 Sep 2021 08:07 AM (IST)

  जागतिक विद्यापीठ क्रमवारीत राज्यातील 4 शिक्षण संस्थांना स्थान, एकट्या पु्ण्यातील 3 संस्था

  जागतिक विद्यापीठ क्रमवारीत राज्यातील 4 शिक्षण संस्थांना स्थान, या क्रमवारीत 2022 मध्ये राज्यातील 4 उच्च शिक्षण संस्थांनी पहिल्या 4 हजारात स्थान मिळवलं, मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने, आयसर पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ या पुण्यातील 3 संस्थांचा समावेश, टाइम्स हायर एज्युकेशनची जागतिक विद्यापीठ क्रमवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेची, अध्यापन, संशोधन, ज्ञान हस्तांतरण आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन अशा निकषांवर जगभरातील उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यमापन करून क्रमवारी जाहीर करण्यात येते

 • 05 Sep 2021 08:04 AM (IST)

  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याचा दुसरा दिवस, शाखाध्यक्षांशी संवाद साधणार

  Raj Thackeray

  राज ठाकरे, मनसेप्रमुख

  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याचा आजचा (5 सप्टेंबर) दुसरा दिवस, राज ठाकरे शाखाध्यक्षांशी संवाद साधणार, सकाळी 10 वाजता शाखाध्यक्षांच्या मेळाव्याचं आयोजन, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज यांचा पुणे दौरा

 • 05 Sep 2021 07:59 AM (IST)

  सोलापूरमध्ये 4 दिवसात 9 मिमी पाऊस, पिकांना जीवदानासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा

  सोलापूरमध्ये 4 दिवसात 9 मिमी पाऊस, पिकांना जीवदानासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा, खरीप हंगामासाठी ऑगस्ट महिना कोरडा, सोयाबीनसह खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका, खरीप हंगामातील सोयाबीन, तुरीसह इतर पिकांना जीवदान मिळण्यासाठी सप्टेंबर महिन्यात पाऊस अपेक्षित, सप्टेंबर महिन्याची सुरुवात निराशजनक, चार दिवसात फक्त 9 मिमी पाऊस, पावसाचा मोठा खंड पडल्यास रब्बी हंगामातही फटका बसण्याची शक्यता

 • 05 Sep 2021 07:57 AM (IST)

  कोल्हापुरात भूकंपाचे सौम्य धक्के, रात्री 11 वाजून 19 मिनिटांनी 3.9 रिश्टर स्केलचा धक्का

  कोल्हापुरात भूकंपाचे सौम्य धक्के, रात्री 11 वाजून 19 मिनिटांनी 3.9 रिश्टर स्केलचा धक्का बसल्याची भूकंप शास्त्र विभागाच्या वेबसाईटवर माहिती, जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला 18 किलोमीटरवर आणि जमिनीखाली 38 किलोमीटर अंतरावर भूकंप, मात्र जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी धक्के जाणवले नसल्याची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची माहिती, वेबसाईडवरील माहितीची जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून खातरजमा करण्याचं काम सुरू

 • 05 Sep 2021 07:56 AM (IST)

  सोलापुरात भूकंपाचा अतिसौम्य  धक्का जाणवला, धक्क्याच्या केंद्रस्थानी तीव्रता 3.6 रिश्टर स्केल

  सोलापुरात भूकंपाचा अतिसौम्य  धक्का जाणवला, रात्री 11 वाजून 57 मिनिटाला शहराच्या काही भागात भूकंप सदृश्य अतिसौम्य धक्के, सोलापूरच्या दक्षिणेला 185 किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाटकातील बागलकोट परिसर भूगर्भातल्या हालचालीचे मुख्य केंद्र, धक्क्याच्या केंद्रस्थानी तीव्रता 3.6 रिश्टर स्केल

 • 05 Sep 2021 07:54 AM (IST)

  नांदेडमध्ये पावसाचे दोन बळी, ओढ्याला आलेल्या पुरात दोन जण वाहून गेले

  नांदेडमध्ये पावसाचे दोन बळी, ओढ्याला आलेल्या पुरात दोन जण वाहून गेले, मुखेड, भोकर आणि किनवट तालुक्यात जोरदार पाऊस, पावसाने हदगाव-हिमायतनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद.

 • 05 Sep 2021 07:53 AM (IST)

  Mumbai Rains Maharashtra Weather : कोकणातील 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, राज्यात कुठे कुठे पाऊस होणार?

 • 05 Sep 2021 07:52 AM (IST)

  यवतमाळच्या तरुणाचं महिलेच्या नावे चॅटिंग, प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, दिल्लीच्या डॉक्टरची दोन कोटींना फसवणूक

 • 05 Sep 2021 07:52 AM (IST)

  पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

 • 05 Sep 2021 07:51 AM (IST)

  विदर्भात चित्रपटनगरीच्या स्वप्नांना बळ, अभिनेता संजय दत्तकडून रामटेक-खिंडसी भागाची पाहणी

  विदर्भात चित्रपटनगरीसाठी अभिनेता संजय दत्तकडून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह रामटेक-खिंडसी परिसराची पाहणी, अचानक घेतलेल्या या भेटीमुळे विदर्भात चित्रपटनगरी उभारली जाण्याच्या स्वप्नांना बळ, चित्रनगरी उभारण्याचे स्वप्न बऱ्याच काळापासूनचे, मात्र, अद्याप मुहूर्त नाही, त्याच पार्श्वभूमीवर संजय दत्तकडून नागपूर दौरा, शनिवारी (4 सप्टेंबर) गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाची पाहणी

 • 05 Sep 2021 07:49 AM (IST)

  गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला, 2 दिवसात 8 रुग्णांची वाढ

  गोंदिया जिल्हा कोरोनामुक्तीकडे वळत असतानाच गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढ, आज रुग्णांची संख्या 8 वर, जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण, प्रशासनाची डोकेदुखी वाढली, जिल्ह्यात तिसऱ्या लहरीची चाहूल तर नाही ना असे तर्कवितर्क

   

 • 05 Sep 2021 07:42 AM (IST)

  जयंत पाटलांकडून अहमदनगरमध्ये रात्री साडेअकरा वाजता पूल-रस्त्याचं उद्घाटन

  अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात सूप येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते रात्री साडेअकरा वाजता पूल आणि रस्त्याचं उद्घाटन, यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर जयंत पाटलांच भाष्य, निलेश लंके विधानसभेत अतिशय उत्तम काम करत असल्यानं गेल्या काही दिवसात कोणीतरी जाणीवपूर्वक त्यांच्यावर प्रशचिन्ह तयार करत असल्याचा आरोप, काही लोकांना मर्यादा सोडून वागण्याची सवय, मात्र प्रत्येकाने मर्यादित राहून काम करावं, या प्रकरणी योग्य वेळी योग्य निर्णय होईल, असं सूचक वक्तव्य

 • 05 Sep 2021 07:38 AM (IST)

  पारनेरमध्ये निलेश लंकेंनी भर पावसात भाषण करत केक कापला

  अहमदनगरमध्ये कार्यकर्त्यासाठी भर पावसात राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी भाषण केलं. पारनेर तालुक्यातील वाळवणे गावच्या उपसरपंचांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात लंके यांनी हे भाषण केलं. त्यांनी पावसातच भाषण करुन केक कापला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाल.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI