Maharashtra News LIVE Update |

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update |
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 08 Sep 2021 21:04 PM (IST)

  मंबईच्या अंधेरी पूर्व शेर-ए-पंजाबच्या बीएमसी मैदानावर कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची मोठी गर्दी

  मंबईच्या अंधेरी पूर्व शेर-ए-पंजाबच्या बीएमसी मैदानावर कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची मोठी गर्दी

  दरवर्षी गणेश उत्सवापूर्वी, मुंबईतील कोकणवासी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांच्या गावी कोकणात जातात.

  दरवर्षीप्रमाणे या वर्षीही जीवनज्योती प्रतिष्ठानच्या वतीने, अंधेरी पूर्वेतील शेरे-ए-पंजाब येथील भाजप नेते आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांनी 21 बसमध्ये हजारो गणेश भक्तांना हिरवा झेंडा दाखवून कोकणात पाठवले

  या दरम्यान, कोकणातील हजारो रहिवासी त्यांच्या मुलांसह आणि वडिलांसह बीएमसी मैदानावर जमले होते.

 • 08 Sep 2021 19:57 PM (IST)

  गोरेगावमधील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास होणार, मंत्रिमंडळ बैठकीत तीन मोठे निर्णय

  राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :

  एकूण निर्णय-3

  ऊर्जा विभाग

  महानिर्मिती राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार

  187 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी निधी उभारण्यास मंजूरी (निर्णय-1)

  390 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार (निर्णय-2)

  गृहनिर्माण विभाग

  गोरेगावमधील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास होणार

  सर्वसामान्यांसाठी 33 हजार गाळे उपलब्ध होणार

 • 08 Sep 2021 18:49 PM (IST)

  कोरोनाच्या आधी मोदींनी नागरिकत्व कायदा मंजूर करुन घेतला : चंद्रकांत पाटील

  चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया :

  – कोरोनाच्या आधी मोदींनी नागरिकत्व कायदा मंजूर करून घेतला आहे,

  – या कायद्यामुळे मुस्लिम समाजाला भारत सोडावे लागेल, असं वातावरण निर्माण करण्यात आले

  – नागरिक बनण्याचा मार्ग अधिक सोपा केला आहे,

  – शीख समाजाला मोदींना सम्मान करायचा होता मात्र तिकडे जाणं शक्य नाही म्हणून ते आज माझा सत्कार करतात

 • 08 Sep 2021 17:30 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 257 नवे कोरोनाबाधित, 242 जणांची कोरोनावर मात

  पुणे :
  दिवसभरात २५७ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
  – दिवसभरात २४२ रुग्णांना डिस्चार्ज.
  – पुण्यात करोनाबाधीत ०९ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०५.
  – २१२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९७४१२.
  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २१५२.
  – एकूण मृत्यू -८९६२.
  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८६२९८.
  – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १०६९८.

 • 08 Sep 2021 16:34 PM (IST)

  बीड पोलीस करुणा शर्मांच्या मुंबईतल्या घरी दाखल, सर्च ऑपरेशन सुरु

  बीड पोलीस करुणा शर्मांच्या मुंबईतल्या घरी दाखल, पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरु, करुणा शर्मा यांच्या घरात पिस्तूल किंवा काही संशयास्पद वस्तू सापडते का याचा तपास पोलीस घेत आहेत, संबंधित पथक कालपासून मुंबईत, आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सर्च ऑपरेशन जारी

 • 08 Sep 2021 16:31 PM (IST)

  नाशिकमध्ये दगडाच्या बंद खाणीतील तळ्यात एकाच कुटुंबातील तीन मृतदेह आढळल्याने खळबळ

  नाशिक :

  – दगडाच्या बंद खाणीतील तळ्यात एकाच कुटुंबातील ३ मृतदेह आढळल्याने खळबळ

  – नाशिकच्याआ सिद्ध पिंपरी गावातील घटना धक्कादायक घटना

  – खाणीत सापडलेल्या मृतदेहांमध्ये एका पुरुषा सह दोन लहान मुलांचे मृतदेह

  – पित्याने आपल्या दोन मुलांसह बंद खाणीतील तळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय

 • 08 Sep 2021 16:21 PM (IST)

  औरंगाबादमध्ये नदीच्या पाण्यात चक्क विहिरच वाहून गेली

  औरंगाबाद जिल्ह्यातील शिवना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात चक्क नदीच्या काठावरील विहिरच वाहून गेली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गंगापूर तालुक्यातील शिरसगाव इथल्या गोरखनाथ काळे या शेतकऱ्याची ही विहीर वाहून गेली आहे. शिवना नदीला इतका तुफान पूर आला होता की या पुराच्या पाण्यात नदीच्या काठावर असलेली भली मोठी बांधीव विहीर चक्क वाहून गेली आहे. विशेष म्हणजे विहीर वाहून जातनाचा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विहीर वाहून गेल्यामुळे आग पाणी आणि हवा यांच्यापुढे कुणाचं काही चालत नाही हेच स्पष्ट झालंय

 • 08 Sep 2021 16:18 PM (IST)

  राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला

  कोल्हापूर :

  राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला

  तीन नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडला

  धरणातून भोगावती नदीत 2828 क्यूसेक्स विसर्ग सुरू

  शहर आणि परिसरात पावसाची उघडीप, धरण क्षेत्रात देखील पावसाची काहीशी उसंत

 • 08 Sep 2021 15:29 PM (IST)

  शिर्डीत किरकोळ भांडणातून तरुणाची हत्या

  शिर्डी :

  तिन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ भांडणातून तरूणाची हत्या
  वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तरूणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या
  हत्या करणारे दोन्ही आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर
  अजय जगताप ( वय 24 ) असं खून झालेल्या तरूणाचे नाव
  आरोपी अक्षय थोरात ( वय 24 वर्ष ) आणि रोहित खरात ( वय 22 वर्ष ) दोघांना अटक
  दोघा आरोपींवर शिर्डी पोलिस ठाण्यात 302 , 34 प्रमाणे गुन्हा दाखल

 • 08 Sep 2021 13:31 PM (IST)

  शिवसेना मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडून अतिवृष्टीची पाहणी

  औरंगाबाद –

  शिवसेना मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडून अतिवृष्टीची पाहणी

  औरंगाबाद आणि पैठण तालुक्यात केली अतिवृष्टीची पाहणी

  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासोबत केली पाहणी

  औरंगाबाद आणि पैठण तालुक्यातील अनेक गावांत अतिवृष्टीची केली पाहणी

  शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची केली पाहणी

  सरकार कडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचं दिलं आश्वासन

 • 08 Sep 2021 13:31 PM (IST)

  नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

  नाशिक – मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

  कारागृह परिसरातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

  कारागृह कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले कैद्याचे प्राण

  दीपक पोकळे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कैद्याचे नाव

  पोकळे याच्यावर राहाता मध्ये मोक्का आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत झाली आहे कारवाई

 • 08 Sep 2021 13:13 PM (IST)

  पालकमंत्री नितीन राऊत यांच्या लॅाकडाऊनच्या संकेतावर नागपुरातील व्यापारी संतप्त

  – पालकमंत्री नितीन राऊत यांच्या लॅाकडाऊनच्या संकेतावर नागपुरातील व्यापारी संतप्त

  – ‘निर्बंध लावले तर व्यापारी पुन्हा रस्त्यावर उतरणार’

  – वाणिज्य बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डिपेन अग्रवाल यांचा इशारा

  – ‘आता निर्बंध लावण्याची वेळ नाही, तर निर्बंध शिथील करण्याची वेळ’

  – पालकमंत्र्यांच्या लॅाकडाऊनच्या संकेताने व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान

  – नितीन राऊत यांच्या भुमिकेला नागपूरातील व्यापाऱ्यांचा विरोध

  – पालकमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे संभ्रमाचं वातावरण

 • 08 Sep 2021 12:43 PM (IST)

  औरंगाबादेत शेतकऱ्यांच्या शेतात घुसले पुराचे पाणी, शेत पिकाचे अतोनात नुकसान

  औरंगाबाद –

  शेतकऱ्यांच्या शेतात घुसले पुराचे पाणी

  शेत पिकाचे झाले अतोनात नुकसान

  शेतकऱ्यांच्या शेतात 4 फुटांपर्यंत साचले पाणी

  शिवना नदीच्या पुराचा शेतकऱ्यांना मोठा फटका

  शेतात मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे शेतकरी हवालदिल

 • 08 Sep 2021 10:51 AM (IST)

  नंदुरबारमध्ये दरड कोसळून घाट बंद, दवाखान्यात पोहोचू न शकलेल्या महिलेचा रस्त्यातच मृत्यू

  नंदुरबार

  – दरड कोसळून घाट बंद झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात पोहोचू न शकलेल्या महिलेचा रस्त्यातच मृत्यू

  – नंदुरबार मधल्या चांदसैली घाटातील घटना

  – कालपासून घाटात दरड कोसळून रस्ता झाला आहे बंद

  – सिदलीबाई पाडवी या महिलेला उपचारासाठी नेले जात होते जिल्हा शासकीय रुग्णालयात

  – रस्ता बंद असल्याने सीधलीबाई पाडवी ला खांद्यावर टाकून पायी निले जात होते दवाखान्यात

  – प्रवासादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्य

 • 08 Sep 2021 10:12 AM (IST)

  एकाच कुटुंबातील तिघांना सर्पदंश, दोन लहान मुलींचा मृत्यू, आई गंभीर

  बीड :

  एकाच कुटुंबातील तिघांना सर्पदंश

  दोन लहान मुलींचा मृत्यू, आई गंभीर

  आईवर अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

  केज तालुक्यातील सोनेसांगवी येथील घटना

  चार वर्षीय स्वप्नाली साखरे आणि तीन वर्षीय स्वीटी या सख्या बहिणींचा मृत्यू

  आई जयश्री साखरे यांच्यावर उपचार सुरू

 • 08 Sep 2021 09:57 AM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक हर्सूल तलाव झाला ओव्हरफ्लो

  औरंगाबाद –

  औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक हर्सूल तलाव झाला ओव्हरफ्लो

  रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे हर्सूल तलाव ओव्हरफलो

  हर्सूल तलावाच्या सांडव्यातून पाणी वाहायला झाली सुरुवात

  हर्सूल तलाव ओव्हरफलो झाल्यामुळे खाम नदीला पूर

  ओव्हरफलो झालेला हर्सूल तलाव पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

 • 08 Sep 2021 09:57 AM (IST)

  वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या कुटंबाकडून सूनेला त्रास?

  वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या कुटंबाकडून सूनेला त्रास?

  तडस कुटुंब मारहाण करत असल्याचा आरोप,

  सूनेनं बनवलेला व्हीडीओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रचपे चाकणकरांनी केला ट्टीट,

  राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संरक्षणासाठी पोहोचल्याची दिली माहिती,

  पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला असल्याची दिली माहिती…

 • 08 Sep 2021 09:38 AM (IST)

  गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी

  रायगड

  गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी

  पावसामुळे रस्त्यावर पडले खड्डे,

  खड्ड्यातून वाट काढत कोकणवासीय गणेशोत्सवासाठी दाखल,

  रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू असल्यानं वाहनांची मोठी अडचण,

  पावसानं सकाळी दिली उघडीप,

  मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे मोठे हाल,

  रस्त्यावरील खड्ड्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनीधी प्रदीप कापसे यांनी

 • 08 Sep 2021 09:37 AM (IST)

  कोल्हापूर शहरातील 16 जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव

  कोल्हापूर शहरातील 16 जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव

  जुना राजवाडा पोलिसांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविलेले प्रस्ताव

  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनाही बजावली नोटीस

  आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी वाद्याचा वापर केल्यास होणार कारवाई

 • 08 Sep 2021 09:36 AM (IST)

  सिल्लोड तालुक्यातील अंजना नदीवरील पूल खचला

  औरंगाबाद –

  सिल्लोड तालुक्यातील अंजना नदीवरील पूल खचला

  सिल्लोड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूल खचला

  अंजना नदीलाही आला तुफान पूर

  सिल्लोड तालुक्यातील पळशी, उपळी, दीडगाव, भराडी या गावांचा तुटला संपर्क

 • 08 Sep 2021 07:21 AM (IST)

  गणेश मंडळांनी परवानगीचे पत्र दर्शनी भागावर लावण्याचे आदेश

  नाशिक – गणेश मंडळांनी परवानगीचे पत्र दर्शनी भागावर लावण्याचे आदेश

  नियम मोडणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई साठी दोन स्वतंत्र पथक तयार

  मंडपांमुळे वाहतुकीस अडथळा झाल्यास जागेवरच होणार दंड

  जिल्ह्याधिकाऱ्यांकडून गणेश मंडळांवर कारवाईसाठी दोन पथकांना पूर्ण अधिकार

 • 08 Sep 2021 07:19 AM (IST)

  जिल्ह्यात 75 हजार शेतकऱ्यांनी मोबाईलद्वारे केली ई पीक नोंदणी

  सोलापूर –

  जिल्ह्यात 75 हजार शेतकऱ्यांनी मोबाईलद्वारे केली ई पीक नोंदणी

  राज्य शासनाने मोबाईलद्वारे ई-पीक नोंदणीस मंजुरी दिल्यानंतर राज्यभर इ- पीक नोंदणीस सुरुवात

  पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक 8750 शेतकऱ्यांनी केली नोंदणी

 • 08 Sep 2021 07:19 AM (IST)

  नागपुरातील लॅाकडाऊनवरुन काँग्रेसच्या दोन मंत्र्यांची वेगवेगळी मतं

  – नागपुरातील लॅाकडाऊनवरुन काँग्रेसच्या दोन मंत्र्यांची वेगवेगळी मतं

  – नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले निर्बंध लावण्याचे संकेत

  – राऊतांच्या भुमिकेशी मंत्री विजय वडेट्टीवार असहमत

  – ‘कुठल्याही शहरात लॅाकडाऊन लावण्याचं सध्या नियोजन नाही’

  – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केली भुमिका

  – रुग्ण वाढत असल्याने पालकमंत्री राऊत यांनी नागपुरात निर्बंध लावण्याचे संकेत दिले होते

  – नागपुरात लॅाकडाऊन लागणार की नाही याबाबत अस्पष्टता

 • 08 Sep 2021 07:17 AM (IST)

  नॅकच्या परिक्षेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अव्वल

  नॅकच्या परिक्षेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अव्वल

  – नॅक कडून नागपूर विद्यापीठाला मिळाला ‘अ’ दर्जा

  – सलग दुसऱ्यांदा नागपुर विद्यापीठाला मिळाला ‘अ’ दर्जा

  – वाढत्या रिक्त जागा, कोरोनाच्या समस्यांवर मात करत विद्यापीठाने मिळवला ‘अ’ दर्जा

  – नॅक समितीने २ ते ४ सप्टेंबर केली होती विद्यापीठाची पाहणी

 • 08 Sep 2021 06:40 AM (IST)

  धर्मादाय आयुक्तालयाकडे नोंद असलेल्या खासगी रुग्णालयांनी शासकीय योजनांचे लाभ रुग्णांना देणे बंधनकारक

  पुणे

  धर्मादाय आयुक्तालयाकडे नोंद असलेल्या खासगी रुग्णालयांनी शासकीय योजनांचे लाभ रुग्णांना देणे बंधनकारक

  पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित जिल्ह्य़ात धर्मादायकडे नोंद असलेली ५५ पेक्षा जास्त रुग्णालये

  रुग्णांना शासकीय लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा इशारा

 • 08 Sep 2021 06:39 AM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यात रात्रभर कोसळला मुसळधार पाऊस

  औरंगाबाद –

  औरंगाबाद जिल्ह्यात रात्रभर कोसळला मुसळधार पाऊस

  मुसळधार पावसामुळे उडाला हाहाकार

  अनेक ठिकाणी रस्त्यावर झाले पाणीच पाणी

  तर अनेक बाजारपेठा आणि वस्त्यांमध्येही घुसले पाणी

  अनेक नदी नाले आणि ओढ्यांना आले पाणी

  औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र झाले पाणीच पाणी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI