Maharashtra News Live Update : प्रभाग रचनेच्या निर्णयाविरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रीम कोर्टात धाव घेणार

| Updated on: Aug 07, 2022 | 7:52 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : प्रभाग रचनेच्या निर्णयाविरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रीम कोर्टात धाव घेणार
मोठी बातमी

आज दिनांक 7 ऑगस्ट आपण जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. या दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून, कालपासून  विविध भागात पावसाला सुरुवात झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जुलैमध्ये जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नदी, नाल्यांना आलेल्या पुरांमळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं हजारो हक्टरवरील पिके पाण्याखाली गेली अनेकांना आपलं घर सोडावं लागलं. तर पावसाळ्यात होणाऱ्या अपघातामुळे अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. मात्र आता पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. राज्यात एडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Aug 2022 06:10 PM (IST)

    इगतपुरीत दोन दिवसानंतर आज मुसळधार पावसाला झाली सुरवात

    विजांच्या कडकडाटासह इगतपुरीसह तालुक्यात काही भागात मुसळधार पावसाला सुरवात

    हवामान खात्याने सुद्धा वर्तविला होता पावसाचा अंदाज

    गेल्या एक तासापासून जोरदार हवेसह पावसाचा तडाखा कायम

    पावसाच्या लहरीपणामुळे बळीराजा चिंताग्रस्त

  • 07 Aug 2022 05:39 PM (IST)

    प्रभाग रचनेच्या निर्णयाविरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रीम कोर्टात धाव घेणार

    पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उद्या सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार,

    – प्रभाग रचनेचा निर्णय रद्द करून निवडणुका वेळेत घेण्यात याव्यात, राष्ट्रवादीची मागणी,

    – शिवाय निर्णय बदलल्यामुळे एक हजार कोटींचा खर्च शिंदे फडणवीस यांच्याकडून वसूल करण्याची प्रशांत जगतापांची मागणी

  • 07 Aug 2022 05:08 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

    नीती आयोगाच्या बैठकीत जनहिताच्या निर्णयावर चर्चा झाली. कृषी विभागात बदल घडवण्यावर चर्चा केली. पडिक जमीन बागायती शेतीत कशी रुपांतरीत होईल याकडे लक्ष देत आहोत. चार लाख हेक्टरवर पडीक जमीन बागायती करण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून प्रयत्न सुरू आहे. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. ऑर्गेनिक शेती, नैसर्गिक शेतीकडे लोकांचा ओढा कसा वाढेल यावरही चर्चा करण्यात आली तेलाची निर्मिती आपल्या देशात झाली तर एक लाख कोटीचं तेल आयात करावं लागणार नाही. बळीराजा सुखी झाला पाहिजे त्यावर चर्चा झाली.

    २०१५चे एमआयडीसचे नियम कायम आहे. किंमती वाढल्या पण नियम कायम आहे. त्याच्या मानदंडावर पुनर्विचार करण्याची सूचना केली आहे जलयुक्त शिवाराचा डाळी , कडधान्यासाठी फायदा झाला. जलयुक्त शिवार योजना उपयुक्त ठरणारी आहे. त्याला प्रोत्साहन दिलं जाणार आहे

    शिक्षणावरही आपण काम करत आहोत. शिक्षकांचं योगदान आहे. आमचे गुरुजी ही संकल्पना शाळेत राबवणार आहोत. जे शिक्षक शिकवतात त्यांचे फोटे शाळेत लावणार आहोत. एक शिक्षक शाळा असता कामा नये. यावर चर्चा झाली. शाळाचं डिजिटलायझेशन करण्यावर चर्चा झाली. शिक्षणाचं अपग्रेडेशन करण्यावरही चर्चा केली. राष्ट्रीय शिक्षण धोरणावर चर्चा केली.

  • 07 Aug 2022 04:58 PM (IST)

    मनपकडून रस्त्यांच्या दुरुस्तीकडे डोळेझाक

    नगरसेवकांच्या घरासमोरील रस्त्यांवर पडलेले खड्डे परिसरातील नागरिकांनी स्वखर्चाने बुजवले,

    परभणी शहरात रस्त्यांचे हाल ,

    शहरातील युसूफ कॉलोनी परिसरात नागरिक लोकसहभागातून रस्त्यांची करत आहेत डागडुजी,

  • 07 Aug 2022 04:56 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचा मुक्ताईनगर येथे मेळावा सुरू

    एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे विधान परिषदचे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचा मुक्ताईनगर येथे मेळावा सुरू

    मोठ्या संख्येने जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित

    एकनाथ खडसे आमदार झाल्यावर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा अधिकृत मेळावा

  • 07 Aug 2022 04:56 PM (IST)

    एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर परभणीसह जिल्ह्यात सर्व दूर पाऊस

    साडेतीनच्या सुमारास परभणी शहरात चांगल्या पावसाला सुरुवात,

    जिल्ह्यातील सेलू मानवत पाथरी सह अनेक भागात होत आहे चांगला पाऊस,

    होत असलेला पाऊस पिकांसाठी प्रचंड उपयुक्त मानला जातोय.

  • 07 Aug 2022 02:53 PM (IST)

    हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पुरामुळे 8 गावांचा संपर्क तुटला

    हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर

    पुरामुळे सेनगाव तालुक्यातील वटकळीसह सात ते आठ गावांचा संपर्क तुटला

  • 07 Aug 2022 02:36 PM (IST)

    उद्या शिंदे गट, शिवसेना निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करणार?

    उद्या शिंदे गट, शिवसेनेला निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करावे लागणार?

    कोर्टाच्या आदेशानुसार शिवसेना वकिलांमार्फत निवडणूक आयोगाची प्रक्रीया पार पडणार

    8 तारखेपर्यंत पुरावे सादर करा असे निवडणूक आयोगाचे आदेश

    मात्र सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित, कोणताही मोठा निर्णय घेऊ नका कोर्टाचे आयोगाला आदेश

    शिवसेना वकिलांमार्फत उद्या निवडणूक आयोगाला पुरावे सादर करण्याची शक्यता

    टीव्ही 9 मराठीला विश्वसनीय सुत्रांची माहिती

  • 07 Aug 2022 02:29 PM (IST)

    मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांविरोधात काँग्रेसचे आंदोलन; आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

    मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांविरोधात काँग्रेसचे आंदोलन

    खड्ड्यांमध्ये गवत लावून केले आंदोलन

    काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून महामार्ग प्रशासनाचा निषेध

    वालीव पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

  • 07 Aug 2022 02:07 PM (IST)

    नांदेडचे शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडेंचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा, उद्या शिंदे गटात सामील होणार!

    एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती काही केल्या कमी होताना दिसत नाहीये, आता नांदेडचे शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आहे. ते उद्या शिवसेनेच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 07 Aug 2022 01:45 PM (IST)

    कराड, पाटण तालुक्यात सर्वदूर मध्यम स्वरुपाचा पाऊस

    कराड पाटण तालुक्यात सर्वदूर मध्यम स्वरुपाचा पाऊस

    मुसळधार पाऊस नसल्याने पिकांना पावसाचा फायदा

    अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर तालुक्यात पाऊस

  • 07 Aug 2022 01:28 PM (IST)

    मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपाचा प्रदेशाध्यक्ष बदलणार?

    मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपाचा प्रदेशाध्यक्ष बदलणार?

    सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी

    खात्रीलायक सुत्रांची माहिती

  • 07 Aug 2022 01:22 PM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पारवा आणि साखरा सर्कलमध्ये अतिवृष्टी

    मेसदा गावातील अनेक घरात शिरले पावसाचे पाणी

    पावसाचा पिकांना मोठा फटका

    तलाठी मंडळ,अधिकारी यांच्याकडून नुकसानीची पाहणी

  • 07 Aug 2022 12:39 PM (IST)

    शिंदे गटाकडून प्रदीप जैस्वाल यांची औरंगाबादच्या महानगरप्रमुखपदी नियुक्ती

    शिंदे गटाने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे. शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबदमध्ये शिवसेनेला हा धक्का बसला आहे. पक्षाविरोधी कारवाईचा ठपका ठेवत शिवसेनेने आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याकडील महानगप्रमुख हे पद काढून घेतले होते. मात्र  पुन्हा एकदा शिंदे गटाने प्रदीप जैस्वाल यांची औरंगाबादच्या महानगप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

  • 07 Aug 2022 12:08 PM (IST)

    आम्ही आता परत कधी ठाकरेंच्या दारात जाणार नाही; दानवेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

    आम्ही आता परत कधी ठाकरेंच्या दारात जाणार नाही

    केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

    आमच्यासोबत यायचं असेल तर या आम्ही नाही म्हणाण नाही - दानवे

    आमच्यासोबत राहा पण सरकारमध्ये अडथळा आणू नका - दानवे

    राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नाही आणि शत्रूही नाही - दानवे

    25 वर्ष आम्ही युती केली त्यांना वाटलं आपलं नुकसान झालंय त्यामुळे त्यांनी साथ सोडली

    आम्ही आता नवीन मित्र जोडले, एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच मुळची शिवसेना - दानवे

  • 07 Aug 2022 11:51 AM (IST)

    पारोळा तालुक्यात दमदार पावसामुळे बोरी नदीला पूर

    जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून दमदार पाऊस झाल्याने बोरी मध्यम प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने बोरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बोरी नदीला पूर आला असून, प्रशासनाच्या वतीने बोरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पारोळा तालुक्यातील करंजी गावात 78 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.  मुसळधार पावसामुळे गावातील 44 घरांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

  • 07 Aug 2022 11:40 AM (IST)

    रावसाहेब दानवे लाईव्ह

    रावसाहेब दानवे लाईव्ह

  • 07 Aug 2022 11:39 AM (IST)

    वंचित बहुजन आघाडीकडून आरेमध्ये आंदोलनाला सुरुवात, मेट्रो कारशेडला विरोध

    वंचित बहुजन आघाडीकडून आरेमध्ये आंदोलनाला सुरुवात

    वंचितचा मेट्रो कारशेडला विरोध

    शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

    आपकडूनही आरेत आंदोलन

    कार्यकर्त्यांनी बांधली झालाडा राखी

  • 07 Aug 2022 11:04 AM (IST)

    महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची तयारी सुरू, पदाधिकाऱ्यांकडून बैठकांचे सत्र

    आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र

    विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका पार पडणार

    हडपसर विधानसभा मतदारसंघात आज मनसे शहर कोअर कमिटीची बैठक

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानंतर निवडणुकांच्या तयारीला सुरुवात

  • 07 Aug 2022 10:18 AM (IST)

    प्रतीक पवार हल्ला प्रकरण; मिराजगावमध्ये कडकडीत बंद

    कर्जत येथील प्रतीक पवार हल्ल्याप्रकरणी मिराजगाव बंद

    घटनेच्या निषेधार्थ मिराजगावमध्ये कडकडीत बंद

    प्रतीक पवार हल्ल्याप्रकरणात सहा आरोपींना अटक

  • 07 Aug 2022 09:53 AM (IST)

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या मुख्य विश्वस्तपदी योगेश देसाई यांची फेरनिवड

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या मुख्य विश्वस्तपदी योगेश देसाई यांची फेरनिवड

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निर्णय

    ते दोनदा पालखी सोहळा प्रमुख देखील होते

    योगेश देसाई हे पुण्यातील प्रसिद्ध देसाई आंबेवले या पेढीचे मालक आहेत

  • 07 Aug 2022 09:17 AM (IST)

    दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    राजाराम बंधारा यावर्षी दुसऱ्यांदा पाण्याखाली

    धरण क्षेत्रातील दमदार पावसामुळे पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

    सध्या शहर आणि परिसरात पावसाची उघडीप

    धरण क्षेत्रातही पावसाची विश्रांती

    राधानगरी  धरणात 77 टक्के पाणीसाठा

  • 07 Aug 2022 09:01 AM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस

    रत्नागिरी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाच्या कोसळधारा

    रत्नागिरी शहरात तब्बल 12 तासांपासून पावसाची संततधार सुरूच

    किनारपट्टी भागात वेगवान वारे

    हवामान खात्याकडून कोकण विभागाला ऑरेंज अलर्ट

    अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणात मुसळधार पाऊस

    नद्यांच्या पाणीपातळी वाढ

  • 07 Aug 2022 08:58 AM (IST)

    सोलापुरात शोषखड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकलीचा मृृत्यू

    सोलापुरात शोषखड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

    उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव येथील घटना

    राजेश्वरी घोडले असे मृत चिमुकलीचे नाव

    घराशेजारच्या शेतात घेतलेल्या शोषखड्ड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू

    चिमुकलीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ

  • 07 Aug 2022 08:45 AM (IST)

    शिंदे समर्थक खासदार संजय मंडलिक यांच्या घरावरील शिवसेनेचा मोर्चा रद्द

    शिंदे समर्थक खासदार संजय मंडलिक यांच्या घरावरील शिवसेनेचा मोर्चा रद्द

    सोमवारी काढण्यात येणार होता मोर्चा, आता गुरुवारी काढणार मोर्चा

    मोहरममुळे मोर्चाला स्थगिती

    कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोर्चाला स्थगिती

  • 07 Aug 2022 08:21 AM (IST)

    अमित ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा आज दुसरा दिवस, निफाड, मालेगावला देणार भेट

    अमित ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा आज दुसरा दिवस

    अमित ठाकरे आज निफाड, मालेगावला देणार भेट

    मनवीसेच्या अभियानाला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

  • 07 Aug 2022 07:29 AM (IST)

    आमगाव तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांचे छापे, 13 जणांना अटक

    आमगाव तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांचे छापे

    तीन महिलांसह 13 जणांना अटक

    पोलिसांच्या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाब दणाणले

  • 07 Aug 2022 07:12 AM (IST)

    नागपूर महापालिकेच्या प्रभाग रचनेत बदल

    नागपूर महापालिकेच्या प्रभाग रचनेत बदल करण्यात आला असून, तीन सदस्य प्रभाग रचना रद्द करून चार सदस्य प्रभाग रचना केल्याने नागपूर महानगरपालिकीची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या अनेकांना दिलासा मिळाला आहे. तीन सदस्य प्रभाग रचनेत भाजप आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचे वॉर्ड आरक्षित झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा चार वार्डची प्रभाग रचना करण्यात आल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.

  • 07 Aug 2022 06:51 AM (IST)

    धुळे बसस्थानकात बस चालकाची आत्महत्या

    धुळे बसस्थानकात बस चालकाची आत्महत्या

    पुणे - धुळे बसमध्ये घंटी वाजवायच्या दोरीरे घेतला गळफास

    हिरामण देवरे असं या बसचालकाचे नाव

    आत्महत्येच्या प्रकाराने खळबळ

Published On - Aug 07,2022 6:33 AM

Follow us
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.