Maharashtra News Live Update : करुणा शर्मा उद्या रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेत प्रवेश करणार, प्रत्येक बातमीची वेगवान अपडेट

| Updated on: Jan 12, 2022 | 11:22 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या

Maharashtra News Live Update : करुणा शर्मा उद्या रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेत प्रवेश करणार, प्रत्येक बातमीची वेगवान अपडेट

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोमिक्रॉनचे (Omicron) संकटही आणखी गडद होताना दिसतेय. तर दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरणदेखील तापलेले आहे. पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे देशपातळीवरील राजकारण ढवळून निघाले आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, माणिपूर या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. तसेच राज्यात सध्या कडाक्याची थंडी असताना वातावरणात बदल झाला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसाच्या सरी बरसत आहेत. या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.  या सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स फक्त टीव्ही 9 मराठीवर…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Jan 2022 10:47 PM (IST)

    संजय राऊत उद्या सकाळी 9 वाजता मुजफ्फर नगरला निघतील

    संजय राऊत उद्या सकाळी 9 वाजता मुजफ्फर नगरला निघतील

    दुपारी 12 ते 12:30 च्या सुमारास शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्याशी त्यांची भेट नियोजित आहे.

  • 12 Jan 2022 10:25 PM (IST)

    करुणा शर्मा उद्या रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेत प्रवेश करणार

    करुणा शर्मा उद्या रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेत प्रवेश करणार

    – पुण्यातील पत्रकार संघात उद्या संध्याकाळी 6 वाजता प्रवेश सोहळा पार पडणार,

    – प्रवेश सोहळा पार पडल्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन,

    – पत्रकार परिषदेत करुणा शर्मा पुढील भूमिका जाहीर करणार

  • 12 Jan 2022 09:17 PM (IST)

    परबांंचं रिसॉर्ट अधिकृत कधी होणार? मग नार्वेकरांवर अन्याय का?’, किरीट सोमय्यांचा घणाघात

    भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आमदार प्रताप सरनाईकांवरुन पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. “ठाण्यातील विहंग गार्डनचे अनधिकृत बांधकाम करणारे, 114 सदनिका धारकांची फसवणूक करणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक चे गुन्हे माफ करण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला असेल, परंतु महाराष्ट्राला लुटणाऱ्या ठाकरे सरकारला जनता कदापि माफ करणार नाही”, अशा शब्दात सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय. सोमय्या यांनी एक पत्रक काढून ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. “शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी 2008-2009 मध्ये ठाणे विहंग गार्डन येथील 114 सदनिकाधारकांची फसवणूक केली. 5 मजले अनधिकृत बांधले. 2012 मध्ये प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश आहे. गेल्या आठवड्यात लोकायुक्तांच्या समोर झालेल्या सुनावणीत ठाकरे सरकारने मान्य केले की प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यांच्याकडून सगळा दंड आणि व्याज वसूल केले जाणार, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आणि आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की प्रताप सरनाईक आमच्या शिवसेनेचा आमदार आहे, म्हणून त्यांची चोरी, गुन्हे माफ. ठाकरे सरकार हे प्रताप सरनाईक यांना माफ करणार. परंतु महाराष्ट्राची जनता या घोटाळेबाज सरकारला कदापी माफ करणार नाही”, अशा शब्दात सोमय्या यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर टिकास्त्र डागलं.

  • 12 Jan 2022 07:40 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शिक्कामोर्तब

    नववर्षाते स्वागत करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना एक गूड न्यूज दिली, मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांनी बैठक घेत मुंबईकरांसाठी एक मोठा निर्णय जाहीर केला, त्यामुळे लाखो मुंबईकरांना नवीन वर्षाचं एक मोठं गिफ्ट मिळाले. मुंबई महानगरपालिका हद्दीतील पाचशे चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 जानेवारी, 2022 रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेच्या मागणीनुसार 46.45 चौ. मी. (500 चौ. फूट) अथवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या निवासी मालमत्तांना संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याचे जाहीर केले होते.

  • 12 Jan 2022 06:31 PM (IST)

    काल राजीनामा, आज अटकेसाठी वॉरंट! स्वामी प्रसाद मौर्यांविरोधात 'सोची समझी साजीश'?

    आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचं राजकारण मंगळवारपासून जबरदस्त रंगात आलं आहे. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्या स्वामी प्रसाद मौर्यांसोबत (Swami Prasad Mourya) आणखी तिघांनीही आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राजकारण तापलं होतं. अशातच आता काल राजीनामा आणि आज स्वामी प्रसाद मौर्या यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मौर्या यांनी भाजपला (BJP UP) सोडचिट्ठी देत अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या समाजवादी पक्षात सामील होतील, अशीही शक्यता होती. अजून त्यांचा समाजवादी पक्षात प्रवेश झालेला नाही. अशातच आता त्यांच्याविरोधात निघालेल्या अटक वॉरंटनं राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. स्वामी प्रसाद मौर्या यांच्याविरोधात ‘सोची समझी साजीश’ केली जातेय की काय? अशी शंका यानिमित्त घेतली जात आहे. दरम्यान, ज्या प्रकरणी स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे, ते प्रकरण आहे तब्बल आठ वर्ष जुनं!

  • 12 Jan 2022 05:28 PM (IST)

    कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटात  कारचा भीषण अपघात

    कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटात  कारचा भीषण अपघात

    घाटातील वळणावर संरक्षण काठड्या जवळून कार थेट ३०० फूट खोल दरीत

    अपघातात कार चालकाचा मृत्यू

    नेमका अपघात कसा घडला याबाबत नेमकी माहिती मिळाली नाही..

  • 12 Jan 2022 05:06 PM (IST)

    भाजप आमदार अवतार सिंह भडाना यांची भाजपला सोडचिठ्ठी

    भाजप आमदार अवतार सिंह भडाना (Avtar Singh Bhadana) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रीय लोक दलात प्रवेश केलाय. भडाना हे मेरठच्या मीरापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. रालोदने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती देताना, माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते अवतार भडाना आज राष्ट्रीय लोकदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी जयंत सिंह यांच्या उपस्थितीत रालोदमध्ये प्रवेश केला

  • 12 Jan 2022 04:59 PM (IST)

    मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून कळतंय सरकारवर विश्वास नाही-सुप्रिया सुळे

    पाच राज्यात सध्या निवडणुकांचेबिगूल वाजल्याने सर्वांच्या नजरा या पाच राज्यावर लागल्या आहेत, अशावेळी उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींवरून विरोधक भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सध्या उत्तर प्रदेशातील राजकारण देशात चर्चेत आहे. उत्तर प्रदेशमध्ये आता अनेक मंत्री राजीनामा देत आहेत. यावरून स्पष्ट होतं आहे की, लोकांना तेथील सरकारबाबत अविश्वास वाटू लागला आहे. त्यामुळे तिथं अशी हालचाल दिसू लागली आहे. अशी टीका राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेयांनी केली आहे.

  • 12 Jan 2022 03:36 PM (IST)

    भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीला सुरूवात

    भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीला सुरूवात

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी बैठक

    जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि कार्यकारणी सदस्य बैठकीला उपस्थित

    बैठकीला प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार अनुपस्थित

    पत्रकारांना बैठकीचे वृत्तांकन करण्यास मनाई

  • 12 Jan 2022 02:03 PM (IST)

    मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार

    राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील अजेंडा

    दुकानांवर मराठी भाषेत नामफलक सक्तीचा निर्णय

    कोरोनाकाळात स्कूल बस बंद असल्यामुळे व्हेईकल टॅक्स माफी

    पाचशे चौरस फुटांचा घराच्या मालमत्ता कराला मंजुरी

  • 12 Jan 2022 01:28 PM (IST)

    गिरिष महाजन यांना मुंबई हायकोर्टातर्फे देण्यात आलेला दिलासा कायम

    मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते गिरिष महाजन यांना मुंबई हायकोर्टातर्फे देण्यात आलेला दिलासा कायम

    महाजन यांच्याविरोधात पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे संबंधित पोलिसांना निर्देश

    मुंबई हायकोर्टात पुढील सुनावणी 24 जानेवारीला होणार

    पुणे स्थित कोथरूड पोलिसात दाखल आहे प्रकरण

    जळगाव स्थित शिक्षण संस्थे मध्ये वर्चस्वासाठी शुरू लढाईचं प्रकरण

    गिरीष महाजनांच्या सांगण्यावरून धमकावल्याचा याचिकार्त्यांच्या आरोप

  • 12 Jan 2022 01:14 PM (IST)

    नागपुरातील एसटी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी

    नागपूर - नागपुरातील एसटी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी

    - संपकरी कर्मचाऱ्यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केलीय इच्छामरणाची मागणी

    - नागपूरातील वर्धमान नगर आगारातील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले 150 पेक्षा जास्त पत्र

    - ‘संपामुळे परिवार संकटात, मागण्यांवर मुख्यमंत्री काहीच बोलत नाही’

    - मुख्यमंत्र्यांनी भूमिका घ्यावी म्हणून इच्छामरणाची मागणी करणारे लिहिले पत्र

    - विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी ठाम

  • 12 Jan 2022 12:02 PM (IST)

    रत्नागिरी-कोकण रेल्वे मार्गावर जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, वेळापत्रक कोलमडले 

    रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

    गाडी कामथे रेल्वे स्टेशनवर थांबली

    मार्गावरील ट्रेनचे वेळापत्रक कोलमडले

    गोव्याकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बिघाड झाल्यामुळे 1 तासापासून रेल्वे कामथे स्टेशनवर उभी

    इंजिन दुरुस्तीचे काम सुरू.

    तेजस एक्स्प्रेस चिपळूण स्टेशनवर थांबवली.

  • 12 Jan 2022 12:00 PM (IST)

    शाळा सुरू करण्यासाठी सरकारवर दबाव आणू नये, नीलम गोऱ्हेंचे आवाहन

    शाळा सुरू करण्यासाठी सरकारवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव आणू नये

    लहान मुलांच्या शाळा सुरु करण्याचा आग्रह धरू नका

    काही गोष्टी नाईलाजाने सरकारला कराव्या लागल्या

    मुलं बाधित झाली तर त्यांच्या जीवाला त्रास होईल आणखी मुलं बाधित होतील

    आपणही लहान होतो कधीतरी विरोधकांना टोला

    मुलांनी ऑनलाईन अभ्यास केला तर नुकसान होणार नाही

    नीलम गोऱ्हेंचे विरोधक आणि पालक संघटनांना आवाहन

  • 12 Jan 2022 10:28 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तरुणांशी संवाद साधणार

    स्वामी विवेकानंद यांच्या 159 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत

    तसेच मोदी आज युवकांना संबोधित करणार आहेत.

    प्रत्येक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे युवक यामध्ये सामील होणार आहेत.

    11 वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार

  • 12 Jan 2022 10:23 AM (IST)

    फडणवीस गोव्यात गेले अन् भाजप पक्ष फुटला, शिवसेना बहुजनांचा पक्ष- संजय राऊत

    मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत माध्यमांशी संवाद साधत आहेत. गोव्यात शिवसेनेची लढाई लोकांसोबत आहे. गोव्यात शिवसेनेने एका जागेवरचे डिपॉझिट जप्त होऊ नये हे पाहिले पाहिजे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा राऊत यांनी समाचार घेतला आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून तिकडे गेले आहेत. फडणवीस गोव्यात गेल्यानंतर गोव्यात गेल्यानंतर भाजप पक्ष फुटला. काल एक मंत्री यांनी पक्षाचा त्याग केला. भाजपचे आमदार प्रविण झाटे यांनींही पक्ष सोडला. त्यांनी पक्षातील युद्ध जे सुरु आहे, त्याची लढाई करावी. गोव्यात आमची लढाई नोटांशी आहे. भाजपचे लोक गोव्यात महाराष्ट्रात नोटांचा पाऊस पडत आहेत. महाराष्ट्रातून नोटांच्या बॅगा जात आहेत. शिवसेना गोव्यात या नोटांशी नक्की लढली. शिवसेना हा सामान्यांचा, बहुजनांचा, हिंदुत्ववाद्यांचा पक्ष आहे. मी फडणवीस यांना सांगेन की तुम्ही कितीही नोटा टाका. शिवसेना गोव्यात नक्की लढेल.

  • 12 Jan 2022 09:56 AM (IST)

    TET परीक्षा गैरव्यवहार प्रकरण, सुरंजित पाटील आणि स्वप्नील पाटील यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

    TET परीक्षा गैरव्यवहार प्रकरण

    अटकेत असलेल्या सुरंजित पाटील आणि स्वप्नील पाटील यांना न्यायालयीन कोठडी

    सुरजित आणि स्वप्नील यांना पोलिसांनी नाशिक आणि जळगावमधून केली होती अटक

    पुणे न्यायालयाने दिली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

  • 12 Jan 2022 09:36 AM (IST)

    अन्न प्रशासन विभागातील कर्मचारी औषध प्रशासन विभागडे वर्ग करण्याचा निर्णय, औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी निर्णय

    औरंगाबाद : कोरोना काळात औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न औषध प्रशासन विभाग सज्ज

    अन्न प्रशासन विभागातील कर्मचारी औषध प्रशासन विभागडे वर्ग करण्याचा निर्णय

    औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी वाढवले औषध विभागाचे मनुष्यबळ

    अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांची माहिती

    औषधांच्या किमती वाढवणे किंवा काळाबाजार करण्यावर असेल बारीक नजर

  • 12 Jan 2022 09:03 AM (IST)

    वीजबिल भरण्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात थकबाकीचे प्रमाण वाढले

    रत्नागिरी - वीजबिल भरण्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात थकबाकीचे प्रमाण वाढले

    जिल्ह्यातील 1 लाख 9 हजार 845 ग्राहकांकडे 28 कोटी 33 लाखांची थकबाकी

    महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून वीजबिल वसुली मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन

    शिवाय वीजबिले न भरणाऱ्या ग्राहकांवर कारवाईचेही आदेश

  • 12 Jan 2022 09:02 AM (IST)

    पंजाब निवडणुकीत उतरणार केजरीवाल यांचा पक्ष, पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार

    पंजाब : अरविंद केजरीवाल चंदीगडमध्ये दाखल

    पंजाब निवडणुकीत उतरणार केजरीवाल यांचा पक्ष

    पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार

    केजरीवाल यांची विमानतळावर प्रसारमाध्यमांना माहिती

    मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असणार संपूर्ण पंजाबचं लक्ष

    गोव्यासोबतच पंजाबमध्येही आव्हान देणार अरविंद केजरीवाल

  • 12 Jan 2022 08:31 AM (IST)

    बनावट पासपोर्टवर लंडनला जाणार्‍या सात जणांना नवी दिल्लीत अटक

    नवी दिल्ली : बनावट पासपोर्टवर लंडनला जाणार्‍या सात जणांना अटक

    नवी दिल्ली विमानतळावर मोठी कारवाई

    बनावट बोर्डिंग पास तयार करून विमानतळावर पोहोचले होते सात तरुण

    लंडनला जाणाऱ्या विमानात बसून प्रवास करण्याच्या तयारीत होते 7 जण

    शेवटच्या क्षणी चूक लक्षात आल्याने पोलिसांची कारवाई

  • 12 Jan 2022 08:16 AM (IST)

    उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी, दोन दिवसात उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

    नवी दिल्ली : उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी

    येत्या दोन दिवसात उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

    भाजपच्या वरिष्ठ पातळीवर बैठका

    प्रत्येक जागेसाठी भाजप घेणार महत्त्वपूर्ण काळजी

    पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी यादी जाहीर होण्याची शक्यता

  • 12 Jan 2022 07:31 AM (IST)

    मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच, 2 वर्षांत 1660 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या 

    औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच

    मराठवाड्यात 2 वर्षांत 1660 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

    कोरोना महामारी,ओला दुष्काळ, हमीभाव न मिळणे आणि कर्जबाजारीपणा या कारणांमुळे शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

    2020 साली 773 तर 2021 या वर्षी 887 शेतकऱ्यांनी संपवली जीवन यात्रा

    मराठवाड्यातील सर्वात जास्त आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्याचे आले समोर

  • 12 Jan 2022 07:21 AM (IST)

    आणखी 10 दिवस राहणार थंडीचा कडाका, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट

    औरंगाबाद : आणखी 10 दिवस राहणार थंडीचा कडाका आणि गारपिटीचा अंदाज

    मराठवाड्यात आणि विदर्भात गारपिटीचा हवामान खात्याचा अंदाज

    मराठवाडा, विदर्भात 3 दिवस गारपिटीचा हवामान तज्ञांनी वर्तवला अंदाज

    पंजाब, हरियाणा,चंदीगड, दिल्लीसह राजस्थानकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे कडाक्याची थंडी

    राज्यातील इतर भागांत आणि मराठवाड्यात वाढली थंडी

  • 12 Jan 2022 07:20 AM (IST)

    औरंगाबादचे जिल्हाधिकारी नागरिकांना भेटणार आता व्हिडीओ कॉलवर

    औरंगाबाद : औरंगाबादचे जिल्हाधिकारी नागरिकांना भेटणार आता व्हिडीओ कॉलवर

    वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा निर्णय

    भेटीऐवजी व्हिडीओ कॉलवर घेणार नागरिकांच्या भेटी

    दुपारनंतर नागरिकांशी भेटणार व्हिडीओ कॉलवर

    कोरोनाचे कारण देऊन शासकीय कार्यालयात नाकारल्या जातात नागरिकांच्या भेटी

    यावर पर्याय म्हणून व्हिडीओ कॉलवर भेटण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Published On - Jan 12,2022 6:14 AM

Follow us
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.