Maharashtra News Live Update : अजित पवारांच्या दौऱ्यापूर्वी आमचा दौरा झाला- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

| Updated on: Jul 29, 2022 | 8:34 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : अजित पवारांच्या दौऱ्यापूर्वी आमचा दौरा झाला- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मोठी बातमी

आज शुक्रवार दिनांक 29 जुलै 2022 आपण जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या विविध घडामोडी. आज देखील काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. शिवसेनेतून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. तर दुसरीकडे पक्षाविरोधात कारवाया करणाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे. यासोबतच गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा एकदा राज्याच्या काही भागात पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यभरात ढगाळ हवामान असून,  आज पूर्व विदर्भ आणि राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Jul 2022 07:55 PM (IST)

    अजित पवारांची प्रतिक्रिया

    – मी विरोधीपक्ष नेता म्हणून दौरा करतोय, मी हाडाचा शेतकरी आहे

    – अधिवेशन सुरु होईल तेव्हा सांगायला सोपं जातंय

    – मी कधी जावं हा माझा प्रश्न, बाकीच्यांनी नाक खुपसू नये

    – आज मुख्यमंत्री पण म्हटले अजीत दादा उशीरा गेले, मी कधी जायचं मी ठरवेल

    आज सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, हा कधी गेला? हे प्रश्न उपस्थित करुन नये

    – पंचनामे सगळे झाले नाही

    – यवतमाळ जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्र बाधीत झालेय

    – तुम्ही दोघे खंबीर असला तरिही ३६ जिल्ह्यात पालकमंत्री नेमले तर ते तिथे जाऊन आढावा घेऊ शकतात

    – काही कमी पडलं तर इथून थेट मंत्रालयात संपर्क साधता येते

    – हे आम्ही विचारतोय, पण याची उत्तरं देणं सोडून हे बालीशपणासारखं विचारतात हा कधी गेला उशीरा गेला

  • 29 Jul 2022 06:56 PM (IST)

    जोगेश्वरी पूर्व येथे रिक्षावर ट्रक उलटला

    मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथे वाळूचा ट्रक रिक्षावर उलटला.

    या घटनेत रिक्षाचालक जखमी

  • 29 Jul 2022 06:55 PM (IST)

    वसई :-महागड्या सायकल चोरी करणाऱ्या टोळीचा वसईत भांडाफोड

    टोळीतील 4 आरोपीना बेड्या ठोकून, 89 हजार 400 रुपये किमतीच्या 25 सायकल जप्त

    वसई पोलिसांची कामगिरी

    अंश माताप्रसाद जयस्वाल (वय 36), मखंचू रामगोपाल कानोजिया (वय 30), विजयकुमार घनश्याम गुप्ता (वय 33), महेंद्र खिनीलाल सरोज (वय 37) असे अटक केलेल्या आरोपींची नाव

  • 29 Jul 2022 06:02 PM (IST)

    अजित पवारांच्या दौऱ्यापूर्वी आमचा दौरा झाला- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    आम्ही उंटावरुन शेळ्या हाकत नाही - एकनाथ शिंदे अजित पवार दौऱ्यावर थोडे उशिरा पोहचले पूर ओसरल्यावर अजित पवार गेले आम्ही त्यांच्या आधी दौरा केला होता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही

  • 29 Jul 2022 05:48 PM (IST)

    निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिला पाठींबा

    निहार ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे पुतणे आणि हर्षवर्धन पाटील यांचे जावई

    बिंदू माधव ठाकरे यांचे चिरंजीव

    शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करणार राजकीय कारकीर्द सुरु

  • 29 Jul 2022 05:30 PM (IST)

    खोतकर, सत्तार मुंबईत दाखल

    जालन्यात जाऊन भूमिका स्पष्ट करणार

    शिंदे गटात जायचं की नाही ते उद्या ठरवणार-खोतकर

    उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन निर्णय घेणार -

    ३१ जुलैला शिंदे गटात प्रवेश करणार?

  • 29 Jul 2022 05:08 PM (IST)

    आदित्य ठाकरे यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा दुसरा टप्पा

    1-2 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग (सावंतवाडी/कुडाळ), कोल्हापूर (शिरोळ), सातारा (पाटण) आणि पुण्यात कात्रज येथे शिव संवाद यात्रा निघणार

    शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा दुसरा टप्पा येत्या 1 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे . सिंधुदुर्गातल्या कुडाळ, वेंगुर्ला सावंतवाडी आणि कोल्हापूर शहर, शिरोळ ते कात्रज चौक दरम्यान 1 आणि 2 ऑगस्ट रोजी ही 'शिव संवाद' यात्रा निघणार आहे . पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पैठण, शिर्डी अशी यात्रा केल्यानंतर आदित्य एक ऑगस्टला सिधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुण्यात शिव संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याकरीता दौऱ्यावर जाणार आहेत .

    'शिव संवाद' यात्रा टप्पा दुसरा वेळापत्रक

    दिवस पहिला, सोमवार १ ऑगस्ट

    - सकाळी ११:३० वाजता कुडाळ येथे शिवसंवाद यात्रा - दुपारी १२:३० वाजता सावंतवाडी येथे मेळावा - सायंकाळी ०६:३० वाजता कोल्हापूर शहर येथे मेळावा

    दिवस दुसरा, मंगळवार २ ऑगस्ट

    - सकाळी १० वाजता कोल्हापूर येथून शिरोळकडे रवाना होणार - दुपारी १२ वाजता शिरोळ येथे शिव संवाद यात्रा - दुपारी ०३:१५ वाजता पाटण येथे शिव संवाद - सायंकाळी ०६:४५ कात्रज येथे शिव संवाद

  • 29 Jul 2022 05:06 PM (IST)

    चिमुरडीचा सातव्या मजल्यावरुन पडून दुर्दैवी

    वसई:-वसईत एका साढे तीन वर्षाच्या चिमुरडीचा सातव्या मजल्यावरुन पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वसईच्या अग्रवाल टाउनशीप या हाय प्रोफाईल सोसायटीतील रिजन्सी सोसायटीत आज सकाळी 7 वाजता ही घटना घडली आहे. श्रेया महाजन असे मयत झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. सकाळी सात वाजता आई झोपेत चिमुरडीला घरात ठेवून आपल्या दुसऱ्या 7 वर्षाच्या मुलीला शाळेत सोडायला गेली होती. एकटी झोपलेली ही लहानगी उठली. आणि मोबाईल खेळत गॅलरीत आली होती. त्याचवेळी तीच्या हातातील मोबाईल गॅलरीच्या खिडकीतून खाली पडला. मोबाईल पडल्यावर ती बघण्यासाठी गॅलरीच्या गरीलवरून वाकून बघताना तिचा तोल जाऊन ती सोसायटीच्या डक मधील एका ac वर पडली. यात तिच्या मणक्याचे हाड मोडले आणि त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • 29 Jul 2022 05:05 PM (IST)

    राज्य सरकारचा फैसला कधी ?

    सोमवारची सुनावणी पुढे जाणार ?

    मंगळवारी सरकारबाबत सुप्रीम सुनावणी ?

    घटनात्मक खंडपीठासमोर होणार आहे सुनावणी

    1 ऐवजी 2 ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता

    डायरी क्रमांक 19161/2022 केसची सुनावणी

    सरन्यायाधीश एन वी रमन्ना, न्या कृष्ण मुरारी, न्या हिमा कोहली, यांच्यासमोर ही सुनावणी 2 तारखेला होण्याची शक्यता

    3, 5, 7, 11 न्यायाधीशांच खंडपीठ हे घटनात्मक असते

    केस लिस्टेड आहे, मात्र सुनावणी 2 ला होणार , अशी शक्यता

  • 29 Jul 2022 05:04 PM (IST)

    ओबीसी आरक्षणाची सोडत जाहीर

    नवी मुंबई मनपा निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आलीय. एकूण 25 प्रभागात महिला व पुरुषांसाठी ओबीसी आरक्षण आज जाहीर करण्यात आले. प्रभागातील लोकसंख्येच्या तुलनेत २०.५९ टक्के जागा ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मात्र ओबीसी आरक्षण सोडतीला इच्छुक उमेदवारांचा अल्प प्रतिसाद लाभला. सोडत जाहीर होत असलेले विष्णुदास भावे नाट्यगृह संपूर्ण रिकामे पहायला मिळाले. वारंवार निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याने शिंदे गटासह सर्व प्रमुख पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी या आरक्षण सोडतीकडे पाठ फिरवली.

  • 29 Jul 2022 05:03 PM (IST)

    साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची प्रतिक्रिया

    - आजच्या तारखेला 1500 कोटी रुपये शेतकऱ्यांचे देणं आहे,

    - या सगळ्यांचा विचार करून कारवाईची नोटिसा बजवण्यात आल्या आहेत

    - गळीत हंगामापूर्वी हे कारखाने पैसे देतील अन्यथा त्यांना गाळप परवाना देण्यात येणार नाही

    - अजून 20 कारखान्यांना पुढील आठवड्यात सुनावणीसाठी बोलवण्यात येणार आहे,

  • 29 Jul 2022 04:43 PM (IST)

    आरक्षण सोडतीवर अनेक पक्ष घेणार आक्षेप

    गडचिरोली जिल्हा परिषद आरक्षण सोडत निघाली असून या आरक्षण सोडतीवर अनेक पक्ष घेणार आक्षेप

    या आधी गडचिरोली जिल्हा परिषद मध्ये 51 सदस्यांची संख्या होती आता ते वाढवून 57 करण्यात आली

    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहातही आरक्षण सोडत काढण्यात आली

  • 29 Jul 2022 04:42 PM (IST)

    एमआयएम खासदार इम्तियाज जलील दाखवणार मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

    औरंगाबाद शहराचे नाव बदलल्याच्या निषेधार्थ दाखवणार काळे झेंडे

    नामांतर विरोधी सर्वपक्षीय कृती समितीचा काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय

    एमआयएमच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार

    रविवारी एमआयएम दाखवणार मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

    इम्तियाज जलील यांची पत्रकारांशी बोलताना माहिती

  • 29 Jul 2022 04:36 PM (IST)

    राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया

    - मी पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवणार आणि जिंकणार,

    - धर्येशिल माने यांना यापुढच्या काळात लोकच धडा शिकवतील,

    - सध्या सुरू असलेल्या राजकारणाशी माझं काही देणं घेणं नाहीय, मी ना महाविकास आघाडीत ना युतीमध्ये,

    - सध्या राज्यात कृषिमंत्री नाहीय,कृषिमंत्री गुवाहाटीला हवा पालटायला गेले होते, लाज वाटली पाहिजे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कुणीही नाहीय.

  • 29 Jul 2022 04:34 PM (IST)

    कळवणचे आमदार नितीन पवार यांचा विरोध

    मालेगाव जिल्हा निर्मितीच्या मुख्यमंत्री दौरात घोषणा होण्याची शक्यता असल्याने कळवण, पेठ, सुरगाणाचा विरोध...

    मालेगाव जिल्यात समावेश करण्यात येऊ नये अशी मागणी..

  • 29 Jul 2022 04:15 PM (IST)

    विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांचा उद्या हिंगोली जिल्हा दौरा

    पूरग्रस्त भागाची पाहणी व कार्यर्त्यांशी साधणार सवांद

    उद्या दुपारी 3 वाजता अजित पवार यांची वसमत येथे पत्रकार परिषद

  • 29 Jul 2022 04:12 PM (IST)

    अनिल बोंडे यांच मोठं विधान

    केंद्र सरकार आणि राज्य सरकारने रझा अकादमी व पीएफ आय संघटनेवर बंदी आणावी

    या संघटनेचं केंद्र ही अमरावती आणि अचलपूर आहेत

    हे सातत्याने लोकांमध्ये भय निर्माण करण्याचा प्रयत्न करतात

    अमरावतीतील उमेश कोल्हे हत्या प्रकरणात एन आय एन पीएफ आयचे सदस्यांची चौकशी केली आहे

    नवनीत राणा यांना आलेली धमकी गमतीत घेऊ नये

    त्या सातत्याने हिंदुत्वासाठी आवाज उठवतायेत

    विदर्भात शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल

    पंचनामे करण्यात अडचणी येतायेत अजित दादांना जरी विश्वास नसला तरी मदत केली जाईल

    कोणी कोणाच्या हिंदुत्वाशी तुलना करू नये उद्धव ठाकरेंना टोला

  • 29 Jul 2022 04:11 PM (IST)

    रवी राणा यांची प्रतिक्रिया

    - आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे

    आम्हाला महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरून सतत धमक्या येत आहेत.

    नवनीत राण यांनी उमेश कोल्हे हत्येचा मुद्दा उपस्थित केला होता.. तेव्हापासून अनेक धमक्या येत आहेत.

    आम्ही गृहमंत्री शाह आणि ओम बिर्ला यांच्याकडेही तक्रार करणार आहोत.

    - हे पत्र लिफाफ्यात आले आहे... आमच्या घरात सीसीटीव्ही बसवले आहेत.

    हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी धमक्या मिळत आहेत, मग ही गंभीर बाब आहे.

    - आम्ही लोकप्रतिनिधी.. हजारोंच्या गर्दीत काम करतो.. त्या गर्दीत कोण आहे हे सांगणे कठीण आहे.

    - आमच्या घरी दररोज विविध समाजातील सुमारे 500 लोक येतात.

    या धमकीच्या पत्राचा कोल्हे खून प्रकरणाशी संबंध असू शकतो.

  • 29 Jul 2022 04:10 PM (IST)

    पुण्यात हनी ट्रॅपचा प्रकार समोर

    प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीने तरुणाकडून उकळले ६७ लाख रुपये,

    - बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन एका महिलेने तरुणाकडून तब्बल ६७ लाख रुपये उकळले,

    - सोशल मीडियावर झालेली ओळख तरुणावर बेतली

    - चेतन रवींद्र हिंगमारे (रा. कालेपडळ, हडपसर) निखिल उर्फ गौरव म्हेत्रे(२७, गाडीतळ, हडपसर) आणि एक तरूणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे

    - याप्रकरणी अक्षय तांबे यांनी फिर्याद दाखल केली आहे

    - पुण्यातील कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

  • 29 Jul 2022 04:09 PM (IST)

    राणांच्या घराजवळ पोलीस तैनात

    खासदार नवनीत राणा यांच्या घरी आलेल्या निनावी पत्रानंतर पोलीस राणांच्या निवासस्थनी दाखल...

    राजपेठ पोलीस स्टेशनची टीम घरी दाखल..

    तपासणीसाठी सीसीटीव्ही घेणार ताब्यात...

  • 29 Jul 2022 04:09 PM (IST)

    चोरट्यांनी पलायन करताना एका पादचार्‍याला चिरडले

    जबरी चोरी करणार्‍या चोरट्यांनी पलायन करताना एका पादचार्‍याला चिरडले. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.24 तारखेला हा प्रकार घडला आहे. जबरी चोरी करणार्‍या चोरट्यांनी विमानतळ परिसरातून सुमो गाडी चोरली. त्यानंतर वानवडी येथील कृष्णानगर परिसरात चोरट्यांनी एका पादचार्‍याला भरधाव वेगात चिरडले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. हा थरार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. रामेश्वर चमन पंडीत असे त्याचे नाव असून, तो मुळचा झारखंड येथील आहे. दोघा चोरट्यांना गुन्हे शाखेच्या वाहन चोरी व दरोडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. रोहीत वर्मा असे अटक केलेल्याचे नाव आहे. तो रेकॉर्डवरील वाहन चोरटा आहे.

  • 29 Jul 2022 03:12 PM (IST)

    अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार करून एकाची हत्या

    शिवाजीनगर शिवसेना शाखेजवळ काही वेळापूर्वी झाला गोळीबार

    गोळीबाराच्या घटनेत तुषार गुंजाळ या तरुणाचा मृत्यू

    तर गणेश गुंजाळ याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्यानं जखमी

    व्यावसायिक वादातून घटना घडल्याची प्राथमिक माहिती

  • 29 Jul 2022 03:05 PM (IST)

    निवडणुका आल्या तर आम्ही तयार आहोत - शरद पवार

    मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यात कुठे जायचं हा त्यांचा निर्णय - शरद पवार राज्यकर्त्यांनी प्राधान्य सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना द्यायला हवं. -शरद पवार सध्याच्या राज्यकर्त्यांना प्राधान्य वेगळं वाटत असेल - शरद पवार राज्य कशाप्रकारे चाललंय, याकडे आम्ही लक्ष देऊन आहात - शरद पवार निवडणुका आल्या तर आम्ही तयार आहोत- शरद पवार ओबीसी आरक्षणात फार मोठा वर्ग सत्तेच्या आणि प्रशासनाच्या बाहेर जाईल, अशी भीती वाटते आहे.

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सरकार विश्वासाने चालवू शकतो असे वाटते आहे, त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार नाही - पवार

  • 29 Jul 2022 02:22 PM (IST)

    परभणीचे माजी खासदार सुरेश जाधव शिंदे गटात

    परभणी - राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष, माजी खासदार सुरेश जाधव हे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत.  मुंबई येथे शिंदे यांची भेट घेतल्यानंतर  त्यांनी राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदाचा  राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवल्याची माहिती आहे.  सुरेश जाधव 2 वेळा शिवसेनेचे परभणीचे खासदार राहिले आहेत.  शिंदे गटात सामील झालेले जाधव हे परभणीतले पाहिले बडे प्रस्थ मानण्यात येते आहे.

  • 29 Jul 2022 01:53 PM (IST)

    परभणी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष, माजी खासदार सुरेश जाधव शिंदे गटात 

    परभणी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष, माजी खासदार सुरेश जाधव  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात

    मुंबईतील भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष पदाचा दिला राजीनामा

    प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला राजीनामा

    सुरेश जाधव 2 वेळा शिवसेने परभणीचे खासदार राहिले

    शिंदे गटात सामील झालेले होणारे जाधव पाहिले बडप्रस्थ

  • 29 Jul 2022 01:15 PM (IST)

    अब्दुल सत्तार-अर्जुन खोतकर महाराष्ट्रात येण्यासाठी रवाना

    अब्दुल सत्तार-अर्जुन खोतकर महाराष्ट्रात येण्यासाठी रवाना

    नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातून बॅगा घेऊन दोन्ही नेते निघाले

    उद्या माझा निर्णय समजणार अर्जुन खोतकर

    सिल्लोडची सभा जंगी होणार अब्दुल सत्तार यांना विश्वास

    दोन्ही नेते बॅगा घेऊन एकाच गाडीतुन निघाले

  • 29 Jul 2022 12:52 PM (IST)

    कळवण, पेठ, दिंडोरीला स्वतंत्र आदिवासी जिल्हा म्हणून कळवणला मान्यता द्यावी- आमदार नितीन पवार

    कळवण, पेठ, दिंडोरीला स्वतंत्र आदिवासी जिल्हा म्हणून कळवणला मान्यता द्यावी

    आमदार नितीन पवार यांची मागणी

    कळवण, पेठ, दिंडोरी या भागाला कळवण आदिवासी जिल्हा म्हणून मान्यता द्यावी

    कळवण मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांची मागणी

    उद्या मालेगाव जिल्हा निर्मितीची घोषणा होऊ शकते आणि या जिल्ह्यात

    कळवणसह काही आदिवासी भागाचा समावेश होणार असल्याची चर्चा

    या समावेशाला कळवण आमदार नितीन पवार यांचा विरोध

    मालेगाव जिल्हा होण्याआधीच वादाला सुरुवात

  • 29 Jul 2022 11:42 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यात रस्ता नसल्यामुळे तरुणाचा मृत्यु

    औरंगाबाद जिल्ह्यात रस्ता नसल्यामुळे आणखी एका तरुणाचा मृत्यु

    औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या घोडेगावमधील घटना

    विजेचा शॉक लागलेल्या तरुणाचा रुग्णालयात नेताना गाडी चिखलात फसल्यामुळे झाला मृत्यू

    अविनाश राजदेव असं मृत्य झालेल्या 20 वर्षीय तरुणाचे नाव

    गाडी चिखलात फसल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यासाठी झाला उशीर

    रस्ता नसल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे गावकऱ्यांचा संताप

  • 29 Jul 2022 11:24 AM (IST)

    सोलापूरच्या माढा तालुक्यात काल रात्री मुसळधार पाऊस

    सोलापूरच्या माढा तालुक्यात काल रात्री मुसळधार पाऊस

    बार्शीला जाणाऱ्या अनेक गावांचा संपर्क तुटला

    आज सकाळी 6 पासुन अजुनही स्थिती कायम

    तुर्क पिंपरी च्या घोरडा ओढ्याच्या नळ्यात दगडे टाकुन तुर्क पिंपरीच्या एका शेतकऱ्याने पाणी तुंबवले

    ओढ्याचे पाणी पुलावर आल्याने दुचाकी गाड्या वाहुन जाऊ लागल्या

  • 29 Jul 2022 11:21 AM (IST)

    नागपूर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडतीला सुरवात होणार

    नागपूर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडतीला सुरवात होणार

    नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत

  • 29 Jul 2022 10:26 AM (IST)

    आरे मधील वृक्ष तोडीला आव्हान, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

    आरे मधील वृक्ष तोडीला आव्हान, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

    ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी दाखल केली आहे याचिका

    सरन्यायाधीश रमण्णा यांनी डी.वाय.चंद्रचुड यांच्या खंडपीठापुढे वर्ग केली याचिका

    "राज्य सरकार आठवड्याच्या शेवटी आणखी जेसीबी चालवेल; म्हणून, न्यायाधिशांकडे माझी विनंती आहे. कृपया आज या प्रकरण तात्काळ लिस्ट करा,"

    असं गोपाल शंकरनारायणन यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यांच्या  या याचिकेची दखल घेत न्यायालयाने आज सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे.

  • 29 Jul 2022 10:26 AM (IST)

    खासदार श्नीकांत शिंदेंच्या घरी अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर

    खासदार श्नीकांत शिंदेंच्या घरी अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर

    एकत्रित करणार चर्चा

    श्नीकांत शिंदेंच्या घरी ब्रेकफास्टसाठी आलेत

  • 29 Jul 2022 10:21 AM (IST)

    राज्यात सत्तातर होणारच!, माझ्या या विधानावर मी ठाम- संजय राऊत

    संजय राऊतांचा मीडियाशी संवाद, म्हणाले...

    मनोहर जोशी, लीलाधर डाके शिवसेनेसोबतच राहतील

    राज्यात सत्तातर होणारच!, माझ्या या विधानावर मी ठाम

  • 29 Jul 2022 10:10 AM (IST)

    आरेमधील वृक्ष तोडीला आव्हान, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

    आरे मधील वृक्ष तोडीला आव्हान, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

    ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी दाखल केली आहे याचिका

    सरन्यायाधीश रमण्णा यांनी डी.वाय.चंद्रचुड यांच्या खंडपीठापुढे वर्ग केली याचिका

    "राज्य सरकार आठवड्याच्या शेवटी आणखी जेसीबी चालवेल; म्हणून, न्यायाधिशांकडे माझी विनंती आहे. कृपया आज या प्रकरण तात्काळ लिस्ट करा,"

    असं गोपाल शंकरनारायणन यांनी याचिकेत म्हटलं आहे.

    त्यांच्या या याचिकेची दखल घेत न्यायालयाने आज सुनावणी घेण्याचं मान्य केलं आहे.

  • 29 Jul 2022 09:47 AM (IST)

    राजू शेट्टी पुण्यात आज साखर आयुक्तांची भेट घेणार

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आज साखर आयुक्तांची भेट घेणार

    राज्यतील ऊसाच्या थकीत एफआरपीसंदर्भात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची  भेट घेणार

    राजू शेट्टी आज दुपारी 3 वाजता पुण्यात साखर आयुक्तांना भेटणार

    साखर आयुक्तांच्या राज्यातील 7 साखर कारखान्यांना नोटिसा

  • 29 Jul 2022 09:28 AM (IST)

    राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत; 7 साखर कारखान्यांना आयुक्तांची नोटीस

    राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत

    7  साखर कारखान्यांना साखर आयुक्तांची नोटीस

    थकबाकी प्रकरणात आयुक्तांची नोटीस

    धनंजय मुंडे, पंकजा मुंडे , बबनराव पाचपुते, कल्याणराव काळे यांच्या कारखान्यांना नोटीसा

  • 29 Jul 2022 08:52 AM (IST)

    शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आजपासून नाशिक दौऱ्यावर

    दुपारी ओझर विमानतळावर होणार आगमन

    उद्या धुळे येथील एका कार्यक्रमाला देखील शरद पवार लावणार हजेरी

    शरद पवार यांच्या आजच्या दौऱ्याकडे लक्ष

    आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात काही महत्त्वाच्या बैठका होण्याची शक्यता

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज नाशिक दौऱ्यावर

    शिंदे, पवार नाशिकमध्ये भेट होणार का याकडे लक्ष

  • 29 Jul 2022 08:46 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर

    30 आणि 31 जुलै रोजी एकनाथ शिंदे करणार औरंगाबाद दौरा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचे औरंगाबादेत शक्तिप्रदर्शन

    वैजापूर औरंगाबाद आणि सिल्लोड या तीन ठिकाणी होणार शक्तिप्रदर्शन

    शिंदे गटातील आमदारांच्या घरीही एकनाथ शिंदे देणार भेटी

    एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची औरंगाबादेत जय्यत तयारी

    महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व

  • 29 Jul 2022 08:29 AM (IST)

    नाना पटोले गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर; पूर परिस्थितीचा आढावा घेणार

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

    पूर परिस्थितीचा आढावा घेणार

    पुराचा जिल्ह्याला मोठा फटका

    चार्मोशी तालुक्यातील पूरग्रस्त शिवनी गावाला देणार भेट

    सायंकाळी चार वाजता गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी भागाची पहाणी करणार

    गुरुवारी अजित पवारांनी घेतला गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा आढावा

  • 29 Jul 2022 08:13 AM (IST)

    मालेगाव तालुक्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात

    मालेगाव तालुक्यात काही ठिकाणी पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात

    पाऊस सुरूच असल्याने शेतीची कामे खोळंबली

    शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

    सतत पडणाऱ्या पावसाचा पिकांना फटका

  • 29 Jul 2022 07:45 AM (IST)

    नागपुरातून अजित पवार लाईव्ह

    नागपुरातून अजित पवार लाईव्ह

    नुकसानीचे अजूनही पंचनामे झाले नाहीत -अजित पवार

    अजित पवारांचा आज वर्धा, यवतमाळमध्ये पहाणी दौरा

    अजित पवारांच्या विदर्भ दौऱ्याचा आज दुसरा दिवस

    पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेणार

    अतिवृष्टीग्रस्तांकडे शिंदे, फडणवीसांनी लक्ष द्यावं - अजित पवार

  • 29 Jul 2022 07:17 AM (IST)

    चितेला अग्नी देताना भडका उडाल्याने तिघे जखमी

    चितेला अग्नी देताना भडका उडून तिघे भाजले

    नागपूर जिल्ह्यातील कामठीच्या राणी तलाव मोक्षधाममधील घटना

    सरणावरील पेटत्या लाकडाचा उडालेला निखारा डीझलच्या डब्यावर पडल्याने घटना

  • 29 Jul 2022 06:59 AM (IST)

    नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आज ओबीसी आरक्षण सोडत

    नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आज ओबीसी आरक्षण सोडत

    आरक्षण मुळे 79 महिलांना संधी

    2 ऑगस्टपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

    महापालिका निवडणुकीची तयारी सुरू

Published On - Jul 29,2022 6:52 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.