Maharashtra News Live Update : वीज कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने लावला मेस्मा

Maharashtra News Live Update : वीज कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने लावला मेस्मा
बातम्यांच्या सर्वात वेगवान अपडेट
Image Credit source: tv9

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

अजय देशपांडे

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 28, 2022 | 2:36 AM

वसईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईच्या चुळणा परिसरात शनिवारी रात्री सात ते आठच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या एक तरुणाला अडवून सहा ते सात जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या तरुणाला लाथ,बुक्याने आणि दगडाने मारहाण करण्यात आली आहे. तसेच त्याच्या दुचाकीची देखील तोडफोड करण्यात आली आहे. आरोपी दारूच्या नशेत होते, त्यांनी तरुणाकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने या तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीच्या घटनेंत संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे. शशांक शेंदरकर (वय 32) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें