Maharashtra News Live Update : राज ठाकरेंच्या सभेची तारीख ठरली, रविवारी पुन्हा तोफ धडाडणार

Maharashtra News Live Update : महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : राज ठाकरेंच्या सभेची तारीख ठरली, रविवारी पुन्हा तोफ धडाडणार
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्स
Image Credit source: tv9

|

May 21, 2022 | 6:27 AM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 20 May 2022 06:19 AM (IST)

  बारामतीसह परिसरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

  बारामती : बारामतीसह परिसरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

  उकाड्याने हैराण झालेल्या बारामतीकरांना दिलासा..

  शुक्रवारी मध्यरात्री उशिरा पाऊस..

  बारामतीत विजांच्या कडकडाटासह पाऊसाची हजेरी..

  पावसामुळे शहरात अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित..

 • 20 May 2022 06:16 AM (IST)

  सामाना अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल

  सामाना अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल

  2024 चे उत्खनन सुरू ?, असं म्हणत निशाणा

  मंदिर मस्जीद व औरंगजेबच्या थडग्याचे वाद आपल्याकडे कधीच संपनारे नाहीत. कारण राजकीय भाकऱ्या त्याच आगीवर पेटवल्या जात आहेत पण या आगीपेक्षाही पोटाची आग महत्वाची आहे त्या आगीचा वणवा पेटल्यावर काय होते त्याचे पेटते उदाहरण बाजुच्या श्रीलंकेत दिसत आहे महागाई, भूक, आर्थिक आराजकतेतून निर्माण झालेल्या प्रश्नावर धार्मीक मुद्दे विजय मिळवू शकले नाहीत म्हणून मंदिर मस्जीदीचा वणवा पेटवताना सगळ्यांनीच संयम बाळगायला हवा, पण सध्या संयमाचीच ऐशी तैशी सुरू आहे. देशभरात धर्माच्या नावानर जे खड्डे खनले जात आहेत त्या खड्ड्यांत देशाचे पाय आडकू नये एवढीचं अपेक्षा!!!

 • 19 May 2022 07:36 PM (IST)

  परभणी पोलिसांचा वाळू माफियांवर कारवाईचा धडाका सुरूच 

  जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील डाकूपिंप्रीच्या वाळू धक्क्यावरही पोलिसांची मोठी कारवाई ,

  परभणी पोलोसंकडून जिल्ह्यात आतापर्यंत चौथी मोठी कारवाई ,

  आजच्या कारवाईत 3 पोकलेंड, 1 हायवा असा एकूण 1 कोटी 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ,

  दहा जणांविरुध्द पाथरी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  चार ही मोठ्या करवाईतून महसूल प्रशासनाला मात्र पोलीस प्रशासनाकडून लांब ठेवण्यात आल्याने चर्चांना उधाण .

 • 19 May 2022 07:04 PM (IST)

  ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपा आक्रमक

  जळगावात भाजपने केलं रास्ता रोको आंदोलन

  जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत भाजपने ठाकरे सरकारचा नोंदवला निषेध

  ठाकरे सरकारच्या हलगर्जीपणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळालं नसल्याचा आंदोलकांनी केला आरोप

  ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करावेत अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

  ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपने रास्तारोको आंदोलन केल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली

 • 19 May 2022 07:04 PM (IST)

  वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात

  कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात

  अनेक भागातील लाईट गेली

  ढगांच्या जोरदार गडगडाटासह सुटला सोसाट्याचा वारा

 • 19 May 2022 07:03 PM (IST)

  पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंचात होणार राज ठाकरेंची सभा

  मनसेकडून सभेची अधिकत घोषणा

  येत्या रविवारी होणार मनसेची जंगी सभा

  सभागृहात मोठी आसनक्षमता

  बाहेरच्या परिसरातही कार्यकर्ते बसू शकतात

  पार्किंगची व्यवस्थाही या सभागृहाच्या बाहेर आहे

  मनसेनं अखेर सभा जाहीर केलीये

 • 19 May 2022 07:03 PM (IST)

  अज्ञात वाहनांच्या धडकेत भाजी विक्रेत्यांचा मृत्यू 

  परभणीच्या असोला पाटी परिसरातील घटना

  शिवाजी चव्हाण (50) अस मृताच नाव

  दुचाकी वरून भाजी -पाला खरेदी करायला जात असतांना घडला प्रकार

 • 19 May 2022 06:02 PM (IST)

  सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

  उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

  धनंजय गणगे असं सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव

  एका कंपनीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली होती २५ हजारांची लाच

  तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच घेताना धनंजय गणगे यांना ठाणे अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ पकडलं

 • 19 May 2022 06:01 PM (IST)

  -पिंपरी चिंचवड मधील महावितरण कर्मचाऱ्यांला मारहाण

  -पिंपरी मधील खराळवाडी येथील घटना

  -ही मारहाणीचा घटना मोबाईल कॅमरात कैद

  -रामेश्वर वाघमारे असं मारहाण झालेली महावितरण कर्मचाऱ्यांचे नाव

  -मान्सूनपूर्व कामासाठी विजवाहाक ताराना ज्या झाडाच्या फांद्या अडथळा ठरत आहेत त्या तोडण्याचे काम महावितरण चे कर्मचारी करत असताना ही मारहाण झालीय

  -ज्या झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या त्या झाडाची त्या झाडाची देखभाल संबंधित मारहाण करणाऱ्या व्यक्तीने केल्याने त्याला राग अनावर झाला आणि त्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांला काठीने मारहाण केलीय

  -महावितरण कर्मचाऱ्यांला मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

 • 19 May 2022 06:00 PM (IST)

  भाजपचे शिष्टमंडळ जाणार मध्यप्रदेशात

  ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी भाजपचे शिष्टमंडळ जाणार मध्यप्रदेशात

  पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शिष्टमंडळ मध्यप्रदेशात जाणार

  चंद्रशेखर बावनकुळे, योगेश टिळेकर, प्रवीण घुगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा शिष्टमंडळात समावेश

  1 जून रोजी जाणार भाजपचे शिष्टमंडळ

  भाजप आमदार अतुल सावे यांची माहिती

  मध्यप्रदेशातील ओबीसी आरक्षणाचा भाजप शिष्टमंडळ करणार अभ्यास

 • 19 May 2022 05:59 PM (IST)

  भाजप आमदार अतुल सावे यांची मागणी

  मध्यप्रदेशातील ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी मंत्रिगटाला मध्य प्रदेशात पाठवा

  मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करून महाराष्ट्रात अंमलबजावणी करा

  भाजप आमदार अतुल सावे यांनी केली मागणी

  अन्यथा राज्य सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत

  छगन भुजबळ यांच्यासह सर्व ओबीसी मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत

 • 19 May 2022 05:59 PM (IST)

  सांगली शहर परिसरात वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाला जोरदार सुरवात

  जोरदार वादळ वाऱ्यासह अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

  शहर परिसरात उकड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला

  मुसळधार पावसाने अक्षरश झोडपून काढले आहे

 • 19 May 2022 05:58 PM (IST)

  मान्सूनबाबत आनंदाची बातमी

  1 जूनच्या आधीचं मान्सून केरळात दाखल होणार

  27 मे ला केरळात मान्सून दाखल होणार

  तर महाराष्ट्रात 7 ते 8 जूनला सिंधुदुर्ग ,रत्नागिरी दाखल होणार

  13 ते1 4 जूनला मान्सून संपुर्ण महाराष्ट्र व्यापणार

  अंदमानात मान्सून दाखल झाला आहे. 48 पुढील तासात दक्षिण व मध्य बंगालच्या उपसागरात व काही अरबी समुद्रात पोहोचण्याची शक्यता आहे

 • 19 May 2022 05:58 PM (IST)

  नालासोपाऱ्यात वाहतूक पोलिसाच्याच अंगावर घातली रिक्षा

  नालासोपारा पूर्व आचोळा रोडवर आज दुपारी दीडच्या सुमारास घडली घटना

  कारवाही करण्यासाठी पुढे रिक्षासमोर आलेल्या वाहतूक पोलिसांच्या अंगावर रिक्षा घालतानाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

  सदर घटनेने नालासोपाऱ्यात रिक्षाचालकांच्या दादागिरी आली समोर

  अशा मुजोर रिक्षाचालकावर पोलीस कारवाही करून, मुसक्या आवळतील काय हे पाहणे आवश्यक

 • 19 May 2022 05:57 PM (IST)

  नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसने केलं महागाई विरोधात आंदोलन

  महागाई , पेट्रोल ,डीझल दरवाढ विरोधात आंदोलन

  व्हेरायटी चौकातील गांधीजीच्या पुतळ्या जवळ केलं आंदोलन

 • 19 May 2022 04:40 PM (IST)

  श्रीकृष्ण जन्मभूमी-रॉयल ईदगाह वादावर मथुरा कोर्टाचा मोठा निर्णय

  मथुरा कोर्ट कृष्णजन्मभूमी प्रकरणी सुनावणी घेणार

  कोर्टानं याचिका स्वीकारली

  पुरातत्व खात्याकडून सर्वे करण्याची विनंती हिंदू पक्षकाराने केली होती.

  या प्रकरणावर 1 जुलै पासून सुनावणी होणार.

  जिल्हा व सत्र न्यायाधीश राजीव भारती यांनी दिला निकाल

  या प्रकरणात, अधिवक्ता रंजना अग्निहोत्री (ज्या कृष्णाच्या भक्त असल्याचा दावा करतात) यांच्यासह 6 वादी आहेत, हे अपील 2020 मध्ये दाखल करण्यात आले होते, ज्यामध्ये शाही ईदगाहच्या जागेचा मालकी हक्क मिळण्याचा दावा करण्यात आला होता.

 • 19 May 2022 04:18 PM (IST)

  राणा दाम्पत्यांचं महाराष्ट्रात वापसीचा मेगाप्लान तयार

  28 मे 2022 रोजी दुपारी 1 वाजता नागपूर विमानतळावर आगमन आणि जंगी स्वागत होणार..

  दुपारी 1.30 खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे नागपूर येथील रामनगर चौक येथील हनुमान मंदिरात महाआरती करून हनुमान चालीसा पठण करतील.

  दुपारी 2 वाजता अमरावतीकडे प्रयाण.. तिवसा, मोझरी, नांदगाव पेठ याठिकाणी त्यांचं जंगी स्वागत केले जाईल.

  सायंकाळी 5 वाजता अमरावती शहरात आगमन झाल्यावर विविध चौकात जंगी स्वागत झाल्यावर सायंकाळी 7 वाजता दसरा मैदान येथील हनुमान मंदिर येथे महाआरती आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण होणार.

 • 19 May 2022 04:18 PM (IST)

  पिंपरी चिंचवड शहराच्या अनेक भागात सध्या पाण्याची समस्या

  -त्यामुळे महिलांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महिला काँग्रेसने महापालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केलय

  -संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करत शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी महिला काँग्रेसनं के लिये यावेळी आंदोलकांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय

 • 19 May 2022 04:17 PM (IST)

  खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया

  सोमय्या यांनी 1 हजार कोटीचा दावा दाखल करावा, प्रत्येकाला न्यायालयाचा अधिकार आहे

  सोमय्या घोटाळेबाज माणूस आहे, युवक प्रतिष्ठानला मिळालेल्या देणग्या संशयास्पद आहेत

  सोमय्या विकृत माणूस आहे त्यांच्या नादाला लागू नका,

  परब यांचे रिसॉर्ट पाडायला सोमय्या यांनी राष्ट्रपतीना भेटावं किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयात जावं

  सोमय्या यांची मोठी शरम वाहत चालली आहे, तो विकृत माणूस आहे

 • 19 May 2022 02:54 PM (IST)

  सोलापूर : पालकमंत्र्यांवर टीका करताना तृथीयपंथीयाची जीभ घसरली; पालकमंत्र्यांचा भडवा म्हणून केला उल्लेख

  पालकमंत्र्यांवर टीका करताना तृथीयपंथीयाची जीभ घसरली; पालकमंत्र्यांचा भडवा म्हणून केला उल्लेख

  तृतीयपंथीयांनी पालकमंत्र्यांच्या प्रतीकात्मक दगडावर घातला उजनीच्या पाण्याचा अभिषेक

 • 19 May 2022 02:30 PM (IST)

  धुळ्यात बनावट चेसिस नंबर टाकून ट्रक विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

  धुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सर्वात मोठी कामगिरी, बनावट चेसिस नंबर टाकून ट्रक विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

  बनावट चेसिस नंबर टाकून ट्रक विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पर्दाफाश, बारा ट्रकसह दोन आरोपींना अटक..

  1 कोटी 44 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, आरोपींविरोधात गुन्हा दाखल

  अजूनही 27 वाहने टार्गेटवर असल्याची जिल्हा पोलिस अधीक्षकांचे पत्रकार परिषदेत माहिती..

 • 19 May 2022 02:24 PM (IST)

  राज ठाकरेंची सभा केव्हा? पुण्याचा मुहूर्त जवळपास निश्चित

  राज ठाकरे यांची सभा या आठवड्याच्या शेवटी पुण्यात होईल

  मुंबईत पदाधिकारी बैठक सुरु

  आज दुपारी 4 वाजेपर्यंत ही बैठक संपण्याची शक्यता

  सभा कुठे होणार आणि कधी याची राज ठाकरे स्वतः ट्विट करून माहिती देणाचा अंदाज

 • 19 May 2022 02:22 PM (IST)

  संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना दिलासा

  मनसे नेत्यांना मोठा दिलासा

  मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन अर्ज मंंजूर

  अटकपूर्व जामीन कोर्टानं मान्य केला

  संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांना मोठा दिलासा

 • 19 May 2022 01:45 PM (IST)

  नागपुरात मृतदेह आढळल्यानं खळबळ

  नागपूर च्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील बँक कॉलोनी परिसरात मिळाला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

  खाली प्लॉट मधील सुनसान जागेत आढळून आला मृतदेह

  मृतककाचे जवळपास 55 वर्ष वय असून ओळख अजून पटली नाही

  कुठल्यातरी प्राण्याने मृतदेहाला कुरतळल असण्याची शक्यता पोलीस तपास सुरू .

 • 19 May 2022 01:36 PM (IST)

  सोलापूरमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात

  - सोलापूरमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात

  - सकाळपासून ढगाळ वातावरणानंतर आता पावसाची हजेरी

  - उन्हामुळे त्रस्त झालेल्या सोलापूरकरांना पावसामुळे दिलासा

  - विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात

 • 19 May 2022 01:04 PM (IST)

  आजची युती बघायला मोठे साहेब पाहिजे होते - आदित्य ठाकरे

  आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय की...

  खूप आठवणी आज जाग्या झाल्या

  पवार साहेब आणि साहेबांची मैत्री वेगळी होती

  त्यांना आज युती बघून आनंद झाला असता

  राजकारण आणि पक्ष वेगवेगळ्या भुमिका आहेत

  मोदी साहेबांबद्दल सुद्धा आदर आहे

  आरोप आणि खालच्या पातळीवर आरोप झाले

  विरोधी पक्षाकडुन खुप आरोप झाले

  पण आम्ही खोटे आरोप केल नाही

  आम्ही विकासावर बोलत आलो

  त्यांची खोलीत आज सुद्धा आलात तर त्यांच्या खोलीच वेगवेळ्या भाषेतल्या डिक्शनरी आहेत

  आमच्यात डिक्शनरी वर चर्चा व्हायच्या, ते सहावी पर्यंत शिकले तरी त्यांना इंग्लिश यायचं

  ते सकाळी 6 वाजता उठायचे आणि त्यांना जे शब्द समजायचे नाही ते त्यात शोधाय़चे

 • 19 May 2022 12:30 PM (IST)

  संजय राऊत कुणी महत्त्वाचे आहेत का? फडणवीसांचा टोला

  संजय राऊत कुणी महत्त्वाचे आहेत का? त्यांच्या प्रश्नावर मी कशाला उत्तरं देऊ?, फडणवीसांचा टोला

  आस्थेचे विषय हे राजकारणाच्या पलिकडे आहे, हे विषय न्यायालयाच्या माध्यमातून सोडवले जातात, हे महत्त्वाचं आहे. सध्या न्यायालयात हे प्रकऱण असल्यामुळे यावर बोलणं योग्य नाही.- फडणवीस

  सध्या राज्यात हनुमान चालिसा बोलणं राजद्रोह आणि औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन माथा टेकणं राजशिष्टाचार आहे! - फडणवीस

  पाहा व्हिडीओ :

 • 19 May 2022 12:09 PM (IST)

  मुंबईतील नाल्यांमध्ये सिल्टेशनचा प्रॉब्लेम, आदित्य ठाकरेंची माहिती

  पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय की...

  नालेसफाई, रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी अशी आशा आहे की हिंदमाताला जावं लागणार नाही. यावर आम्ही चर्चा केली. कुणी चांगलं सांगितलं, तर आम्ही सूचनांवर कारवाई करु. मुंबईत काही भागात भूस्खलनाबाबत कारवाई केलीय, पुढच्या काही वर्षात तिथल्या झोपडपट्टींचं स्थलांतर केलं जाईल. पण सध्या काही तात्पुरत्या सुविधा केल्या जातील. मुंबईतील नाल्यांमध्ये सिल्टेशनचा प्रॉब्लेम आहे. जो नद्यांमध्ये होतच असतो. त्यातील फ्लोटींग डेब्रीही हटवण्यात आल्या आहेत, अजूनही कामं सुरु आहेत. 78 टक्के काम झालं आहे, लोक कचरा टाकत असतात, ते काम रोज सुरुच असतं.

  पाहा व्हिडीओ :

 • 19 May 2022 12:05 PM (IST)

  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद

  मान्सूनपूर्व कामाचं मुंबईत काय झालं?

  यंदा पावसात मुंबईची पुन्हा तुंबई होणार का?

  नालेसफाईचं काम किती झालं?

  Video : पाहा काय म्हणाले आदित्य ठाकरे?

 • 19 May 2022 12:04 PM (IST)

  पुणतांबा गावात ठरतेय शेतकरी आंदोलनाची दिशा

  विशेष ग्रामसभेत ठरणार आंदोलनाची दिशा...

  पुणतांबा गावात ठरतेय शेतकरी आंदोलनाची दिशा...

  पुणतांबा गावात 23 मे रोजी विषेश ग्रामसभा होणार...

  ग्रामसभेत ठरणार आंदोलनाची दिशा...

  राज्यभरातील शेतकरी प्रश्नावर आंदोलनाची दिशा ठरणार...

  पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेते आणी शेतकरी एकत्र...

  अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात आज विषेश बैठकीचे आयोजन...

  2017 साली शेतकरी संपाची हाक देणा-या पुणतांबा गावात आंदोलनाची दिशा ठरणार...

  राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा...

 • 19 May 2022 11:53 AM (IST)

  नाशिक : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको

  नाशिकच्या देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको..

  प्रहार शेतकरी सघटना आणि शेतकऱ्यांसह आंदोलन सुरू..

  कांदा भावात सततच्या होणाऱ्या घसरण व विविध मागण्यांसाठी रास्ता रोको..

 • 19 May 2022 11:15 AM (IST)

  ज्ञानवापी वादप्रकरणी मोठी अपडेट

  वारणसी न्यायालयात उद्या होणार सुनवणी

  आजची सुनवणी उद्यावर ढकलली

  दुपारी 3 वाजता होणार सुनावणी

  उद्या सुप्रीम कोर्टात होणार सुनवणी

  तो पर्यंत कोणतेही निर्णय देउ नये सुप्रीम कोर्टाचे आदेश

  एकूण चार याचिकांवर आज वाराणसी सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार होती

 • 19 May 2022 11:10 AM (IST)

  राज्यसभा निवडणुकांवर अजित पवारांचं सूचक विधान

  मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी राज्यसभा निवडणुकांवर बोलताना म्हटलंय, की...

  -राज्यसभेच्या सहा जागा आहेत..

  -दोन जागा भाजपच्या आरामात निवडून येतात..

  -शिवसेनेची एक जागा निवडून येते

  -राष्ट्रवादीचीही एक जागा हमखास निवडूक येतो..

  -मागच्या वेळेस निवडणुकीत एक जागा असतानाही पवारांच्या शब्दाखातर उद्धव ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवला होता.

  -पुढच्या वेळेत निवडणुका येतात, तेव्हा साहेबांनी कबूल केलेलं होतं.

  -आता पवारसाहेब आणि उद्धव ठाकरें यांच्यात बैठक झाली आहे.

  -पक्ष नेतृत्त्वाला आम्ही यावर काहीही विचारलेलं नाही.

  -कुणी किती जागा लढवायच्या, हा ज्याचा त्याता अधिकार

  -अंतिम यादी प्रसिद्ध होईपर्यंत बऱ्याच गोष्ट घडतात, तसं काहीतरी घडेल, अशी अपेक्षा..

  पाहा व्हिडीओ :

 • 19 May 2022 11:07 AM (IST)

  Video : ओबीसी आरक्षणावर अजित पवार LIVE

  ओबीसी वर्गाला प्रतिनिधित्व मिळण्याकरता प्रयत्न सुरु आहे, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

  जसं दुसऱ्यांना सुप्रीम कोर्टात जाऊन मध्य प्रदेश सरकारनं आरक्षण मिळवलं, तसा प्रयत्न आम्हीही करणार आहोत, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

  पाहा व्हिडीओ :

 • 19 May 2022 11:05 AM (IST)

  अजित पवार LIVE

  ओबीसी आरक्षणावरुन निकाल आला, आम्ही संबधित अधिकाऱ्यांशी बोललो

  आम्ही मुख्यमंत्री आणि सर्व खात्यांशी चौकशी केली आहे

  सर्व पक्षांची इच्छा आहे, राजकारण न येता सर्व पक्षांनी पाठिंबा दिला

  ओबीसी वर्गाला सुद्धा प्रतिनिधी मिळावा हा त्यांचा हक्क आहे

  निकाल वेगळा लागला, यात सरकार कमी पडलं असे आरोप होतात

  कमिटीचं काम चालू आहे, त्यांचा अहवाल येईल..

  आरक्षण मिळावं यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु..

  इम्पेरिकल डाटामध्ये मध्ये प्रदेशनं काय सादर केलं, तेही आम्ही पाहिलंय.. त्याचा अभ्यास सुरु आहे

  भाटियांचा त्याचा अभ्यास खूप आहे, त्यांनी याआधीही त्यांनी काम केलंय.

  शेवटपर्यंत ओबीसी समाजाला त्यांच्या अधिकार मिळायला पाहिजे, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील

 • 19 May 2022 10:45 AM (IST)

  मुंबईच्या जेलमध्ये कैद्यांसाठी भजन स्पर्धा

  मुंबईच्या जेलमध्ये कैद्यांसाठी भजन स्पर्धा

  भजन स्पर्धेच्या उद्घाटनासाठी अजित पवार आणि गृहमंत्र्यांची हजेरी

  भजन स्पर्धेतून कैद्यांमध्ये चांगल्या विचारांची पेरणी होईल

  अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास

  पाहा व्हिडीओ :

 • 19 May 2022 10:28 AM (IST)

  बीडीडमधील घरांचा मुद्दा! पोलीस कुटुंबीयाचा घरांच्या 50 लाख किंमतीला विरोध

  बीडीडी मधील पोलीस कुटुंबीयाचा घरांच्या 50 लाख किमतीला विरोध

  गेली अनेक वर्ष आम्ही राहत आहोत सर्वसामान्य कुटूंबीय , तुटपुंजे पगार , कमी पेंशन

  मग आम्ही 50 लाख कसे भरणार सरकारने आमची फसवणूक केली आहे

  मुलांचे शिक्षण आणि संसार सांभाळून कसे पैसे भरणार पोलीस पत्नीचा सवाल

  सरकारला हात जोडून विनंती आहे घरांची किंमत कमी करावी

 • 19 May 2022 10:12 AM (IST)

  शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्स 1000 अंकानी कोसळला

  शेअर बाजारात मोठी पडझड

  सेन्सेक्स 1000 अंकानी कोसळला

  निफ्टी 300 अंकांनी खाली

  मोठ्या पडझडीमुळे गुंतवणूकदार धास्तावले

  कोट्यवधींच्या नुकसानीची भीती

  पाहा व्हिडीओ :

 • 19 May 2022 10:11 AM (IST)

  12 वाजता वाराणसी सेशन कोर्टात महत्त्वाची सुनावणी

  आज कोर्टात चार याचिकांवर सुनावणी… या प्रकरणी 12 वाजता वाराणसी सेशन कोर्टात सुनावणी…

  - कोर्ट कमिश्नर विशाल सिंह यांचा 700 पानी अहवाल तयार…

  - अहवाल तयार करून कोर्टाकडे ठेवण्यात येणार… त्यासोबत व्हिडीयो रेकाॅर्डींग आणि इतर तथ्यही देण्यात येणार असल्याची माहीती…

  - या प्रकरणी कोर्ट महत्वाचा निकाल देण्याची शक्यता…

  - कोर्टाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त, साधू संत जमण्यास सुरवात…

 • 19 May 2022 09:54 AM (IST)

  औरंगाबादमधून मोठी बातमी!

  औरंगजेबाची कबर पाच दिवसंकरता बंद ठेवण्याचा निर्णय

  पुरातत्व विभागाने घेतला कबर पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय

  कबर परिसरात वातावरण बिघडण्याची शक्यता असल्यामुळे निर्णय

  परिस्थिती न सुधारल्यास आणखी पाच दिवस कबर राहणार बंद

  आज सकाळपासून औरंगजेब कबर करण्यात आली बंद

 • 19 May 2022 09:46 AM (IST)

  पुणे मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांची झटापट

  पुणे मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांची झटापट

  शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर यांच्यात झाली झटापट

  रणजित शिरोळे विभाग अध्यक्ष असून कुठल्याच बैठकांना का बोलावत नाही याचा जाब विटकर यांनी बैठकीत विचारल्यावर शिरोळे धावून गेल्यावर झाली झटापट

  मात्र, आमच्यातील वैयक्तिक कारणामुळे किरकोळ बाचाबाची झाल्याचं शिरोळे यांच म्हणणं

 • 19 May 2022 08:52 AM (IST)

  राज ठाकरेंना कोण रोखतं ते बघतेच मी... - साध्वी कांचनगिरी

  साध्वी कांचनगिरी यांचा बृजभूषण सिंह यांना आव्हान

  राज ठाकरेंची बाजू घेत साध्वी कांचनगिरी यांचा बृजभूषण सिंहावर पलटवार, वाचा काय म्हणाल्या साध्वी कांचनगिरी..

  राज साहेबांचं सगळ्यात आधी अभिनंदन केलं. त्यांच्या बाळासाहेब दिसतात.. ते हिंदुंची आवाज आहे..भोंगे उतरवण्याबाबत त्यांचं अभिनंदन.. बृजभूषण यांचे हात रक्ताने माखलेले आहेत, त्यांनी दुसऱ्याकडे बोट दाखवून नये..

  त्यांना संतांच्या रोषाचा सामना करावा लागेल.. मोदींना याबाबत पत्र लिहिलंय. त्यांना समजवा.. त्यांना संतांचा सामना करावा लागले.. चमकण्यासाठी बृजभूषण काम करतायत.. बृजभूषण यांना रोखावं जर तुम्हाला जराजरी दया असतील, तर तुम्ही फॅक्टरी लावली असती, लोकांना काम दिलं असतं... मी चॅलेंज करते.. राज य़ेणारच.. मी बघतेच बृजभूषण किती विरोध करतात ते..

  यांची काय हिंमत आहे... मी यांना बघून घेईल.. मी एकटी यांना पुरून उरेन..

  जर तुम्ही एका संताचा सन्मान करु शकत नाही, तर राष्ट्राचा सन्मान तुम्ही काय करणार

  राज ठाकरेंचा संताप्रती आदर आणि प्रेम दिसून येतो..

  माझ्याकडेही यांच्याविरोधात अनेक पुरावे आहेत.. बघुया कुणात किती दम आहे..

  राज ठाकरेंना कोण रोखतं ते बघतेच मी...

  साध्वी कांचनगिरी यांचा बृजभूषण सिंह यांना आव्हान

  राज ठाकरेंची बाजू घेत साध्वी कांचनगिरी यांचा बृजभूषण सिंहावर पलटवार

  पाहा व्हिडीओ :

 • 19 May 2022 08:45 AM (IST)

  चंद्रपूर : गर्भपात कायदा धाब्यावर ठेवणारे सोनोग्राफी केंद्र सील

  चंद्रपूर :- गर्भपात कायदा धाब्यावर ठेवणारे ते सोनोग्राफी केंद्र सील

  नोंदणी प्रमाणपत्र निलंबित : अभिलेखांची देखभाल न करणे भोवले

  पीसीपीएनडीटी व वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लघंन झाल्याचा ठपका

  डॉ. शरयु सुधाकर पाझारे यांच्या पाझारे नर्सिंग होम येथील वैद्यकीय गर्भपात केंद्र नोंदणी प्रमाणपत्र 30 दिवसांसाठी निलंबित व वैद्यकीय गर्भपात केंद्र सील

  मनपाच्या आरोग्य पथकाने कारवाई केली.

 • 19 May 2022 08:36 AM (IST)

  पोटात भोसकलं! नाशिकमध्ये तरुणाच्या हत्येनं खळबळ

  नाशिकच्या म्हसरूळ परिसरात 24 वर्ष तरुणाची हत्या

  पोटात धारदार शस्त्राने वार करून केली हत्या

  पूर्ववैमनस्यातून किंवा वर्चस्वाच्या वादातून हत्या झाल्याचा संशय

  24 वर्षीय तरुणाच्या हत्तेने म्हसरूळ परिसर हादरला

 • 19 May 2022 08:24 AM (IST)

  'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर गेल्या 4.5 वर्षात 1 हजाराच्या वर अपघात

  पुणे मुंबई एक्स्प्रेस वे वर गेल्या साडेचार वर्षात एक हजाराच्यावर अपघात झाले असून, त्यात 374 जणांना जीव गमवावा लागला

  एक्स्प्रेस वेवर 2018 मध्ये 114 जणांचा अपघाती मृत्यू

  'झिरो फॅटलिटी कॉरिडोर' उपक्रमामुळे 2019 मध्ये अपघातांची संख्या घटली, या वर्षात 92 अपघात

  कोरोनाकाळात 2020 मध्येही प्राणांतिक अपघातात 66 जणांचा मृत्यू

  2021 पासून पुन्हा प्राणांतिक अपघात वाढले असून दोन महिने लॉकडाउन असतानाही 88 जणांचा अपघातात मृत्यू

 • 19 May 2022 07:49 AM (IST)

  अखेर नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेची तारीख ठरली

  - 24 दिवसांच्या घोळानंतर अखेर नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेची तारीख ठरली

  - पदवी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा 8 जूनपासून होणार

  - पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा 15 जूनपासून होणार सुरु

  - परीक्षा ॲानलाईन की ॲाफलाईन याबाबत संभ्रम कायम

  - 20 तारखेला प्राधिकरणाच्या बैठकीत परीक्षा ॲानलाईन की ॲाफलाईन याबाबत निर्णय होणार

 • 19 May 2022 07:35 AM (IST)

  अमरावती जिल्ह्यातील 486 गावांना पुराचा धोका

  अमरावती जिल्ह्यातील 486 गावांना पुराचा धोका....

  प्रशासन सज्ज;जिल्हा परिषदेचा आपत्कालीन कृती आराखडा तयार...

  जिल्ह्यातील 486 गावापैकी 22 गावे अति संवेदनशील आहेत..

  सर्वाधिक पुराचा धोका अमरावती तालुक्यातील गावांना....

  मेळघाट मधील गावे अतिसंवेदनशील...

  गावांना पूराचा वेढा होत असल्याने तुटतो गावांचा संपर्क....

 • 19 May 2022 07:13 AM (IST)

  दहशतवादी रईस अहमद शेख सदाउल्ला शेखचा मोबाईल जप्त

  - जैश च्या दहशतवाद्याकडून संघ मुख्यालय आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी प्रकरण

  - जैशचा दहशतवादी रईस अहमद शेख सदाउल्ला शेखचा मोबाईल जप्त

  - मोबाईलद्वारे रईस ने कुठे कुठे कोणाशी संपर्क साधला याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न

  - रईसचा मोबाईल नागपूर एटीएसने सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवला

  - रईस ज्या हॅाटेलमध्ये थांबला त्याला तिथे नेऊन एटीएसने केली चौकशी

  - रईसचा स्थानिक हस्तक कोण, याचा शोध सुरु

  - सध्या दहशतवादी रईस अहमद शेख सदाउल्ला शेखची न्यायालयीन कोठडीत रवानगी

  - १५ जुलैला नागपुरात येऊन रईस शेखने संघ मुख्यालय, स्मृती मंदिर दपरिसराची केली होती रेकी

  - नागपूरात कोतवाली पोलिसांनी रईस शेख विरोधात गुन्हा दाखल केला होता

  - नागपूर दहशतवादी पथकाने कश्मिरमध्ये जाऊन रईस शेखला अटक केली

 • 19 May 2022 06:57 AM (IST)

  नागपूरसह विदर्भाच्या काही भागात रात्री मुसळधार पावसाची हजेरी

  - नागपूरसह विदर्भाच्या काही भागात रात्री मुसळधार पाऊस

  - विजांच्या कडकडाटासह पडला मुसळाधार पाऊस

  - पूर्वमौसमी पावसाने बळीराजा सुखावला, खरिप पेरणीपूर्व मशागतीला येणार वेग

  - काही भागात दीड ते दोन तास पडला मुसळाधार पाऊस

  - आज सकाळपासून ढगाळ हवामान, तापमानातंही घट

 • 19 May 2022 06:48 AM (IST)

  पुणे दर्शन बसमधून महात्मा फुले यांचा गंजपेठेतील वाडा वगळला

  पुणे

  पीएमपीएलच्या पुणे दर्शन या बसमधून महात्मा फुले यांचा गंजपेठेतील वाडा वगळण्यात आला

  फुले वाडा परिसरात झालेल्या अतिक्रमणांमुळे बस आत नेता येत नाही व दूरवर उभी केली, तर प्रवासी तिथे चालत जात नसल्याच प्रशासनाने दिले कारण

  पर्यटकांना पुण्यातील ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत यासाठी पीएमपीएलने पुणे दर्शन ही बस सुरू केली

  शनिवारवाडा, केळकर संग्रहालय अशा 21 ठिकाणांरोबरोबरच समता भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या महात्मा फुले वाड्याचाही समावेश

  या वाड्याभोवती मागील काही वर्षात बरीच अतिक्रमणे असल्याने तिथे मोठी बस नेते येत नाही असे कारण देत पीएमपीएल प्रशासनाने हा वाडाच पुणे दर्शनच्या बसमधून वगळून टाकला

 • 19 May 2022 06:22 AM (IST)

  उस्मानाबाद : 2 पोलिसात वाद व नंतर हाणामारी

  पोलीस अधिक्षक कार्यालयात दोन पोलिसात वाद व नंतर हाणामारी, पोलिसात गुन्हा नोंद

  कार्यालयीन अधिक्षक नरसिंग कासेवाड यांनी कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपिक मच्छिंद्र कृष्णा जाधव यांना केली मारहाण

Published On - May 19,2022 6:21 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें