Maharashtra News Live Update : शिवसेना राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार संध्याकाळी घोषित करणार?

| Updated on: May 26, 2022 | 4:29 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : शिवसेना राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार संध्याकाळी घोषित करणार?
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज सोमवार 23 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. औरंगाबाद शहरात आज भाजपचा जल आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. सायंकाळी चार वाजता पैठण गेट पासून महापालिकेवर मोर्चा निघेल. मोर्चात 10 ते 15 हजार महिला सहभागी होतील. मोर्चानंतर औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 May 2022 04:29 PM (IST)

    औरंगाबाद पेट्रोल पंप चालक मालक संघटनेचा इशारा

    31 मे रोजी पेट्रोल खरेदी न करण्याचा निर्णय

    कमिशन वाढवण्यासाठी दिला इशारा

    पंप बंद राहिले तर गोंधळ होण्याची शक्यता

  • 23 May 2022 09:50 PM (IST)

    अंबरनाथमध्ये धरणाच्या भूसंपादनात घोटाळा ; खोटे लाभार्थी दाखवून कोट्यवधी रुपये लाटले

    अंबरनाथमध्ये धरणाच्या भूसंपादनात घोटाळा

    खोटे लाभार्थी दाखवून कोट्यवधी रुपये लाटले

    पोलिसांकडून 3 गुन्हे दाखल करत 25 जणांना बेड्या

    निवृत्त नायब तहसीलदार निघाला घोटाळ्याचा सूत्रधार

    तत्कालीन प्रांत अधिकाऱ्यांना अटक करा – आमदारांची मागणी

  • 23 May 2022 09:32 PM (IST)

    यवतमाळमध्ये जिल्हा कॉंग्रेसमध्ये फेर बदल; प्रफुल्ल मानकर यांची कॉंग्रेस कमिटी प्रभारी अध्यक्षपदी निवड

    यवतमाळ- जिल्हा कॉग्रेस मध्ये फेर बदल वजाहत मिर्झा यांच्या जागी प्रफुल्ल मानकर यांची कॉंग्रेस कमिटी प्रभारी अध्यक्षपदी निवड वजाहत मिर्झा यांच्याकडे प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग जबाबदारी दिल्याने एकाच व्यक्तींकडे झाली होती 4 पदे झाले

  • 23 May 2022 09:22 PM (IST)

    वाघडोह वाघाला ताडोबातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली

    चंद्रपूर : वाघडोह वाघाला ताडोबातील अधिकारी, कर्मचारी, गाईड, जिप्सी चालक आणि रिसॉर्ट चालकांनी वाहिली श्रद्धांजली...

    ताडोबाचं मुख्य प्रवेशद्वार असलेल्या मोहर्ली गेटवर झाली शोकसभा, 2 मिनिटं मौन पाळून वाहण्यात आली श्रद्धांजली

    वाघडोहच्या आठवणीने अनेकांचे पाणावले डोळे, ताडोबासाठी दुःखाचा दिवस आहे अशी भावना व्यक्त करत शोकसभेत वाघडोहच्या आठवणींना देण्यात आला उजाळा

    वाघडोहमुळे ताडोबातील पर्यटन वाढल्याने स्थानिकांच्या रोजगार आणि आर्थिक दर्जात झाला सुधार

    त्यामुळे वाघडोहचा पुतळा ताडोबाच्या परिसरात उभारण्याची करण्यात आली मागणी

  • 23 May 2022 08:49 PM (IST)

    अमरावतीत अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या शेकडो दुचाकीच्या रांगा

    अमरावती शहरातील काही पेट्रोल पंपाना पेट्रोलचा पुरवठा न झाल्याने अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या शेकडो दुचाकीच्या रांगा

    वाहनात पेट्रोल टाकण्यासाठी वाहने तासंनतास उभी

    पेट्रोल डेपोतून पेट्रोल मिळाले पेट्रोल पंपाना पुरवठा होऊ शकला नाही

  • 23 May 2022 08:47 PM (IST)

    केतकी चितळेची चौकशी सखोल अजून झालेली नाही; अजून 7 दिवसांची कोठडी मागणार 

    रबाळे पोलिसांकडून केतकी चितळेची चौकशी सखोल अजून झालेली नाही

    केतकी पूर्ण तपासात सहकार्य करत नाही आहे

    केतकीचा मोबाईल व लॅपटॉप आधीच ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केले

    रबाळे पोलीस अट्रोसिटी गुन्हा अंतर्गत त्याचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी रबाळे पोलीस ठाणे न्यायालयात उद्या मागणी करणार

    पूर्ण तपास अद्याप झालेला नाही, त्यामुळे अजून 7 दिवसांची कोठडी मागणार

    केतकीची उद्या पोलीस कास्टडी संपत आहे

  • 23 May 2022 08:41 PM (IST)

    बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हवालदारासह होमगार्डवर गुन्हा दाखल

    बारामती : बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हवालदारासह होमगार्डवर गुन्हा दाखल

    - १ हजार रुपयांची लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केला गुन्हा

    - हवालदार अण्णासाहेब उगले व होमगार्ड सनी गाढवे यांच्यावर गुन्हा दाखल

    - वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी मागितली होती लाच

    - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला गुन्हा दाखल

  • 23 May 2022 08:36 PM (IST)

    सोलापूर महापालिकेतील महिला आरक्षणाची सोडत 31 मे रोजी होणार

    - सोलापूर महापालिकेतील महिला आरक्षणाची सोडत 31 मे रोजी होणार

    - महापालिका प्रभाग रचेनेनंतर आता 31 मे रोजी होणार महिला आरक्षण सोडत

    - राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेला आले आदेश

    - निवडणूक आयोगाकडून आदेश आले असून 31 मे रोजी होणार महिला आरक्षण सोडत

    - सोलापूरसह राज्यातील 13 महापालिकांना आरक्षण सोडत काढण्याचे दिले आदेश

  • 23 May 2022 08:22 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्याला स्वतंत्र विद्यापीठ करण्याच्या हालचालींना वेग

    उस्मानाबाद जिल्ह्याला स्वतंत्र विद्यापीठ करण्याच्या हालचालींना वेग

    स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्याबाबत अहवाल सरकारने मागितला

    उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक उद्या उस्मानाबादेत भेट देऊन घेणार आढावा बैठक

    विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय निंबाळकर यांची माहिती

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे उपकेंद्र उस्मानाबाद येथे असून उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्याच्या हालचाली

    उद्याच्या बैठकीला उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व संस्थांचालक , प्राचार्य , खासदार , आमदार व लोकप्रतिनिधी हजर राहणार

    उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ करावे अशी मागणी

  • 23 May 2022 08:18 PM (IST)

    संभाजीनगरचा जल आक्रोश मोर्चा हा खरंच मोर्चा होता का इव्हेंट ?; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

    - संभाजीनगरचा जल आक्रोश मोर्चा हा खरंच मोर्चा होता का इव्हेंट ? - फुगड्या,उंट कशासाठी ? - या मोर्च्यात गांभीर्य हवं - मुख्यमंत्री संवेदनशील - फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना हे विषय मांडले असले तरी चाललं असतं, मोर्च्याची गरज काय ? - मुख्यमंत्री संभाजीनगर सभेत उत्तर देतील

  • 23 May 2022 08:15 PM (IST)

    गरज पडल्यास देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गुन्हा दाखल कराःइम्तियाज जलील

    हरिभाऊ बागडे हे औरंगाबाद संभाजीनगर, औरंगजेब, संभाजी महाराज यांच्याबद्दल आणखी वातावरण खराब केलं

    पोलिसांनी बारकाईने अभ्यास करावा गरज पडल्यास देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गुन्हा दाखल करा

  • 23 May 2022 08:13 PM (IST)

    हरिभाऊ बागडे यांच्यावर गुन्हा दाखल कराः इम्तियाज जलील

    हरिभाऊ बागडे यांच्यावर गुन्हा दाखल करा त्यांना नियमभंग केला आहे,

    औरंगाबाद चे वातावरण खराब करायला येणार असाल तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ

  • 23 May 2022 08:12 PM (IST)

    फडणवीस यांच्या चुकीमुळे औरंगाबादकरांना त्रास सहन करावा लागत आहेः इम्तियाज जलील

    समांतर ही कंपनी भाजपच्या एका खासदारची कंपनी होती, ती तुम्ही आमच्या औरंगाबाद वर लादत होता

    हा सगळा प्रकार खूप दुर्दैवी आहे, फडणवीस यांच्या चुकीमुळे औरंगाबादकरांना त्रास सहन करावा लागत आहेः इम्तियाज जलील

  • 23 May 2022 08:10 PM (IST)

    औरंगाबादकरांनी रुग्णालयात जाऊन उपचार करून घेण्याची वेळ आलीः इम्तियाज जलील

    औरंगाबादकरांनी रुग्णालयात जाऊन उपचार करून घेण्याची वेळ आली आहे.

    भाजपने गोरगरीब लोकांना हांडे देण्याचं आश्वासन दिलं होतं हांडे वाटले आहेत, या मोर्चात एक आजी नाचत होती ती तिला एक हंडा मिळाला म्हणून नाचत होती

    हे देवेंद्र फडणवीस यांना दिसलं नाही का त्या हंड्यावर यांचे नाव फोटो होते

    हंड्याचे अमिश देऊन लोक बोलावले होते, फडणवीस म्हणाले ही महापालिका भ्रष्टचराचा अड्डा झाला आहे मग तीस वर्षे तुम्ही सत्तेत होतात तुमचे लोक शिवसेनेसोबत सत्तेत होते, मग त्यावेळी आपण काय गोट्या खेळत होतात का.?

    तुम्ही कारवाई का केली नाही, तुम्ही मुख्यमंत्री असून कुणाला निलंबित केलं का.?

  • 23 May 2022 08:06 PM (IST)

    शिवसेनेचं वर्चस्व या शहरावरच नाही तर जिल्ह्यावर राहिलेलं आहेः इम्तियाज जलील

    शिवसेनेचं वर्चस्व या शहरावरच नाही तर जिल्ह्यावर राहीलेलं आहे

    त्यामुळे MIM कडे लक्ष देण्याची गरज नाही

    रावसाहबे दानवे शिवसेनेच्या मतामुळं खुर्चीवर

  • 23 May 2022 08:01 PM (IST)

    लोणावळ्यामध्ये ड्यूक्स नोज पॉईंट येथे सहलीला गेलेला दिल्लीमधील पर्यटक शुक्रवारीपासून जंगलात बेपत्ता

    लोणावळ्यामध्ये ड्यूक्स नोज पॉईंट येथे सहलीला गेलेला दिल्लीमधील पर्यटक शुक्रवारी दुपारपासून जंगलात बेपत्ता

    -फरहान शाह बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव

    -त्याने आपल्या भावाला फोन करून जंगलात हरवलो असल्याची माहिती दिली. त्यानंतर काही तासांनी त्याचा फोन बंद झाला. त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने तो हरवल्याची तक्रार दाखल केली

    -लोणावळा ग्रामीण पोलीस,मावळ वन्यजीव सरंक्षक आणि लोणावळा शिवदुर्ग ग्रुपचे स्थानिक स्वयंसेवक या युवकाचा दाट जंगलात शोध घेत आहेत

  • 23 May 2022 07:59 PM (IST)

    मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचा मुडदा या सरकारनं मुडदा पाडलाः देवेंद्र फडणवीस

    मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचा मुडदा या सरकारनं मुडदा पाडला.

    मराठवाडा वॉटर ग्रीडचा मुडदा पाडला.

    समुद्रात वाहून जाणारं पाणी बोगद्याद्वारे गोदावरीत आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आपण करत होतो,

    महाविकास आघाडीने सरकारनं  स्थगिती दिली. हे सरकार पाण्यासाठी त्राहीमाम करावं लागणारं आहे.

    आज संभाजीनगरने महाविकास आघाडीला हलवून टाकलं आहे. जोपर्यंत तुमच्या पाण्याची समस्या संपत नाही तोवर भाजप झोपणार नाही आणि सत्ताधाऱ्यांना झोपू देणार नाही

  • 23 May 2022 07:55 PM (IST)

    सरकारनं एक नवा पैसा दिला नाहीः देवेंद्र फडणवीस

    बदलेल्या सरकाने पहिलं काम केलं टेंडर बदलेली वाटा घाटी यांना माहिती पंचेचाळीस किमी लाईन पूर्ण झाली असती

  • 23 May 2022 07:49 PM (IST)

    माझ्या मोर्चाला किती अटी टाकल्या, मात्र तुम्ही थांबवू शकत नाहीः देवेंद्र फडणवीस

    माझ्या मोर्चाला किती अटी टाकल्या, मात्र तुम्ही थांबवू शकत नाही

    80 वर्षाच्या आजी आज मोर्चात सामिल झाली, झुकेंगा नई आजीच्या घरी मुख्यमंत्री गेले आता पाण्यासाठी तरसेलल्या आजीच्या घरी जाणार का

    यांना घाटा माहीत नसून वाटा माहीत आहेत

    समांतर पाणी योजनेचा पोपट मेला

  • 23 May 2022 07:47 PM (IST)

    2013 मध्ये झालेल्या मोर्चात सत्ता परिवर्तनाची घोषणा ;देवेंद्र फडणवीस

    संभाजीनगरातील एक अद्भूभूत मोर्चा 2013 नंतरचा हा सगळ्यात मोठा मोर्चा 2013 मध्ये झालेल्या मोर्चात सत्ता परिवर्तनाची घोषणा दिलेली देवेंद्र फडणवीस

  • 23 May 2022 07:44 PM (IST)

    राणेंनी पहिले स्वतः आपली इमानदारी चेक करावी नंतर दुसऱ्यांना बेईमान म्हणावं; गुलाबराव पाटील यांचा नारायण राणे यांना टोला

    शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचा भाजप नेते नारायण राणे यांना टोला

    नारायण राणे हेच आता बाळासाहेबांचे राहिलेले नाहीत

    खुद बेईमान दुसरो को बेईमान बोलता है

    राणेंनी पहिले स्वतः आपली इमानदारी चेक करावी नंतर दुसऱ्यांना बेईमान म्हणावं

  • 23 May 2022 07:42 PM (IST)

    खडसेंनी डिवचल्याशिवाय चंद्रकांत पाटील चांगले काम करणार नाहीत; गुलाबराव पाटील यांनी खडसेंना लगावला

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा मुक्ताईनगरातील राजकीय वादावर बोलतांना एकनाथ खडसे यांना टोला

    एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वैमनस्य पाहता त्यांच्यात शाब्दीक वाद होतच राहतील.

    खडसेंनी डिवचल्याशिवाय चंद्रकांत पाटील चांगले काम करणार नाहीत', अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुक्ताईनगरातील राजकीय वादावर आज भाष्य

    खडसेंनी महाविकास आघाडीत कितीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याला साखरेत परिवर्तीत करतील, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी खडसेंना लगावला

  • 23 May 2022 07:39 PM (IST)

    आजची लढाई व्यवस्था परिवर्तनाची, ही व्यवस्थेला संपवण्या करता हा मोर्चाः रावसाहेब दानवे

    औरंगाबादच्या इतिहासात सर्वात मोठा मोर्चा

    आजची लढाई व्यवस्था परिवर्तनाची, ही व्यवस्थेला संपवण्या करता हा मोर्चा

    थेंब थेंब पाण्यासाठी लोण त्रासत्यय

    हा संघर्ष तेव्हाच संपेल ज्यावेळी औरंगाबाद मध्ये पाणी पोहचेल

  • 23 May 2022 07:38 PM (IST)

    12 कोटी जनता तुमचं कुटुंब नाही का?; रावसाहेब दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

    दोन मंत्री जेलात आणि मुख्यमंत्री आपल्या घरात: रावसाहेब दानवेंची टीका

    कोविडमध्ये भाजपचे आमदार, खासदार, विरोधी पक्षनेते शेतकऱ्याजवळ गेले.

    त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पण मुख्यमंत्री घरात बसले. त्यांनी घोषणा दिली माझं कुटुंब, माझी जबाबदारी...12 कोटी जनता तुमचं कुटुंब नाही का?

  • 23 May 2022 07:33 PM (IST)

    हे महाविकास आघाडीच सरकार नसून जुमे के जुमे सरकारःकेंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची टीका

    औरंगाबादः केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

    हे महाविकास आघाडीच सरकार नसून जुमे के जुमे सरकार

    हे अमर अकबर अँथनीचे सरकार

    ही पाणी योजना यांच्या भानगडीमुळे रखडली

    आमचे मते फुटली मात्र यांना सजा दिल्याशिवाय राहणार नाही

    मुख्यमंत्री घरात आम्ही तुमच्या दारात राज्याचे मुख्यमंत्री बाहेर पडले नाही

    हा मोर्चा भाजपचा नाही, तर लोकांचाच

    संभाजी नगरकरांची हाक ऐका

  • 23 May 2022 07:26 PM (IST)

    म्हाडा परीक्षा घोटाळा प्रकरण सायबर पोलिसांची मोठी कारवाई

    पुणेः म्हाडा परीक्षा घोटाळा प्रकरण सायबर पोलिसांची मोठी कारवाई ,

    म्हाडा पेपरफुटीच्या गुन्ह्यामध्ये आणखी एका गुन्हेगाराला अटक

    कांचन साळवे असे अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीच नाव

    म्हाडा पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपी अटक

    परिक्षार्थींची फसवणूक केल्या प्रकरणी संतोष हरकळ, प्रितेश देशमुख, अंकुश हरकळ यांच्या विरोधात आहे पेपरफुटी प्रकरणात गुन्हा दाखल

  • 23 May 2022 07:15 PM (IST)

    शिवसेनेची सहावी जागा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संभाजीराजे यांना द्यावी

    शिवसेनेची सहावी जागा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संभाजीराजे यांना द्यावी

    संभाजीराजेंना शिवबंधन बांधून अडकवण्याचा प्रयत्नः रावसाहेब दानवेंची टीका

  • 23 May 2022 07:11 PM (IST)

    औरंगाबादमधील आक्रोश मोर्चातून महाविकास आघाडीवर जोरदार टीका

    औरंगाबादमधील आक्रोश मोर्चातून महाविकास आघाडीवर जोरदार टीका

    या सरकारमुळे शहरात पाणी नाही

  • 23 May 2022 06:47 PM (IST)

    तुळजाभवानी देवीच्या अभिषेक पूजा सुरु करण्याचा निर्णय; कोरोना निर्बंध असल्याने बंद होत्या पूजा

    उस्मानाबादः तुळजाभवानी देवीभक्त व पुजारी यांच्यासाठी आनंदांची बातमी

    -तुळजाभवानी देवीच्या अभिषेक पूजा सुरु करण्याचा निर्णय

    कोरोना निर्बंध असल्याने बंद होत्या अभिषेक पूजा

    तब्बल 2 वर्षानंतर विधी सुरु

    तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

    रोज सकाळी 6 ते 9 या वेळेत अभिषेक पूजा होणार

    तुळजाभवानी देवीला सकाळी व सायंकाळी रोज अभिषेक पूजा असत मात्र आता केवळ सकाळी अभिषेक पूजा सुरु होणार

  • 23 May 2022 06:40 PM (IST)

    अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅक मेल करणाऱ्या नराधमाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक

    अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅक मेल करणाऱ्या नराधमाला बलात्काराच्या गुन्ह्यात सानपाडा पोलिसांनी केली अटक

    पुढील तपासासाठी मोबाईल घेतला ताब्यात

  • 23 May 2022 06:05 PM (IST)

    नालासोपाऱ्यात वसई-विरार महापालिकेची धडक कारवाही; बुलडोझरने केली 8 दुकाने भुईसपाट

    नालासोपाऱ्यात वसई विरार महापालिकेने धडक कारवाही करत,  बुलडोझर ने 8 दुकान भुईसपाट केले आहेत. नालासोपारा पूर्व तुळींज रोडवर आज दुपारी प्रभारी सहाय्यक आयुक्त विशाखा मेटघरे यांनी ही कारवाही केली

    या धडक कारवाई दरम्यान अनाधिकृत बिल्डर आणि दुकान चालकांनी तीव्र आंदोलन छेडत कारवाहीस अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न

    बुलडोझर आतमध्ये जाऊ नये म्हणून दुकानासमोर 12 ते 13 कार पार्किंग करत तब्बल 2 तास पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन

    पण या दुकानदारांच्या आंदोलनाला पोलीस बळाचा वापर करून, त्यांचे आंदोलन हणून पाडले, कार बाजूला सारून, पालिका प्रशासनाने  8 ही दुकान भुईसपाट करण्यात यश मिळविले

  • 23 May 2022 05:54 PM (IST)

    लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून जळगावमध्ये महिलेने रॉकेल ओतून केला आत्मदहनाचा प्रयत्न

    पाचोरा गावांतील सरपंच, उपसरपंच लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी येथील अन्याय ग्रस्त पिडीत महिलेने चक्क जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अंगावर रॉकेल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न

    स्वतःला जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

    या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रचंड खळबळ उडाली

    साध्या वेशातील एका पोलीस कर्मचाऱ्याने आंदोलक महिलेच्या हातातून रॉकेलचा कॅन हिसकवण्याचा प्रयत्न

  • 23 May 2022 05:51 PM (IST)

    औंधमध्ये यमाईदेवी तळे सुशोभीकरणास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता

    सातारा जिल्ह्यातील औंध येथे यमाईदेवी तळे सुशोभीकरणास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

    प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून हे काम होणार आहे.

    यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव नायर सिंह उपस्थित होते.

    प्रारंभी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सादरीकरण केले

  • 23 May 2022 05:49 PM (IST)

    राज्य वक्फ बोर्ड अध्यक्ष वजाहत मिर्झा यांना कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा पक्ष श्रेष्टींनी मागितला राजीनामा

    यवतमाळ: राज्य वक्फ बोर्ड अध्यक्ष वजाहत मिर्झा यांना कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा पक्ष श्रेष्टींनी मागितला राजीनामा

    मिर्झाकडे वफ्क बोर्डसह कॉंग्रेस अल्पसंख्याक कमिटीचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी

    त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदावरून मिर्झा होणार पाय उतार

  • 23 May 2022 05:44 PM (IST)

    जळगावात अजिंठा विश्रामगृहावर शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक; महत्त्वपूर्ण चर्चा होणार

    जळगावात अजिंठा विश्रामगृहावर शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक

    जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आजी माजी आमदार पदाधिकाऱ्यांची तातडीची महत्त्वपूर्ण बैठक सुरू

    आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती

    जिल्ह्यात महाविकास आघाडी मध्ये मतभेद असल्याने स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या त्यापार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची सूत्रांची माहिती

  • 23 May 2022 05:42 PM (IST)

    पुणे शहरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद; जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे बंद

    पुणे शहरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद

    जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी राहणार पाणी पुरवठा बंद

    पर्वती जलकेंद्र पंपिंग, लष्कर जलकेंद्र पंपींग, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र, नवीन, जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत व पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीने देखभाल,

    दुरुस्तीच्या कामासाठी पुर्णदिवस पाणी पुरवठा बंद राहणार तर शुक्रवारी (दि.27) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार

    नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले

  • 23 May 2022 05:38 PM (IST)

    आरक्षण मुख्यमंत्र्यांच्या हातात असते तर मी त्यांच्याकडून मंजूर करून घेतले असतेःजितेंद्र आव्हाड

    -सरकारची भुमिका नसती तर सरकार कोर्टात गेले नसते -कोर्टात लढाई सुरू आहे

    -आरक्षण मुख्यमंत्र्यांच्या हातात असते तर मी त्यांच्याकडून मंजूर करून घेतले असते -चर्चेत येणासाठी काही न काही करावे लागतेः नाना पटोले यांना टोला

  • 23 May 2022 05:34 PM (IST)

    राज ठाकरे कोणाचा ट्रॅपमध्ये अडकले हे मला माहिती नाहीः जितेंद्र आव्हाडांची टीका

    राज ठाकरे कोणाचा ट्रॅपमध्ये अडकले हे मला माहिती नाही जी भूमिका त्यांनी मांडली आहे त्यावरून तरी दिसून येतो की राज ठाकरे यांची अडचण झालेली आहे भाजपचे खासदार त्यांना विरोध करतात याचा अर्थ उघड आहे की पक्षाकडून त्यांना पाठिंबा असू शकतो

    महाराष्ट्राची संस्कृती ही फक्त राजकारणासाठी नाही आणि यापूर्वी सुद्धा राजकीय मतभेद वेगळे असतात आणि वैयक्तिक मित्रत्व वेगळं असतं बाळासाहेब आणि शरद पवार यांचे संबंध सर्वांना माहिती आहे, ज्यावेळेस बाळासाहेब कार्यरत होते त्यावेळेस ही शरद पवार यांचे आणि बाळासाहेबांचे संबंध चांगले होते

    विरोधी पक्षनेते आता महागाईवर बोलत आहेत ही चांगली गोष्ट आहे. आता तरी या निमित्तानं हनुमान चालीसा सोडून महागाई, इंधनवाढ यावर बोललं जातंय ही चांगली गोष्ट आहे

  • 23 May 2022 05:24 PM (IST)

    सोलापूर जिल्ह्याला केंद्र सरकारचा कौशल्य विकास योजना पुरस्कारजाहीर; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

    -सोलापूर जिल्ह्याला केंद्र सरकारचा कौशल्य विकास योजना पुरस्कारजाहीर; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

    - कौशल्य विकासाबाबत उल्लेखनीय काम केल्याने सोलापूर जिल्ह्याला केंद्र सरकारचा जिल्हा कौशल्य विकास योजना पुरस्कार

    - पुरस्काराचे वितरण केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते 9 जून रोजी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटर, जनपथ येथे होणार.

    - सोलापूरच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने कोरोना काळात बेरोजगारांचा ऑनलाईन रोजगार मेळावा घेऊन हजारो जणांना रोजगार उपलब्ध करून दिला.

    - सोलापूर जिल्ह्याला कौशल्य विकास योजनेंमध्ये उत्कृष्ठ काम केल्याबद्दल कौतुक पत्र मिळणार

    - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पुरस्काराची माहिती दिली.

  • 23 May 2022 05:07 PM (IST)

    जेजुरी तिर्थक्षेत्राचे जतन व संवर्धन करण्यासाठी पहिल्या टप्प्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता

    जेजुरी तिर्थक्षेत्राचे जतन व संवर्धन करणे तसेच मंदिराच्या संकुलाचे संवर्धन करताना या परिसराचाही विकास करणे, भाविकांसाठी सोयी सुविधा निर्माण करणे, जेजुरी व आसपासच्या ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन व संवर्धन करणे यासाठी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली.

    यासंदर्भात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात सुमारे 110 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

  • 23 May 2022 05:01 PM (IST)

    नवी मुंबईत एपीएमसी बाजारपेठत हापूस आंबा 600 ते 800 रुपये प्रती डजन दराने

    नवी मुंबईत एपीएमसी बाजारपेठत हापूस आंबा 600 ते 800 रुपये प्रती डजन दराने

    नवी मुंबईतील रस्त्यावर कर्नाटकी आंबा 200 ते 300 रुपये प्रति डजन दराने

    कर्नाटकी आंब्यात रासायनिक खतांचा वापर केल्याने हा आंबा आरोग्यास धोकादायक ठरू शकतो

  • 23 May 2022 04:54 PM (IST)

    गोंदिया जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापतीपदाची निवडणूकीत काँग्रेसला पुन्हा ठेवले बाहेर

    भाजप-राष्ट्रवादीच्या गटाने मारली पुन्हा बाजी जि.प परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकी नंतर 4 ही सभापती पदावर राष्ट्रवादी व भाजपच्या गटाने मिळविला ताबा विषय समितीचे नवनिर्वाचित सभापती संजय टेंभरे (भाजपा), सविता पुराम (भाजपा), पूजा सेठ (राष्ट्रवादी काँग्रेस),सोनू कुथे (अपक्ष )यांच्या गळ्यात पडली सभापती पदाची माळ आजच्या सभापतीचा निवडणूकीत काँग्रेस सभापती चा पदापासून पुन्हा राहिला दुर

  • 23 May 2022 04:53 PM (IST)

    जो सत्यानाश शिवसेनेच्या काळात झाला त्याची फळं औरंगाबादकर भोगत आहेतः देवेंद्र फडणवीसांची टीका

    इतकी वर्षे सातत्याने महापालिकेत सत्ता असूनही संभाजीनगरमध्ये पाण्याच्या जो सत्यानाश शिवसेनेच्या काळात झाला त्याची फळं औरंगाबादकर भोगत आहेत.

    इथे पाणीच नाही. मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

    मी मुख्यमंत्री असताना जी योजना मंजूर केली आणि 1600 कोटी दिले. त्यात बदल करुन 600 कोटी महापालिकेने द्यावे असा निर्णय या सरकारनं केला.

    महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार द्यायलाही पैसा नाही. पण एक नवा पैसा दिला नाही. केंद्राचा पैसा इकडे वळवला.

    त्या योजनेचा ठेकेदार काम करत नाही. अर्धा किमी कामही झालेलं नाही. 40 किमी काम करायचं आहे, 25 वर्षे लागतील अशा स्पीडने काम सुरु आहे. म्हणूनच आज संभाजीनगर भाजपकडून जलआक्रोश मोर्चा आम्ही काढत आहोत.

    जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही लढा देऊ.

    नाना पटोले रोज खोटं बोलत आहेत. मनात येईल ते बोलतात. त्यामुळे अशा व्यक्तीला उत्तर देण्याचं कारण नाही. 24 तास पाणीपुरवठा करण्याचा राष्ट्रीय पुरस्कार नागपूरला मिळाला आहे हे नाना पटोलेंना माहिती नाही.

  • 23 May 2022 04:34 PM (IST)

    मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली

    मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक

    उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच इतर सचिव उपस्थित होते

  • 23 May 2022 04:26 PM (IST)

    भाजपाच्या आंदोलनात लागले महाविकास आघाडी सरकारच्या विजयाचे नारे

    भाजपाच्या आंदोलनात लागले महाविकास आघाडी सरकारच्या विजयाचे नारे

    गोंदियात आज भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने ओबीसी आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात एक दिवशीय लाक्षणईक उपोषण

    या आंदोलनात भाजपाचे कार्यकर्ते उत्साहात महाविकास आघाडी सरकारचा विजय असोचे नारे दिले

  • 23 May 2022 04:23 PM (IST)

    साताऱ्यातील सांगवड पुलावर दुचाकींची समोरासमोर धडक; तिघांचा जागीच मृत्यू

    कराडः दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत तीन जण ठार झाले दोन जण गंभीर जखमी

    पाटण तालुक्यातील नवारस्ता ढेबेवाडी मार्गावर सांगवड पुलानजीक अपघात

    जखमीवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू

    मल्हारपेठ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद

  • 23 May 2022 04:14 PM (IST)

    केंद्रातील मोदी सरकारला आणि राज्यातील भाजप नेत्यांना लाज वाटली पाहिजेःरविकांत वरपे यांची टीका

    पुणेः केंद्रातील मोदी सरकारला आणि राज्यातील भाजप नेत्यांना लाज वाटली पाहिजे

    सर्वसामान्यांच्या खिशाला झळ देत लाखो कोटी रुपयांचा फायदा आपण पेट्रोलियम कंपन्यांना करून दिला

    मुख्यमंत्री म्हणून आपण काम केलं

    ज्या वेळेस केंद्र सरकार कडून पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्यात येते

    त्यावेळेस आपोआप राज्यांची एक्साईज ड्युटी कमी होत असते.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांची टीका

  • 23 May 2022 04:07 PM (IST)

    मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजीराजे यांच्या राजकीय भूमिकेचा काही संबंध नाही

    मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजीराजे यांच्या राजकीय भूमिकेचा काही संबंध नाही

    मराठा क्रांती मोर्चा ही सामाजिक चळवळ

    छत्रपती संभाजीराजे यांचा राजकीय निर्णय ही वैयक्तिक भूमिका

    मराठा क्रांती मोर्चाची राजकीय भूमिका नाही

    आमचा त्यांना पाठिंबा नाही किंवा विरोधही नाही

    छत्रपतींचे वारसदार म्हणून आम्हाला आदर मात्र राजकीय भूमिकेचा काही संबंध नाही

    छत्रपतींना पक्ष प्रवेशाची ऑफर दिली जाते यासाठी आमची नाराजी आहे

    मात्र मराठा क्रांती मोर्चाचं त्यांच्या भूमिकेला समर्थन नाही

    पुण्यातील समन्वयकांची भूमिका

  • 23 May 2022 04:02 PM (IST)

    राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता

    आज सायंकाळी घोषणा होण्याची शक्यता

    मुख्यमंत्री-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घोषणा करण्याची शक्यता

    ग्रामीण भागातील शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळण्याची शक्यता

    राज्यसभा उमेदवारीसाठी पक्षात प्रवेश करा अशी अट शिवसेनेने छत्रपती संभाजी राजे यांच्यापुढे ठेवली आहे

    आज दुपारी 12 वाजता शिवबंधन बांधण्यास 'वर्षा'वर या असा निरोप शिवसेनेने छत्रपतींना काल दिला होता

    मात्र, छत्रपतीं संभाजीराजे यांच्याकडून अद्याप शिवसेनेच्या निरोपाला प्रतिसाद नाही

    शिवसेना पुरस्कृत उमेदवार होण्यास छत्रपती संभाजी राजे अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती

  • 23 May 2022 03:59 PM (IST)

    दीपाली सय्यद यांची मनसेवर टीका, अखिल चित्रे यांनी ट्विट करत दीपाली यांच्यावर केली खोचक टीका

    मुंबईः दीपाली सय्यद राज ठाकरे आणि मनसेवर टीका करत आहे. या टीकेला मनसेकडूनही प्रत्युत्तर

    - मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करत दीपाली सय्यद यांच्यावर साधला निशाणा…

    - पहिले 'आपचा' हात मग 'शिवसंग्रामचा' हात आणि आता थेट 'शिवसेनेचा' हात-पाय पकडून सुद्धा तुमचा राजकीय यशाचा दौरा पूर्ण होत नाही.

    - अहमदनगर झाले मुंब्राकळवा झाले मिळेले फक्त धुतकार म्हणून ही अशी वायफळ बडबडायची पाळी आली.

    - दीपाली सय्यद, इतकी नौटंकी करून पण तुमचे 'आदित्यजी' काय तुम्हाला हात देईना, अशी अखिल चित्रे यांची खोचक टीका

  • 23 May 2022 03:50 PM (IST)

    औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चासाठी महिलांची हंडा रॅली

    औरंगाबादः जल आक्रोश मोर्चासाठी महिलांची हंडा रॅली पारंपरिक वेशभूषा करत महिलांनी काढली हंडा रॅली औरंगाबाद शहरातील सिडको परिसरात काढली हंडा रॅली छोट्या छोट्या रॅली काढत महिला जल आक्रोश मोर्चाकडे होत आहेत रवाना थोड्याच वेळात सुरू होणार भाजपचा जल आक्रोश मोर्चा

  • 23 May 2022 03:47 PM (IST)

    नवनीत राणा यांच्या रडारवर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत

    नवी दिल्लीः विशेषाधिकार समितीसमोर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचेही नाव

    खासदार नवनीत राणा यांची माहिती

    पोलिस अधिकाऱ्यांसोबतच मुख्यमंत्री आणि संजय राऊत नवनीत राणा यांच्या रडारवर

  • 23 May 2022 03:42 PM (IST)

    संसदेच्या विशेष अधिकार समितीसमोर राणा यांचा जबाब नोंदविला

    नवी दिल्ली: खासदार नवनीत राणा यांचा जबाब नोंदवला

    संसदेच्या विशेष अधिकार समितीसमोर राणा यांनी आपलं म्हणणं मांडल

    45 मिनिटे समितीसमोर अन्यायाचा पाढा वाचला

    खार पोलीस ठाण्यातील वागणूक आणि पोलिसांकडून झालेल्या अन्यायाचे केले कथन

  • 23 May 2022 02:40 PM (IST)

    तुम्हाला न्याय हवा असेल तर महाविकास आघाडी विरोधात बोललं पाहिजे - गोपीचंड पडळकर

    - तुम्हाला न्याय हवा असेल तर महाविकास आघाडी विरोधात बोललं पाहिजे

    - केंद्र सरकारने कोरोना काळात गहू दिला, औषध दिलीत, या सरकारने काय दिल ?

    - लोकडाऊन काळात या सरकारने एक रुपयांची मदत केली नाही

    - ओबीसीचे आरक्षण या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं,

    - फक्त केंद्र सरकारच्या नावाने बोंबालायचे

    - हे सरकार मराठा आणि ओबीसीच्या विरोधातल आहे

    - परीक्षा घ्या म्हणून विद्यार्थ्यांना मोर्चा काढावा लागतो

    - या सरकारला फक्त वसुली करणं आणि पैसे गोळा करण्याचे काम सुरू आहे

  • 23 May 2022 02:03 PM (IST)

    मराठवाड़्यात मुख्यमंत्र्यांची आमदारांसोबत बैठक

    मराठवाड़्यात मुख्यमंत्र्यांची आमदारांसोबत बैठक

  • 23 May 2022 01:10 PM (IST)

    माझ्यावर जो काही अत्याचार झाला आहे - नवनीत राणा

    माझ्यावर जो काही अत्याचार झाला आहे - नवनीत राणा

    त्याबाबत मी तक्रार करणार आहे

    ज्यांनी आदेश दिले आहेत, त्याच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे

    मी न्याय मागायला जाणार

    लोकसभा अध्यक्षाकडे तक्रार करणार

    राजद्रोहाचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला

    त्यांची लेखी तक्रार देण्यात आली आहे

    निलंबन काही लोकांचं झालं आहे,

    मागासवर्गीय खासदारावरती पहिल्यांदा कारवाई करण्यात आली आहे

  • 23 May 2022 12:42 PM (IST)

    भाजप किरीट सोमय्या यांचा संजय राऊतांवरती मानहाणीचा दावा

    भाजप किरीट सोमय्या यांचा संजय राऊतांवरती मानहाणीचा दावा

    कुटुंबियांची बदनामी केल्याप्रकरणी मानहाणीचा दावा

    मुख्यमंत्री माफिया गॅंग आहे

    फक्त दहशत करीत आहेत

  • 23 May 2022 12:33 PM (IST)

    शिवसेना आमदार संजय रायमुलकर सह शेतकरी बसले उपोषणाला

    शिवसेना आमदार संजय रायमुलकर सह शेतकरी बसले उपोषणाला,

    समृद्धी महामार्गाच्या कार्यालयासमोर करत आहेत उपोषण,

    समृद्धी महामार्गामुळे मेहकर, लोणार तालुक्यातील खराब झालेले रस्ते तात्काळ दुरुस्ती करावी,

    तर खराब झालेले पांदन रस्ते आणि शेत रस्ते दुरुस्त करा,

    आणि जानेफळ बायपास कामाला सुरुवात करा,

    यासह विविध मागण्या घेऊन आमदार सह शेतकरी उपोषणाला बसले

  • 23 May 2022 12:33 PM (IST)

    पुण्यातील पुण्येश्वर मंदिराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

    पुण्यातील पुण्येश्वर मंदिराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

    वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मंदिर परिसराचा आढावा

    पोलीस कर्मचारी केले तैनात !

  • 23 May 2022 12:32 PM (IST)

    जी काही चर्चा झाली असेल संभाजीराजेंच्या कानावर घातली असेल

    जी काही चर्चा झाली असेल संभाजीराजेंच्या कानावर घातली असेल

    वेळ निघून गेली आहे

    त्यावर बोलणं मी उचीत नाही

    त्या चर्चेमध्ये काय झालंय हे माहित नाही

    उद्धव ठाकरे जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल

    काही कार्यक्रमासाठी ते माझ्याकडे आले होते

    उद्धव ठाकरेंच्या मताला सगळ्या आमदारांची अनुमती असेल

    मला जे वाटतं...याबाबतचा निर्णय...मुख्यमंत्री घेतील

  • 23 May 2022 12:12 PM (IST)

    शिवसेना ३० वर्षापासून जनतेला उल्लू बनवत आहे - इम्तियाज जलील

    शिवसेना ३० वर्षापासून जनतेला उल्लू बनवत आहे

    जेवढी शिवसेना दोषी आहे, तेवढंचं भाजप दोषी आहे

    अधिकारी सांगायचे आम्हाला खूप प्रेशर आहे

    आम्ही त्यांच्या मोर्चात सामील व्हायला तयार आहे

    हा निर्णय तुम्ही तीन वर्षापुर्वी का नाही घेतला

    दोघांच्या वादात औरंगाबादचं नुकसान झालं

    तिच्यामध्ये इतका रोष आहे की, आंदोलनात सहभागी झालेली लोक पाण्याचा प्रश्न सुटेल का ?

  • 23 May 2022 11:54 AM (IST)

    भाजप हा खोटारडा पक्ष आहे - नाना पटोले

    भाजप हा खोटारडा पक्ष आहे

    रोज पेट्रोल डिझेलमध्ये वाढ केली आहे

    ११ रूपये वाढले आणि त्यातले सात रूपये कमी केले आहेत

    केंद्राचं नुकसान केल नाही

    महागाईचा जो रेशो ठरला आहे

    केंद्रातलं सरकार करीत आहे

  • 23 May 2022 11:33 AM (IST)

    पुण्येश्वर मंदिराच्या मुक्ततेसाठी पुणेकरांना एकत्र येण्याचं आवाहन

    पुण्येश्वर मंदिराच्या मुक्ततेसाठी पुणेकरांना एकत्र येण्याचं आवाहन

    पुण्येश्वर मंदिर आणि नारायणेश्वर मंदिर या दोन मंदिराच्या जागेवर दर्गे उभारण्यात आले

    मनसे नेते अजय शिंदेंचा दावा

    पुण्येश्वर या नावावरूनच पुणे हे नावं देण्यात आलं

    आम्ही पुरातत्त्व विभागाला पत्र दिलं होतं

    त्यांनी महापालिकेला पत्र लिहून त्या ठिकाणी मंदिराचे अवशेष असल्याचं सांगितलं होतं

    तरीही पोलीस संरक्षणात बांधकाम झालं

    या मंदिराच्या मुक्ततेसाठी आमचा लढा सुरू आहे

    अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात आलेल्या दोन मुस्लिम सरदारांनी या मंदिरांवर आक्रमण केलं

    आमच्यासोबत अनेक संघटना ही यासाठी काम करतायेत

    आमचा लढा सुरूच राहणार

    राम मंदीरासाठी जसं आंदोलन पाहायला मिळालं तसं पाहायला मिळेल

    अजय शिंदेंची माहिती

  • 23 May 2022 11:33 AM (IST)

    शिवसेना मंत्री संदीपान भुमरे यांची भाजपच्या मोर्चावर घणाघाती टीका

    शिवसेना मंत्री संदीपान भुमरे यांची भाजपच्या मोर्चावर घणाघाती टीका

    भाजपचा आजचा मोर्चा म्हणजे फक्त स्टंटबाज

    निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजप स्टंटबाजी करत आहे

    औरंगाबाद शहराची सुरू असलेली पाणीपुरवठा योजना ठप्प करण्यासाठी भाजपचा मोर्चा

    मोर्चाला शहरातून नाही तर ग्रामीण भागातून महिला आणल्या जात आहेत

    संदीपान भुमरे यांनी केली भाजपच्या मोर्चावर टीका

  • 23 May 2022 11:32 AM (IST)

    नवनीत राणा काही वेळातच संसदेत दाखल होणार

    नवनीत राणा काही वेळातच संसदेत दाखल होणार

    संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर मांडणार आपलं म्हणणं

    मुंबईतल्या अटकनाट्यनंतर तक्रार समिती समोर करणार

    खासदार नवनीत राणा काही वेळातच आपल्या निवासस्थाना मधून रवाना होणार

    संसदेमधील उपसचिव बाला गुरु यांच्यासमोर नवनीत राणा आपले म्हणणे मांडणार

    दुपारी बारा वाजता राणा यांना संसदेत येण्यास सांगितले आहे

  • 23 May 2022 11:07 AM (IST)

    पुणेश्वर आणि नागेश्वर मंदीरात मशिदी बांधल्याचा मनसे नेत्यांचा दावा

    मशिदी उभारण्यात आल्या

    पुण्यात दोन मंदीराच्या ठिकाणी मशिदी बांधले गेले

    नागेश्वर मंदीर एकरात होती

    तुम्ही नदी पात्रात पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल

    पुणेश्वर आणि नागेश्वर मंदीरात मशिदी बांधल्याचा मनसे नेत्यांचा दावा

  • 23 May 2022 11:02 AM (IST)

    शिवसेना दोन जागा लढवणार आहे

    शिवसेना दोन जागा लढवणार आहे

    शिवसेना एक राजकीय पक्ष आहे

    दोन्ही ठिकाणी आम्ही शिवसेनेचे उमेदवार असतील

  • 23 May 2022 10:31 AM (IST)

    संजय राऊत लाईव्ह

    शिवसेना राज्यसभेच्या दोनही जागा लढवणार

    अपक्ष उमेदवार कोणीही असो पाठिंबा नाही - राऊत

    संभाजी राजेंच्या अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर राऊतांची प्रतिक्रिया

    संभाजी राजे अपक्ष लढणार आहेत तर त्यांच्याकडे 42 मत आहेत का? - राऊत

  • 23 May 2022 09:31 AM (IST)

    औरंगाबादमध्ये भाजपच्या जल आक्रोष मोर्चाले पोस्टर फाडण्यात आले…

    औरंगाबादमध्ये भाजपच्या जल आक्रोष मोर्चाले पोस्टर फाडण्यात आले…

    - औरंगाबादमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जल आक्रोश यात्रेपूर्वी शिवसैनिकांनी पोस्टर फाडल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप...

    - औरंगाबादमध्ये फडणवीसांचा आज हांडी मोर्चाही असून, त्याबाबत भाजप कार्यकर्त्यांनी पोस्टर लावले होते, जे फाडण्यात आल्याचे व्हीजियो समोर आलेयत….

    - याआधी भाजपच्या पोस्टर्सवर शिवसेनेचे पोस्टरही लावण्यात आल्याचा आरोप होतोय… पोस्टर फाडणार्यांचा शोध सुरू…

  • 23 May 2022 09:30 AM (IST)

    गडचिरोली भामरागड तालुक्यातील मुख्य मार्गावर अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात गावकऱ्यांच्या निषेध

    गडचिरोली भामरागड तालुक्यातील मुख्य मार्गावर अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात गावकऱ्यांच्या निषेध

    भामरागड तालुक्याची लोकसंख्या 35 हजार असून एक छोटा व मागासलेला तालुका म्हणून ओऴख आहे

    छोटे उद्योग धंदे करून येथील आदिवासी व इतर आपला उदरनिर्वाह करीत असतात

    सव्वीस तारखेला राज्यपालांच्या दौऱ्याच्या कारण देत मुख्य मार्गावरील अतिक्रमणे दुकाने तोडण्यात आली

    या निषेधार्थ गावकरी निषेध करून जिल्हाधिकारी यांना भेटणार आहेत

    आजपासून भामरागड व्यापारी संघटनेकडून भामरागड तालुका बंद पुकारला

  • 23 May 2022 09:26 AM (IST)

    छत्रपती संभाजी राजेंच्या संदर्भातले जे निर्णय आहेत, ते पक्षश्रेष्ठी घेतील - राजेश टोपे

    छत्रपती संभाजी राजेंच्या संदर्भातले जे निर्णय आहेत, ते पक्षश्रेष्ठी घेतील

    एक नक्की आहे की, अनिल देशमुखांचा तो मतदार संघ आहे...

    त्यांनी एक सिनिअर पद्धतीने काम केलं आहे

    विकासाला कुठेही थंडपणा येता कामा नये

    त्याचे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे

    जैस्वाल माझा चांगला मित्र आहे, त्यांच्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे

  • 23 May 2022 08:59 AM (IST)

    राजधानी नवी दिल्लीतील जनजीवन विस्कळीत, मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली

    राजधानी नवी दिल्लीतील जनजीवन विस्कळीत

    पहाटे पासून अनेक भागात ट्राफिक जाम

    मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली

    राजधानी नवी दिल्लीतील तापमानात मोठी घसरण

    अकरा अंशांनी सकाळी झाली तापमानात घसरण

    उष्णते पासून राजधानीकरांची सुटका

    पुढील तीन तास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

  • 23 May 2022 08:58 AM (IST)

    औरंगाबादेत भाजपच्या मोर्चावरून शिवसेना आणि भाजप मध्ये घमासान चर्चा सुरू आहे

    अँकर :- औरंगाबादेत भाजपच्या मोर्चावरून शिवसेना आणि भाजप मध्ये घमासान चर्चा सुरू आहे. औरंगाबाद शहराच्या पाण्याच्या प्रश्नाला शिवसेने इतकीच भाजप जबाबदार आहे असा आरोप सेनेचा आहे तर शिवसेनेने औरंगाबाद शहराचं वाटोळं केलं असा पलटवार भाजपने केलाय शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडीले आणि भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यात आज पाणी प्रश्नावरून घमासान चर्चा झडली आहे. बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे यांनी

  • 23 May 2022 08:57 AM (IST)

    जिल्हा बँकेचे 415 कर्मचारी अडचणीत

    नाशिक - जिल्हा बँकेचे 415 कर्मचारी अडचणीत

    - जिल्हा औद्योगिक न्यायलयाने कायम करण्याचा दावा फेटाळला

    - कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला

    - 2015 - 16 आर्थिक वर्षात केली होती विवध पदांसाठी भरती

  • 23 May 2022 07:44 AM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे पेपर मिल लाकूड आगाराला लागलेली आग अद्याप सुरूच

    चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे पेपर मिल लाकूड आगाराला लागलेली आग अद्याप सुरूच,

    जिल्हा व आसपासच्या अग्निशमन यंत्रणांच्या 40 बंबानी 350 हुन अधिक  फे-या करूनही आग धुमसणे जारीच,

    रात्रभर चालले आग विझविण्याचे कार्य, 20 एकरावर पसरलेल्या लाकूड डेपोची झाली राख,

    50 कोटींहून अधिक रकमेच्या साठ्याचे नुकसान झाल्याचा अंदाज,

    पहाटे या महामार्गावरील वाहतूक करण्यात आली सुरू,

    याच डेपोच्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाला लागली होती आग,

    मात्र साठा नसल्याने पंप 3 दिवसापासून बंद असल्याने मोठी हानी टळली,

    प्रचंड आग- सोसाट्याचा वारा आणि जलस्त्रोतापासून जास्त असलेले अंतर यामुळे अग्निशमन बंबाना पाणी भरून आणण्यासाठी लागतोय वेळ,

    सकाळपासून अग्निशमन कार्याने घेतला वेग

  • 23 May 2022 07:44 AM (IST)

    अकरावी प्रवेशाला आजपासून सुरुवात

    - अकरावी प्रवेशाला आजपासून सुरुवात,

    - 23 ते 27 मे दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सराव करता येणार आहे,

    - 30 मेपासून प्रवेश अर्जाचा पहिला भाग तर 10 वीच्या निकालानंतर प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरता येणार,

    - शिक्षण विभागाची माहिती

  • 23 May 2022 07:25 AM (IST)

    1 जून पासुन अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेला होणार प्रारंभ..

    संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेसाठी 171 केंद्रावर राहनार को-ऑफिसर्स...

    1 जून पासुन अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेला होणार प्रारंभ..

    विद्यापीठाची परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीनेच होणार....

    उन्हाळी परीक्षेत पावणे दोन लाख विद्यार्थी देणार परीक्षा....

  • 23 May 2022 07:25 AM (IST)

    शेतकऱ्याला महापूरुषाचा दर्जा, नागपूर जिल्ह्यातील फेटरीत चक्क शेतकऱ्याचा पुतळा

    - शेतकऱ्याला महापूरुषाचा दर्जा, नागपूर जिल्ह्यातील फेटरीत चक्क शेतकऱ्याचा पुतळा

    - ‘देशाचा पोशिंदा शेतकरी’ पुतळ्याचं लोकार्पण

    - मंत्री सुनील केदार यांच्या प्रेरणेतून उभारला शेतकऱ्याचा पुतळा

    - ‘कृषीप्रधान भारतात अन्नदाता शेतकऱ्याचा पुतळा’

    - शेतकऱ्यांच्या कष्टाला सन्मान देणारा शेतकरी पुतळा

  • 23 May 2022 06:37 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये दाखल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये दाखल

    जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून मोदी जपान दौऱ्यावर

    आज पासून 2 दिवसीय जपान दौरा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे क्वाड लीडर्स समिटमध्ये आज सहभागी होणार

  • 23 May 2022 06:36 AM (IST)

    उत्तर भारतात पावसाची हजेरी

    उत्तर भारतात पावसाची हजेरी

    सकाळपासून राजधानी नवी दिल्लीत पावसाची हजेरी

    अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस

    उष्णतेपासून आज उत्तर भारतीयांना मिळणार मोठा दिलासा

    नोएडा, गुडगाव भागातही पावसाची हजेरी

  • 23 May 2022 06:36 AM (IST)

    कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    एका पाळीव कुत्र्यानं इमारतीतल्या एका लहान मुलावर हल्ला करून त्याचा चावा घेतल्याचा प्रकार बदलापुरात घडलाय. याप्रकरणी या लहान मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरून कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Published On - May 23,2022 6:33 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.