Maharashtra corona update | राज्यात रुग्णसंख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही शंभरच्या खाली, दिवसभरात 6,270 कोरोनाग्रस्तांची नोंद

आजही (21 जून) राज्यात रविवारच्या तुलनेत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाली असून आज दिवसभरात कोरोनाचे 6,270 नवे रुग्ण आढळले आहेत.

Maharashtra corona update | राज्यात रुग्णसंख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही शंभरच्या खाली, दिवसभरात 6,270 कोरोनाग्रस्तांची नोंद
CORONA
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 9:40 PM

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसत आहे. आजही (21 जून) राज्यात रविवारच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत घट झाली असून आज दिवसभरात कोरोनाचे 6,270 नवे रुग्ण आढळले आहेत. काल राज्यात 9361 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली होती. (Maharashtra Corona cases decreasing rapidly Today found Six Thousand new Corona patients know latest Corona update in Marathi Mumbai)

दिवसभरात फक्त 94 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

राज्यात आज दिवसभरात कोरोनाचे 6270 नवे रुग्ण आढळून आले. तर एकूण 94 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागील कित्येक महिन्यानंतर मृतांचा आकडा हा शंभरच्या खाली आला आहे. रुग्णसंख्या घटल्यामुळे मृतांचा आकडाही कमी होताना दिसत असून हे दिलासादायक चित्र असल्याचे आरोग्य तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. आज दिवसभरात 13,758 जण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यात 1,24,398 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर आतापर्यंत एकूण 1,18,313 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

मुंबईत दिवसभरात 521 कोरोनाग्रस्तांची नोंद

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्येही कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये 521 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर दिवसभरात 685 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर हा 95 टक्क्यांवर आला असून सध्या येथे एकूण 14,637 कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणास मान्यता : राजेश टोपे

दरम्यान, अठरा वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार असल्याची घोषणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली. “लसीकरणाच्या कामाला वेग द्यायचा आहे. त्यामुळे अठरा वर्षांपासून पुढच्या सर्व वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला आपण मान्यता देत आहोत. मी सांगू इच्छितो की सर्व तरुण-तरुणांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी. सर्वांना लसीकरण करता येणे आता शक्य आहे,” असे राजेश टोपे म्हणाले.

इतर बातम्या :

Maharashtra Coronavirus LIVE Update : ठाणे कोविड सेंटरमध्ये आणखी एक भ्रष्टाचार, मनसे नेते अविनाश जाधव यांचा आरोप 

Maharashtra Corona Vaccination : महाराष्ट्रात आता 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मोठी घोषणा

(Maharashtra Corona cases decreasing rapidly Today found Six Thousand new Corona patients know latest Corona update in Marathi Mumbai)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.