Maharashtra corona guidelines for Gudi Padwa : गुढीपाडव्यासाठी राज्य सरकारची नियमावली

सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. Maharashtra corona guidelines for Gudi Padwa

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:13 PM, 12 Apr 2021
Maharashtra corona guidelines for Gudi Padwa : गुढीपाडव्यासाठी राज्य सरकारची नियमावली
Maharashtra corona guidelines for Gudi Padwa

मुंबई : गुढीपाडव्याच्या सणानिमित्तानं राज्य सरकारनं नवी नियमावली जारी केलीय. या नियमावलीनुसार सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण (Gudi Padwa साजरा करणे अपेक्षित असल्याचं म्हटलं आहे. तसेच कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी घालण्यात आलीय. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असंही सरकारकडून ( State Government) स्पष्ट करण्यात आलंय. (Maharashtra corona guidelines for Gudi Padwa: State Government Rules for Gudi Padwa)

गुढीपाडवा सण साध्या पद्धतीनं साजरा करा

मराठमोळा सण असलेला गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे यंदाही 13 एप्रिल 2021 रोजी साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा सण साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं शासन आदेशानुसार सूचित करण्यात आलंय. राज्यात काही ठिकाणी गुढीपाडवा हा सण पारंपरिक वेशभूषा परिधान करून आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करून नवीन वर्ष म्हणून साजरा करण्यात येतो.

पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली आणि मिरवणुका काढू नका

कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली आणि मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. सार्वजनिक ठिकाणी एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिन्स्टन्सिंगचे आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून घरगुती गुढी उभारून सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा.

आरोग्यविषयक उपक्रम/ रक्तदान शिबिरांसाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक

गढीपाडवा सणाच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/ रक्तदान शिबिरे स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने आयोजित करता येतील. तसेच स्वच्छतेबाबत जनजागृतीही करता येईल. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना कोविड विषयक सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही. Maharashtra corona guidelines for Gudi Padwa: State Government Rules for Gudi Padwa

संबंधित बातम्या

लोकांना घरात बंद करून, काही साध्य होणार नाही, प्रभावी उपाययोजना करा; भाजपचा लॉकडाऊनला विरोध कायम

चैत्र नवरात्रीच्या व्रतात शरीराला हायड्रेट ठेवतील ‘हे’ पदार्थ, उपवसातही करू शकता सेवन!

Maharashtra corona guidelines for Gudi Padwa: State Government Rules for Gudi Padwa