राज्यातील कोरोनामुक्तांची संख्या साडे तेरा लाखांवर, रिकव्हरी रेट 86 टक्क्यांवर

राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचंही प्रमाणही वाढलं आहे. सध्या राज्यातील कोरोना रिकव्हरी रेट हा 86 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यातील कोरोनामुक्तांची संख्या साडे तेरा लाखांवर, रिकव्हरी रेट 86 टक्क्यांवर

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, दिलासादायक बाब (Corona Recovery Rate Increases) म्हणजे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचंही प्रमाणही वाढलं आहे. सध्या राज्यातील कोरोना रिकव्हरी रेट हा 86 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत साडे तेरा लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत (Corona Recovery Rate Increases).

राज्यात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आज दिवसभरात 14 हजार 238 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.65 टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या साडे तेरा लाखांवर गेली आहे. तर, राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन 1 लाख 85 हजार 270 एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 80 लाख 69 हजार 100 नमुन्यांपैकी 15 लाख 86 हजार 321 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सध्या राझ्यात 15 लाख 86 हजार 321 जण कोरोना रुग्ण आहेत. राज्यात 23 लाख 95 हजार 552 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 23 हजार 749 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 250 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.65 टक्के एवढा आहे.

कोरोना चाचण्या वाढव्या, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांचं पत्र

कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करा, असा सातत्याने आग्रह करत असताना प्रत्यक्षात मात्र राज्यातील 92 हजार प्रतिदिन चाचण्यांचे प्रमाण आता 75 हजार चाचण्या प्रतिदिन असे झाले आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहेत. याबाबत त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

मुंबईत सुद्धा संसर्गाचे प्रमाण हे 2 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासंदर्भात आणखी एक पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

Corona Recovery Rate Increases

संबंधित बातम्या :

दसऱ्यापासून राज्यभरात जिम, व्यायामशाळा सुरू होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *