Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 6,741 नवे कोरोनाबाधित, तर 4,500 रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात आज (14 जुलै) दिवसभरात तब्बल 6 हजार 741 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update).

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 6,741 नवे कोरोनाबाधित, तर 4,500 रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी सरकार आणि प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहेत (Maharashtra Corona Update). महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र, तरीही कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. राज्यात आज (14 जुलै) दिवसभरात तब्बल 6 हजार 741 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 67 हजार 665 वर पोहोचला आहे (Maharashtra Corona Update).

दिवसभरात 4 हजार 500 रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात दिवसभरात 4 हजार 500 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 1 लाख 49 हजार 7 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 7 हजार 665 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.67 टक्क्यांवर पोहोचलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

राज्यात आज दिवसभरात 213 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये फक्त मुंबईतील 70 तर ठाणे जिल्ह्यातील 64 रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर हा 4 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 10 हजार 695 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 13 लाख 72 हजार नमुन्यांपैकी 2 लाख 67 हजार 665 नमुने पॉझिटिव्ह (19.49 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 98 हजार 854 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 42 हजार 350 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात गेल्या सहा दिवसात किती रुग्ण वाढले?

8 जुलै 2020 – 6 हजार 603 रुग्ण

9 जुलै 2020 – 6 हजार 875 रुग्ण

10 जुलै 2020 – 7 हजार 862 रुग्ण

11 जुलै 2020 – 8 हजार 139 रुग्ण

12 जुलै 2020 – 7 हजार 827 रुग्ण

13 जुलै 2020 – 6 हजार 497 रुग्ण

राज्यात कुठे किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई114284870746353
पुणे (शहर+ग्रामीण)89231373112099
ठाणे (शहर+ग्रामीण)93342588362585
पालघर 156199323327
रायगड1653810858373
रत्नागिरी170092662
सिंधुदुर्ग3682717
सातारा38722169138
सांगली234594063
नाशिक (शहर +ग्रामीण)147508931462
अहमदनगर (शहर+ग्रामीण)4740276061
धुळे30611943101
जळगाव 108267385518
नंदूरबार 62941431
सोलापूर91294615504
कोल्हापूर 50601590105
औरंगाबाद138968250482
जालना1940143474
हिंगोली 55042512
परभणी64333324
लातूर 2067102089
उस्मानाबाद 97151845
बीड75726920
नांदेड 169574675
अकोला 25931951115
अमरावती 2034137060
यवतमाळ 94350827
बुलडाणा 128368539
वाशिम 59136112
नागपूर4835193073
वर्धा 1961024
भंडारा2451942
गोंदिया 2882303
चंद्रपूर4302610
गडचिरोली2692251
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)398048
एकूण42211825612814994
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *