11 वर्षांच्या दोघी मुलींवर अत्याचार, भंडाऱ्यात 55 वर्षीय आरोपीला अटक

पीडित अल्पवयीन मुलींच्या तक्रारीवरुन लाखांदूर पोलिसांनी आरोपीविरोधात अत्याचारासह अन्य विविध कलमांच्या अन्वये आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करुन अटक केली आहे.

11 वर्षांच्या दोघी मुलींवर अत्याचार, भंडाऱ्यात 55 वर्षीय आरोपीला अटक
भंडारा पोलीस स्टेशन

तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा : शिवलेले कपडे आणायला जात असलेल्या दोन 11 वर्षीय अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. 55 वर्षीय वासनांध इसमाने दोघींना जबरदस्ती घरी ओढत नेत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील ओपारा येथे घडली.

या प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलींच्या तक्रारीवरुन लाखांदूर पोलिसांनी आरोपीविरोधात अत्याचारासह अन्य विविध कलमांच्या अन्वये आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करुन अटक केली आहे. मधुकर हरी रंगारी (वय 55 वर्ष, रा. ओपारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास अकरा वर्षांच्या दोघी अल्पवयीन मुली शिलाई केलेले सलवार आणि अन्य कपडे आणण्यासाठी गावातीलच एका घरी जात होत्या. यावेळी आरोपीने दोन्ही अल्पवयीन मुलींना स्वतःच्या घरी जबरदस्ती खेचून नेले. त्यानंतर मारहाण करत दोन्ही अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले.

शेजाऱ्यांना आवाज आल्याने घटना उघड

अल्पवयीन मुलींच्या ओरडण्याचे आवाज येताच शेजाऱ्यांनी आरोपीच्या घरातील खिडकीतून डोकावून पाहिलं असता हा प्रकार उघड झाला. या घटनेची माहिती पीडित अल्पवयीन मुलींच्या पालकांना होताच त्यांनी तात्काळ लाखांदूर पोलिस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

दोन्ही पीडित अल्पवयीन मुलींची वैद्यकीय तपासणी करुन अहवालावरून लाखांदूर पोलिसांनी आरोपी विरोधात अत्याचार आणि अन्य विविध कलमांसह पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलिस करत आहेत.

संबंधित बातम्या :

कार नीट चालवण्यास सांगितल्याचा राग, पुण्यात BMW चालकाची तरुणीला भररस्त्यात दांडक्याने मारहाण

दारुड्या काकाचा सात वर्षांच्या पुतणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, स्थानिकांकडून चोप

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI