चीनकडून महाराष्ट्रात पाच दिवसात 40 हजार 300 वेळा सायबर हल्ल्याचा प्रयत्न, सायबर सेलकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनकडून सायबर हल्ला होण्याच्या धोका आहे (Maharashtra cyber cell warns about cyber attack).

चीनकडून महाराष्ट्रात पाच दिवसात 40 हजार 300 वेळा सायबर हल्ल्याचा प्रयत्न, सायबर सेलकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Follow us
| Updated on: Jun 24, 2020 | 12:23 AM

नवी मुंबई : भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनकडून सायबर हल्ला होण्याच्या धोका आहे (Maharashtra cyber cell warns about cyber attack). त्यामुळे महाराष्ट्र सायबर विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चीनकडून फिशिंग तंत्राच्या माध्यमातून सायबर हल्ले केले जाऊ शकतात, असं महाराष्ट्र सायबर सेलकडून सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्र सायबर सेलचे स्पेशल आयजी यशस्वी यादव यांनी राज्यातील नागरिकांना कुठलाही अनोळखी ईमेल, अटॅचमेंट उघडू नये, असा सल्ला दिला आहे. याशिवाय आपली वैयक्तिक आणि बँक संबंधित माहिती कुणाहीसोबत शेअर करु नये, अशी सूचना देण्यात आली आहे (Maharashtra cyber cell warns about cyber attack).

महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच दिवसात 40 हजार 300 वेळा सायबर हल्ल्याचा प्रयत्न केला गेला. चीनच्या चेंगदू भागातून सायबर अटॅकचे प्रयत्न करण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे. या हल्ल्याचे प्रयत्न करणारे इन्फ्रास्ट्रक्चर, बँकिंग सारख्या विभागांना टार्गेट करत आहेत.

हेही वाचा : Cyber Attack Alert | ‘या’ ईमेल आयडीना बळी पडू नका, भारतावर मोठ्या सायबर हल्ल्याचा इशारा

सध्याच्या काळात भारत-चीन सीमावाद पाहता, चिनी हॅकर्स आता भारतावर मोठा सायबर अटॅक करण्याची शक्यता असल्याचे समजते. हा सायबर हल्ला करण्यासाठी चिनी हॅकर्स एका ईमेलचा वापर करत आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असं आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आलं आहे.

चीनच्या हॅकर्सनी 20 लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचा प्लॅन केला आहे. यामध्ये एक ईमेल आयडीदेखील समोर आला आहे. चीनी हॅकर्स ncov2019@gov.in या ईमेल आयडीच्या माध्यमातून भारतावर सायबर हल्ला करणार आहे. या सायबर हल्ल्यामध्ये भारतीयांची खासगी आणि आर्थिक माहिती उघड होण्याची भीती आहे.

हॅकर्सकडून सर्वसामान्य नागरिकांना आकर्षित करणारा किंवा आर्थिक प्रलोभन देणारा विषय [Email Subject] असलेला ईमेल पाठवला जाईल. जसे की Free Covid Test, Free Covid-19Kit, त्या इमेलमध्ये काही लिंक क्लिक करण्यासाठी किंवा अटॅचमेंट डाउनलोड करण्यासाठी सांगितले असेल. हा खोटा इमेल covid2019@gov.in / ncov2019.gov.in अशा प्रकारच्या खोट्या सरकारी ईमेलवरुन पाठवल्याचे भासवले जाऊ शकते.

महाराष्ट्र सायबर सेलकडून अशा प्रकारच्या कोणत्याही ईमेलला प्रतिसाद देऊ नका, असं आवाहन करण्यात आलं आहे. covid2019@gov.in किंवा ncov2019.gov.in या ईमेल आयडीने जर कोणताही ईमेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करु नये किंवा त्यांना कोणताही रिप्लाय देऊ नये. सायबर सुरक्षा संगणक आणि मोबाईलसाठी एक चांगला, अपडेटेड आणि अधिकृत [Paid/Licensed] अँन्टी व्हायरस वापराव करावा, अशी सूचना महाराष्ट्र सायबर सेलकडून देण्यात आली आहे.

सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय करावं?

  • संगणकातील सॉफ्टवेअर आणि मोबाईलमधील अ‍ॅप नियमितपणे अपडेट करा.
  • कठीण आणि मोठे पासवर्ड ठेवा. ते नियमितपणे बदलत राहा, तुमच्या महत्त्वाच्या माहितीचा नियमित बॅकअप घ्या.
  • प्रलोभने देणारे संशयास्पद ईमेल उघडू नये. त्यातील लिंकवर क्लिक करु नये. त्यातील अटॅचमेंट डाउनलोड करु नये आणि उघडू नये.
  • खोट्या आणि प्रलोभने देणारे ईमेल आणि वेबसाईट पासून सावध राहा.
  • असुरक्षित आणि संशयास्पद वेबसाईटवर तुमची महत्वाची माहिती जसे कि युजर नेम, पासवर्ड, कार्ड नंबर, पिन नंबर, ओटीपी तसेच इतर गोपनीय माहिती टाकू नका.
Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.