शिवरायांचा वारसा ते देशाची आर्थिक राजधानी, सगळं काही आपल्या महाराष्ट्रातच!

मुंबई : 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. महाराष्ट्र या अद्भुत नावासारखीच परंपरा या राज्याला आहे. या राज्याने संत दिले, महापुरुष दिले आणि अनेक नैसर्गिक गोष्टीही दिल्या. महाराष्ट्रामध्येच जगभरातील कलाकारांना आकर्षिक करणारी बॉलिवूड नगरीही आहे. तर उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल यासह …

शिवरायांचा वारसा ते देशाची आर्थिक राजधानी, सगळं काही आपल्या महाराष्ट्रातच!

मुंबई : 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. महाराष्ट्र या अद्भुत नावासारखीच परंपरा या राज्याला आहे. या राज्याने संत दिले, महापुरुष दिले आणि अनेक नैसर्गिक गोष्टीही दिल्या. महाराष्ट्रामध्येच जगभरातील कलाकारांना आकर्षिक करणारी बॉलिवूड नगरीही आहे. तर उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल यासह विविध राज्य आणि बांगलादेश, नेपाळ या देशातील लोकांना रोजगार देणारी शहरंही महाराष्ट्रातच आहेत.

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात 79.80 टक्के हिंदू, 11.50 टक्के मुस्लीम, 5.8 टक्के बुद्ध, 1.2 टक्के जैन, 1 टक्के ख्रिश्चन, 0.2 टक्के सिख आणि इतर धर्माचे 0.5 टक्के लोक महाराष्ट्रात राहतात. तर यामध्ये मराठी बोलणारांचं प्रमाण 68.93 टक्के, हिंदी 12.89 टक्के, उर्दू 6.71 टक्के, गुजराती 2.11 टक्के, तेलगू 1.18 टक्के आणि इतर भाषा बोलणारे 8.18 टक्के लोक राहतात. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज्याविषयी काही खास गोष्टी…

शिवरायांचा वारसा

जे कुणाकडेही नाही ते महाराष्ट्राकडे आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचा जन्म महाराष्ट्राच्या भूमीत झाला. शिवरायांचे गड-किल्ले ही महाराष्ट्राची ओळख आहे.

मुंबई फिल्म सिटी

जगभरातील पर्यटकांचं आकर्षण असणारी बॉलिवूड नगरी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत आहे. दिग्गज कलाकारांचा वारसा असलेलं बॉलिवूड जगभरातील कलाकारांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे.

गणेशोत्सव

महाराष्ट्राची सांस्कृतीक परंपराही जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात साजरा होणारा गणेशोत्सव भारतातील विविध राज्यांसह ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांमध्येही दरवर्षी साजरा केला जातो.

अजिंठा, वेरुळ लेण्या

आशियातील सर्वात वेगाने वाढणारं शहर आणि मराठवाड्याची राजधानी औरंगाबादजवळील अजिंठा आणि वेरुळ लेण्या हे जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. शिवाय 52 दरवाजांचं शहर म्हणून ओळख असलेल्या शहरातील ऐतिहासिक गोष्टीही पर्यटकांना आकर्षित करतात.

समुद्रकिनारा

महाराष्ट्राला 720 किमी समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे कोकण, मुंबई या भागात यामुळे पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात चालना मिळते. शिवाय कोकणातील सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात.

चवदार पदार्थांची मेजवाणी

महाराष्ट्र खाण्याच्या बाबतीत कधीच कुणालाही नाराज करत नाही. कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ, नागपूरची ऑरेंज बर्फी, सावजी मटण, कोकणातील समुद्री पदार्थ, मुंबईचा वडापाव, श्रीखंड, पुरण-पोळी हे पदार्थ बाहेरच्या पर्यटकांना वारंवार महाराष्ट्राची आठवण काढायला भाग पाडतात.

पहिली रेल्वे

भारतावर इंग्रजांचं राज्य असताना आशिया खंडातली पहिली रेल्वे भारतात धावली. 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे या दरम्यान रेल्वे सुरु झाली.

सर्वाधिक प्रामाणिकपणा

देशातील करामध्ये सर्वाधिक योगदान महाराष्ट्राचं आहे. महाराष्ट्रातील करदाते प्रामाणिकपणे कर भरतात. सर्वाधिक कर भरणाऱ्या शहरांमध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे.

रस्त्यांचं सर्वात मोठं जाळं

व्यवसायासाठी महाराष्ट्र ही सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. त्यामागचं कारणही तसंच आहे. महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी ही सर्वोत्तम आहे. महाराष्ट्रात 267500 किमी एवढं देशात सर्वाधिक रस्त्यांचं जाळं आहे.

सर्वाधिक परकीय गुंतवणूक

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत उद्योग, रोजगार, जीडीपी या सगळ्यांच्याच बाबतीत महाराष्ट्र अव्वल आहे. देशाच्या उद्योगामध्ये एकट्या महाराष्ट्राचं योगदान 25 टक्के आहे. सर्वाधिक परकीय गुंतवणूक असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. जानेवारी 2000 ते डिसेंबर 2011 या काळात मॉरिशिअसहून 39 टक्के, सिंगापूर 10 टक्के, ब्रिटन 10 टक्के, अमेरिका 7 टक्के आणि नेदरलँडमधून 5 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *