LIVE : शेतकऱ्यांचा मोर्चा नाशिकमधून मुंबईच्या दिशेने रवाना

  • चंदन पुजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक
  • Published On - 7:53 AM, 21 Feb 2019
LIVE : शेतकऱ्यांचा मोर्चा नाशिकमधून मुंबईच्या दिशेने रवाना

नाशिक : राजधानी मुंबईवर धडकण्यासाठी पुन्हा एकदा ‘लाल वादळ’ म्हणजेच आदिवासी आणि शेतकरी बांधवांचा लाँग मार्च नाशिकमधून निघाला आहे. नाशिकमधील मुंबई नाका बसस्थानक परिसरात राज्यभरातून हजारो आदिवासी, शेतकरी जमले आणि तिथून राजधानी मुंबईच्या दिशेने मोर्चा निघाला आहे. आपल्या मागण्या मान्य न झाल्यामुळे हे सर्व शेतकरी मंत्रालयावर जाऊन धडकणार आहेत आणि आपल्या सरकार दरबारी मांडणार आहेत.

LIVE UPDATE :

  • नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ लाँग मार्चमधील शेतकऱ्यांची भेट घेणार, थोड्याच वेळात भुजबळ मोर्चात सामील होणार
  • शेतकऱ्यांचा मोर्चा नाशिकमधून मुंबईच्या दिशेने रवाना

 

गिरीश महाजन यांच्योसोबतची चर्चा निष्फळ

किसान मोर्चा शिष्टमंडळ आणि गिरीश महाजन यांच्यात सुमारे दोन तास चाललेली चर्चा निष्फळ ठरली असून किसान मोर्चा आपल्या लॉंग मार्चवर ठाम आहे. सरकारकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचं किसान सभेने स्पष्ट केलं आहे.

गिरीश महाजन काय म्हणाले?

शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. किसान सभेच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र उर्वरित मागण्यांसंदर्भात तात्काळ कारवाई करु, असे महाजन म्हणाले.

दुसरीकडे, किसान मोर्चाने मात्र लॉंग मार्चवर आपण ठाम असून सरकारने लेखी हमी दिल्यास आंदोलन स्थगित करु, असेही किसान सभेने स्पष्ट केलं.