अदानी, अंबानींच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार, धुळ्यातून 2000 शेतकऱ्यांची मुंबईकडे कूच

कृषी कायद्यांना विरोध म्हणून शेतकऱ्यांचा मोर्चा अदानी आणि अंबानी यांच्या कार्यालयावर धडकणारआहे. (farmers protest ambani adani)

अदानी, अंबानींच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार, धुळ्यातून 2000 शेतकऱ्यांची मुंबईकडे कूच
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 6:33 PM

धुळे : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची धग महाराष्ट्रातही जाणवू लागली आहे. दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि कृषी कायद्यांना विरोध म्हणून शेतकऱ्यांचा मोर्चा अदानी आणि अंबानी यांच्या कार्यालयावर धडकणारआहे. यासाठी धुळ्यातून 2000 शेतकऱ्यांनी मुंबईकडे कूच केले आहे. हा मोर्चा लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला आहे. (maharashtra farmers will protest in front of ambani and adani office)

मोदी सरकारचे कृषी कायदे हे अंबानी (Mukesh Ambani) यांच्यासारख्या उद्योगपतींच्या भल्यासाठी आहेत. मुकेश अंबानी यांची भूक वाढली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांवर नको असलेली विधेयके (Farm laws) लादली जात असल्याचा आरोप खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी 16 डिसेंबर रोजी केला होता. तसेच, 22 डिसेंबर रोजी मुकेश अंबानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आता धुळ्यातून लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रणेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 2000 शेतकरी मुंबईकडे येत आहेत.

संपूर्ण महाराट्रातून हा मोर्चा निघत आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातील शेतकरी धुळे येथील गुरुद्वारा येथे जमून ते नाशिक येथून मुंबई कडे कूच करत आहेत. या मोर्चाला  27 शेतकरी आणि इतर संघटनांनी पाठींबा दिला आहे. यावेळी शेकऱ्यांकडून कृषी कायदेविरोधी घोषणा दिल्या जात आहेत. तसेच केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी त्यांच्याकूडन केली जात आहे. तसेच, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागाण्या मान्य केल्या नाहीत तर या आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यात येईल असा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला आहे.

राजू शेट्टी काय म्हणाले ?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्यांना जाहीर विरोध केलेला आहे. हे कायदे तत्काळ मागे घ्यावेत असी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, पुण्यात 16 डिसेंबर रोजी माध्यमांशी संवाद साधताना त्यानी हे कृषी कायदे अंबानी यांच्यासारख्या उद्योजकांच्या भल्यासाठी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर 22 डिसेंबर रोजी मुकेश अंबानी यांच्य कार्यलयावर काढणार असल्याचेही जाहीर केले होते.

संबंधित बातम्या :

‘कृषी कायद्यांसारख्या कठोर सुधारणा रेटण्यासाठीच जनतेने मोदींना बहुमत दिलेय’

नारी शक्तीने शेतकरी आंदोलनाची ताकद वाढली, 2000 पेक्षा अधिक महिला शेतकऱ्यांचा सहभाग

अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही- गडकरी

(maharashtra farmers will protest in front of ambani and adani office)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.