Maharashtra Breaking News LIVE : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ईव्हीएमविरोधात आक्रमक
Maharashtra Breaking News LIVE : राज्यात आता फडणवीस सरकार अस्तित्वात आलं आहे. त्यानंतर आता फडवणीस सरकारचं पहिलं विशेष अधिवेशन होत आहे. याबाबतचे अपडेट्स आणि महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या....
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावचा दौऱ्यावर करणार आहेत. शरद पवार आज मारकडवाडी ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. शरद पवारांच्या दौऱ्यासाठी मारकडवाडीत भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. तसंच हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आलीय. आता मुंबई पुणे अंतर कमी होणार आहे. मिसिंग लिंक 90% पूर्ण केबल ब्रिजवरील स्लॅबचं काम सुरु झालं आहे. पुण्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नाशिकच्या मेळा बसस्थानकात फलाट क्रमांक सहाच्या बाजूला असलेल्या चौकशी कक्षाला बस धडकली. बसवरचं नियंत्रण सुटल्याने बस थेट स्थानकात घुसली. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
महाराष्ट्रातील सध्याचे सरकार जनतेच्या मताने स्थापन झालेले नाही – नाना पटोले
महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या विशेष अधिवेशनात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “महाराष्ट्रातील जनतेला अजूनही वाटते की सध्याचे सरकार आमच्या मतांनी स्थापन झाले नाही. शपथविधी सोहळ्यात राज्यपालांची भूमिका सर्वात मोठी असते आणि राज्यपाल हे भाजपचे होते. त्यांचा (भाजप) लोकशाहीवर विश्वास आहे का?
-
विरोधकांनी ईव्हीएमवर रडणे थांबवावे – एकनाथ शिंदे
ईव्हीएमवर विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत असलेल्या प्रश्नांवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत जेव्हा एमव्हीएला जास्त जागा मिळाल्या होत्या, तेव्हा ईव्हीएम ठीक होत्या, पण आता ते हरले तर ईव्हीएम खराब झाले आहेत. प्रियांका गांधी निवडणुका जिंकल्या तेव्हा ईव्हीएम ठीक होते, विरोधकांनी ईव्हीएमवर रडणे थांबवावे.
-
-
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ईव्हीएमविरोधात आक्रमक
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ईव्हीएमविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. बॅलेटवर निवडणुका घेण्यासाठी देशव्यापी आंदोलन सुरु करणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. तसेच ईव्हीएम हटाव यासाठी आजपासून स्वाक्षरी मोहीम सुरु करणार असल्यांही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.
-
मंत्रिमंडळाचा शपथविधी 12 डिसेंबरला होणार : शंभूराज देसाई
मुखमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर आता मंत्रिमंडळाचा शपथविधी केव्हा होणार आणि मंत्रिमंडळात कोण असणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशात आता मंत्रिमंडळाचा शपथविधी केव्हा होणार? याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. 12 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याची माहिती शिंदे गटाच्या शंभूराज देसाई यांनी दिली आहे. मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं याबाबत शिंदे निर्णय घेतली, असं शंभूराजे म्हणाले.
-
एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर हल्लाबोल
तुम्हाला विजय मिळतो. तुम्हाला जागा जास्त मिळतात तेव्हा ईव्हीएम चांगला असतो. पराभव होतो. तेव्हा ईव्हीएम खराब असतो. सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत त्यांच्या बाजूने निकाल लागला तर यंत्रणा चांगली. विरोधात निकाल गेला तर कोर्टावरही आरोप केले, असा एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
-
-
मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री -उद्धव ठाकरे
विधानसभा निवडणुकीत राज्यभरात गेलो. तेव्हा सगळे जण तुम्हीच येणार असे म्हणत होते. जे सर्व्हे झाले त्यातही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच होतो. मग त्याची दांडी कशी उडाली? कारण हे सगळं चोरांचं आणि दरोडेखोरांचं राज्य आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
-
आदिवासी शासकीय मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे उपोषण
चंद्रपूरच्या आदिवासी शासकीय मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. त्यांची वसतिगृहातच मेस सुरू करण्याची प्रमुख मागणी आहे. डीबीटीची रक्कम तोकडी असल्याने व महागाईनुसार त्यात वाढ न झाल्याने मुलांच्या पोषणावर परिणाम होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. आज उपोषणाचा आठवा दिवस असूनही प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही.
-
कार्यकर्त्याचे मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र
जालन्यातील बदनापूर अंबड विधानसभेचे भाजपचे सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले आमदार नारायण कुचे यांना मंत्रीपद देण्यात यावं यासाठी बदनापूर तालुक्यातील देवगाव येथील एका तरुण कार्यकर्त्यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ही मागणी केली आहे.
-
शिवप्रताप दिन साजरा
सांगलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या केलेला वधाचा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने सांगली मध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने भव्य अशी दौड काढण्यात आली.
-
शरद पवारांना भेटलो असतो तर जागा मिळाली असती -रामदास आठवले
मला फडणवीस यांनी सांगितले तुमचा मंत्री करेल. तीन पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून जागांचे वाटप झाले. आम्हला बोलावले नाही.आम्ही जागांची मागणी केली. शरद पवार यांना भेटलो असतो तर आम्हाला जागा मिळाली असती. आम्हाला एक मंत्री पद आणि एक विधानपरिषद मिळणार असे सांगितल्याचे रामदास आठवले म्हणाले.
-
राज ठाकरेंना महायुतीत घेऊन फायदा नाही – रामदास आठवले
राज ठाकरेंची मी असताना महायुतीला गरज नाही असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. राज यांची निवडणुकीत हवा गेली, त्यांना वाटायचे माझ्याशिवाय सत्ता येणार नाही मात्र त्यांचे स्वप्न भंग झाले आहे असेही आठवले म्हणाले आहेत.
-
कोणाला वाटले म्हणून बॅलेटपेपरवर निवडणूका घेता येतात का? – एकनाथ शिंदे
मरकाडवाडी येथे बॅलेट पेपरवर निवडणूका घेऊ दिल्या नाहीत यावरुन शरद पवार यांनी या गावाला भेट दिली.त्यावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. कोणाला वाटले म्हणून बॅलेटपेपरवर निवडणूका घेता येतात का? असा सवाल त्यांनी केला आहे.
-
हरल्यावर ईव्हीएमवर आरोप केले जात आहेत- एकनाथ शिंदे
हरल्यावर ईव्हीएमवर आरोप केले जात आहेत, विरोधक दुटप्पीपणे वागत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे.
-
नारायण कुचे यांना मंत्रीपद द्यावं; कार्यकर्त्याने रक्ताने लिहीले पत्र
जालन्यातील बदनापूर अंबड विधानसभेचे भाजपचे सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले आमदार नारायण कुचे यांना मंत्रीपद देण्यात यावं यासाठी बदनापूर तालुक्यातील देवगाव येथील एका तरुण कार्यकर्त्यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.
-
अबू आझमी भाजपाची बी टीम – आदित्य ठाकरे
अबू आझमीची टीम भाजपाची बी टीम म्हणून काम करीत असल्याची टीका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
-
तुमच्या गावी येणं, तुमचं म्हणणं ऐकणं चुकीचं आहे का?- शरद पवार
“काल मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला. पवार साहेबांनी हे करणं योग्य नाही. काय चुकीची गोष्ट केली? तुमच्या गावी येणं चुकीचं आहे का? तुमचं म्हणणं ऐकणं चुकीचं आहे? काही पद्धतींबाबत लोकांच्या मनात शंका आली. त्याची माहिती घेऊन त्याचं निरसन करणं हे चुकीचं आहे का?,” असा सवाल शरद पवारांनी केला.
-
पुणे रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बॉम्ब ठेवल्याची धमकी, अज्ञाताकडून फोन
पुणे रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बॉम्ब ठेवला असल्याचा पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षात अज्ञात व्यक्तीकडून फोन आला होता. सकाळी 9 वाजता पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षात फोन आल्याची माहिती आहे. फोन करणारी व्यक्ती 40 वर्षांची असून पिंपरी – चिंचवड भागातील रावेत इतली राहणारी असल्याचं कळतंय. या व्यक्तीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून संबंधित व्यक्तीने नशा करून खोडसाळपणे फोन केल्याची माहिती आहे.
-
बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे सेनेचे वरिष्ठ नेते लवकरच बेळगावला जाणार
बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे सेनेचे वरिष्ठ नेते लवकरच बेळगावला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे सेनेचे वरिष्ठ नेते उदय सामंत आणि अन्य दोन नेते सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांसोबत बोलणार आहेत. राजकीय नेत्यांना बंदी घालण्याच्या मराठी एकीकरण समितीच्या निर्णयाबाबत चर्चेने मार्ग सोडवणार असल्याचं कळतंय.
-
गावकऱ्यांनी बॅलेटवर मतदान करायचं ठरवलं मग पोलिसांनी विरोध का केला?- शरद पवार
“आपल्या देशात EVM पद्धत स्वीकारली, त्यात बदल केला पाहिजे. मतदान झाल्यावर गावकऱ्यांच्या मनात शंका आली. मग गावाने ठरवलं की गावात पुन्हा एकदा बॅलेटवर मतदान करावं. मग पोलिसांनी त्याला विरोध का केला? तुमच्याच गावात जमावबंदी केली हे कसं काय? गावाने ठरवलं की एका नव्या दिशेने जायचं तर मग विरोध का?,” असा सवाल शरद पवारांनी केला.
-
EVM बाबत लोकांच्या मनात शंका- शरद पवार
“लोकसभा, राज्यसभेत आम्ही पाहतोय की अनेक खासदार आम्हाला भेटतात आणि तुमच्या गावाची चर्चा करतात. सगळे खासदार आम्हाला विचारतात की हे गाव कुठे आहे? त्यामुळे या गावाचं अभिनंदन आहे. EVM बाबत लोकांच्या मनात काही शंका निर्माण का झाली? राज्यात काही ठिकाणी निवडणूक झाल्यावर शंका का आली,” असं शरद पवार म्हणाले.
-
विधानसभेत विरोधकांसह उर्वरित आमदारांचा शपथविधी
नाना पटोलेंनी विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली. यावेळी त्यांच्या हातात संविधानाचं पुस्तक पहायला मिळालं. संविधानाचं पुस्तक हाती घेत त्यांनी शपथ घेतली. विधानसभेत विरोधकांसह उर्वरित आमदारांचा शपथविधी पार पडला.
-
राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार
राहुल नार्वेकर थोड्याच वेळात विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपकडून त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र भाजपकडून राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे बोललं जात आहे.
-
मी राजीनामा देतो, माझी पोटनिवडणूक घ्या- उत्तम जानकर
सोलापूर – लोकसभेला भाजपला केवळ 54 हजार मतं आहेत. मग आता 1 लाख हजार मतं कसं मिळाली? मी राजीनामा देतो. माझी पोटनिवडणूक घ्यावी पण बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशी विनंती आमदार उत्तम जानकर यांनी केली.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार उत्तर पुणे जिल्ह्याचा दौरा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर पुणे जिल्ह्याच्या दौरा करणार आहेत. उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खाजगी दौरा करणार आहेत. बबनराव सुद्रिक यांची सुकन्या चि. सौ. का. सपना हिच्या विवाह सोहळ्यास लावणार हजेरी आहे. दुपारी दोन ते चार यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहे.
-
बॅलेट पेपरवर मतदान होणार असेल तर मी राजीनामा देऊ का? – उत्तम जानकर
सोलापूर : माळशिरसच्या पश्चिम भागातून प्रत्येक फेरीला मी मागे पडलो. त्यावेळी आम्ही VV PAT मोजणीची मागणी केली मात्र मतमोजणी सुरु असताना तसे करता येत नाही असे सांगितले. या निकालानंतर लोक 3 दिवस माझ्याकडे येत होते कारण असं मतदान कसं काय झालं हा सवाल होता. त्यामुळे ग्रामस्थांनी ठरवले की आपण बॅलेट पेपरवर मतदान करावे. मात्र प्रशासनाने त्याला नकार दिला. मारकडवाडी गावातील माती मी चैत्यभूमीवर नेली आणि तेथे वाहिली. कारण मारकडवाडी येथील लोक लढाऊ बाण्याचे आहेत.
मी निवडणूक आयोगाकडे अर्ज करणार आहे की, मारकडवाडीतील 1400 लोकांचे अफेडेव्हिट करणार आहेत. ज्यांनी मला मतदान दिले त्यांचे अफेडेव्हिट कोर्टात देणार आहे. माळशिरस तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे ठराव आले आहेत. बॅलेट पेपरवर मतदान होणार असेल तर मी राजीनामा देऊ का?, असे आवाहन मारकवाडीतील आमदार उत्तम जानकर यांनी केले.
-
शरद पवार मारकडवाडीत दाखल, ग्रामस्थांशी संवाद साधणार
शरद पवार मारकडवाडीत दाखल झाले आहेत. मारकडवाडी ग्रामस्थांचा ईव्हीएम मतदान आकडेवारीवर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार हे मारकडवाडी ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.
-
Maharashtra News: दीपक केसरकर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री दीपक केसरकर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला… याअगोदर राष्ट्रवादीचे अनिल पाटील सागर बंगल्यावर दाखल झालेत.. विशेष अधिवेशन थोड्याच वेळात, मात्र तत्पूर्वी नेत्यांच्या सागर बंगल्यावर चकरा
-
Maharashtra News: अनिल पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची अचानक घेतली भेट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री अनिल पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला..माजी मंत्री अनिल पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची अचानक घेतली भेट…
-
Maharashtra News: धुळे जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 80 टक्के रब्बी हंगामाच्या पेरण्या पूर्ण
गेल्या वेळेस झाल्या होत्या 107% पेरण्या… गहू ,भरभरा, सह ज्वारी, मका ,तृणधान्याचा समावेश… 90 हजार हेक्टरच्या पुढे रब्बी हंगामाचे जिल्ह्यात क्षेत्र… आतापर्यंत 71 हजार 127 हेक्टरवर पेरण्या पूर्ण… यंदा चांगल्या पावसामुळे क्षेत्र वाढण्याची शक्यता… हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक वाढण्याची शक्यता… थंडी कायम राहिल्यास त्याचा फायदा रब्बी पिकांना…
-
भिवंडीत भंगारच्या गोदामाला भीषण आग
भिवंडी तालुक्यातील वळपाडा परिसरात ग्लोबल कॉम्प्लेक्समधील भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली असून आगीचे कारण अस्पष्ट आहे. तीन भंगारचे गोदाम व शुभम इंटरियर सोलुशन कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. या आगीमुळे आसपासच्या परिसरातील घरांना देखील झळ बसली आहे. गोदामात मोठ्या प्रमाणात कागदी पुठ्ठे व प्लास्टिक वस्तू साठवणूक केली होती.अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल आगीवर नियंत्रण मिळवलं होतं. अजूनही काही ठिकाणी आग धुमसत आहे.
-
पुणे जिल्ह्यातील नदीतील वाळू उपसा रोखला जाणार
ड्रोन द्वारे बोटीमधून होणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नदीतील वाळू उपसा रोखण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात नदीपात्रातील वाळू उपशावर ड्रोन नजर ठेवणार आहे. पुणे जिल्ह्यात दौंड बारामती इंदापूर जुन्नर आंबेगाव भागात मोठ्या प्रमाणात नदी नाल्या आहेत. या भागातील नदी नाल्यातून वाळूच्या वरती दोन ड्रोन लक्ष ठेवून कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी दिली आहे. वाळू व्यावसायिकाकडून रात्रीच्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असतो त्यावर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.
-
एमपीएससी विद्यार्थ्यांना दिलासा
एमपीएससीच्या उत्तराने विद्यार्थ्यांची परीक्षा… तालिकेतील तीन उत्तरे चुकीची 10 डिसेंबरपर्यंत आक्षेप नोंदवण्याची मुदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 1 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 घेण्यात आली होती. या परीक्षेची उत्तरतालिका आयोगातर्फे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या उत्तरतालिकेतील तीन प्रश्नांची उत्तरे आयोगाने चुकीचे नमूद केल्याने विद्यार्थ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
-
मुंबई-पुणे अंतर कमी होणार
आता मुंबई पुणे अंतर कमी होणार आहे. मिसिंग लिंक 90% पूर्ण केबल ब्रिजवरील स्लॅबचे काम सुरू आहे. आशिया खंडातील सर्वाधिक उंच म्हणजे 130 मीटर उंचीच्या केबल ब्रिजवर स्लॅप टाकण्याचे काम सुरू झाले आहे. पुढील दोन ते तीन महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षात पुणे आणि मुंबई ही दोन्ही शहरे आणखी जवळ येणार आहेत.या दोन्ही शहरातील अंतर कमी करणाऱ्या पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले आहे.
Published On - Dec 08,2024 8:00 AM