दिल्लीत करोना आऊट ऑफ कंट्रोल?, मुंबई-दिल्ली विमान आणि रेल्वे सेवा बंद होणार?; ठाकरे सरकारच्या हालचाली सुरू

दिल्लीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्या ठिकाणी घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येत आहे. त्यातच दिल्लीतील प्रदूषणाची पातळीही वाढली आहे. त्यामुळे सतर्कतेचा उपाय म्हणून मुंबई-दिल्ली विमान सेवा बंद करण्याचा महाराष्ट्र सरकार विचार करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (maharashtra government planning shutting of flights from mumbai to delhi)

दिल्लीत करोना आऊट ऑफ कंट्रोल?, मुंबई-दिल्ली विमान आणि रेल्वे सेवा बंद होणार?; ठाकरे सरकारच्या हालचाली सुरू
प्रवासी विमानाचा रंग पांढरा का असतो? जाणून घ्या त्यामागील कारण
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 3:48 PM

मुंबई: दिल्लीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्या ठिकाणी घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येत आहे. त्यातच दिल्लीतील प्रदूषणाची पातळीही वाढली आहे. त्यामुळे सतर्कतेचा उपाय म्हणून मुंबई-दिल्ली विमान सेवा बंद करण्याचा महाराष्ट्र सरकार विचार करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. केवळ विमानसेवाच नव्हे तर या दोन्ही राज्यांदरम्यान रेल्वे सेवाही बंद करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं. (maharashtra government planning shutting of flights from mumbai to delhi)

देशभरातील लॉकडाऊन संपुष्टात आलेला असून अनेक राज्यात उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. असं असतानाही दिल्लीत काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. दिल्लीत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडाही वाढत आहे. त्यावर महाराष्ट्र सरकारनंही चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीत जे होतंय ते महाराष्ट्रात होऊ नये म्हणून राज्य सरकारने दिल्ली-मुंबई विमानसेवा आणि रेल्वे सेवा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दिल्लीतून कोरोनाबाधित व्यक्ती मुंबईत येऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकार हा निर्णय घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दिल्लीत कोरोना बळींची आतापर्यंतची संख्या 8 हजाराच्यावर गेली आहे. गेल्या 24 तासात दिल्लीत 98 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवाळी सणानंतरच दिल्लीत कोरोनाचा कहर वाढला आहे. दिल्लीत बुधवारी कोरोनामुळे 131 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्याआधी 12 नोव्हेंबर रोजी दिल्लीत कोरोनामुळे 24 तासात 104 लोकांचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे मुंबईत नियंत्रणात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. राज्यात काल एका दिवसात 5 हजार कोरोनाचे रुग्ण सापडले. यात मुंबईतील रुग्णांची संख्या अधिक आहे.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट महागात पडेल, संयमी राजेश टोपेंचा पहिल्यांदाच रोखठोक इशारा

दिल्लीची हवा बिघडली; सोनिया आणि राहुल गांधींचा मुक्काम आता गोव्यात

कोरोनामुळे सरकारचा महसूल कमी, त्यामुळे सर्वांना निधी मिळत नाही; काँग्रेस नाराज नाही: बाळासाहेब थोरात

(maharashtra government planning shutting of flights from mumbai to delhi)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.