कामावर येणाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ; एसटी कर्मचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार : अनिल परब

मात्र कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरी जाऊन शिवीगाळ केली जात आहे. त्यांची अडवणूक केली जात आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले.

कामावर येणाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ; एसटी कर्मचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार : अनिल परब
अनिल परब

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप 29 ऑक्टोबरपासून सुरुच आहे. एसटी महामंडळाचे विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणखी कठोर भूमिका घेण्याचे जाहीर केले आहे. काही कर्मचारी कामावर परत रुजू होत आहेत. मात्र कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरी जाऊन शिवीगाळ केली जात आहे. त्यांची अडवणूक केली जात आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले.

पगारवाढीचा लाभ सर्वांनाच होणार

परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटीतील अधिकाऱ्यांसोबत आज बैठक घेतली. या बैठकीत संप कसा मिटवावा यावर चर्चा झाली. बैठक संपल्यानंतर परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. उद्या विलीनीकरण होईल तेव्हा आता कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार नाही, अशी अफवा पसरवली जात आहे. पण ते चुकीचे आहे. विलीनीकरणाचे आदेश आल्यानंतर सर्वांनाच त्याचा लाभ होईल.

कर्मचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई

काही कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे. पण काही कर्मचाऱ्यांना घरी जाऊन शिवीगाळ केली जात आहे. काही ठिकाणी त्यांच्याशी अर्वाच्य भाषा वापरली जात आहे. या सर्वाची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. विलीनीकरणाची मागणी ज्या व्यासपीठावर करायची त्याच व्यासपीठावर करा. जनतेला वेठीस धरू नका. कर्मचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाईल, असे परब म्हणाले.

फसवी पागरवाढ असल्याची अफवा 

तसेच, आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. मात्र कोर्टाने नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर चर्चा केली जाईल. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर हाय कोर्टाच्या माध्यमातून निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत महामंडळाने अत्यंत चांगली पगारवाढ दिली आहे. ही पागर फसवी आहे, ही पागरवाढ काही दिवसांत परत घेतली जाईल, अशा बातम्या दिल्या जात आहेत. पण हे सगळं काही चुकीचं आहे. मी पगारवाढीचा तक्ता पहिल्या दिवशी समोर ठेवला होता. पगारीची स्लीप त्याचनुसार येईल, असेदेखील परब यांनी स्पष्ट केले.

इतर बातम्या :

विधानसभा अध्यक्षपदाची निवड हिवाळी अधिवेशनातच, नाना पटोलेंकडून स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनाही प्रत्युत्तर

‘मेस्मा कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लागतो, एसटी अत्यावश्यक सेवेत येते’, अनिल परबांचा सूचक इशारा

‘अर्जुन खोतकरांनी जरंडेश्वर कारखान्याच्या घोटाळ्याची कॉपी केली, बाजार समितीतही घोटाळा’, किरीय सोमय्यांचा आरोप

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI