महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : यशोमती ठाकूर यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला धक्का; फक्त ‘एवढ्याच’ ग्रामपंचायतींवर विजय

यशोमती ठाकूर यांच्या मोझरी गावात काँग्रेसचा निसटचा विजय झालाय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:39 PM, 18 Jan 2021
महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : यशोमती ठाकूर यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला धक्का; फक्त 'एवढ्याच' ग्रामपंचायतींवर विजय
Yashomati Thakur

अमरावतीः महिला आणि बालकल्याण मंत्री, अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. तिवसातील 29 ग्रामपंचायतींपैकी केवळ 7 ग्रामपंचायती काँग्रेसला राखण्यात यश आलंय. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी गावात काँग्रेसचा निसटचा विजय झालाय. तिवसा तालुक्यातील स्थानिक आघाडीचा ग्रामपंचायत निवडणुकीत विजय झालाय. (Congress Has Lost In Yashomati Thakur Stronghold Teosa Constituency)

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी झालीय. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातील मोझरी गावातील निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर त्या ग्रामपंचायतीत काँग्रेसला निसटता विजय मिळालाय. लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मतदानावेळी मतदारांना केले होते. यशोमती ठाकूर यांच्या गावात त्यांच्या काँग्रेस पक्षाची गेल्या 10 वर्षांपासून सत्ता आहे.

अमरावती जिल्ह्यात 537 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक
अमरावती जिल्ह्यात 537 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली असून, मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील सुरवाडी येथील एका उच्च शिक्षित तरुणीने रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती एक अनोखा एक संदेश दिला होता, वैशाली शिंदे या उच्चविद्याविभूषित तरुणीने 5 बाय 8 फुटांची रांगोळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने साकारलेली होती. यात काढलेल्या रांगोळीत मतदानाचा उत्कृष्ट संदेश या तरुणीने दिला होता. या तरुणीचे सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात कौतुक सुद्धा होत आहे.

106 वर्षांच्या गयाबाई चवणे या आजीबाईंनी केलं होतं मतदान
ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत तिवसा तालुक्यातील मोझरी गावातील 106 वर्षांच्या गयाबाई चवणे या आजीबाईने केलेल मतदान हा चर्चेचा विषय ठरत होता. वार्धक्याने गयाबाई चवणे थकल्या असल्या तरी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गावाचा विकास फक्त ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होतो, त्यामुळे सर्वांनी मतदान करावे, असे आव्हाहन देखील गयाबाई आजीने केले आहे.

यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात पक्षीय बलाबल

काँग्रेस -7
स्थानिक आघाडी-16
भाजप-3
राष्ट्रवादी-1
शिवसेना-2

संबंधित बातम्या

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : अब्दुल सत्तारांचा काँग्रेसच्या गडाला खिंडार; ‘या’ ग्रामपंचायतीवर फडकावला सेनेचा झेंडा

maharashtra gram panchayat election 2021 : Congress Has Lost In Yashomati Thakur Stronghold Teosa Constituency