कोणत्या पक्षाकडे सध्या किती ग्रामपंचायती, जाणून घ्या ग्रामपंचायतींचा लेखाजोखा

विशेष म्हणजे टीव्ही 9 मराठीकडे राज्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा सर्व लेखाजोखा उपलब्ध आहे.

 • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
 • Published On - 21:52 PM, 17 Jan 2021
कोणत्या पक्षाकडे सध्या किती ग्रामपंचायती, जाणून घ्या ग्रामपंचायतींचा लेखाजोखा
महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2021 लाईव्ह

मुंबईः राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांत ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराची जोरदार रंगत पाहायला मिळाली. 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झालेले असून, निवडणुकीत सरासरी 79 टक्के मतदान नोंदवलं गेलंय. आता उद्या 18 जानेवारीला मतमोजणी होणार असून, अनेक उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. विशेष म्हणजे टीव्ही 9 मराठीकडे राज्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा सर्व लेखाजोखा उपलब्ध आहे. (Find Out Which Party Has How Many Gram Panchayats At Present, Information Of Gram Panchayats)

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुकांपैकी कोकणात 798 ग्रामपंचायत, पश्चिम महाराष्ट्रात 2870 ग्रामपंचायत, मराठवाड्यात 4134 ग्रामपंचायत, उत्तर महाराष्ट्रात 2476 ग्रामपंचायत, विदर्भातील 3956 ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होत आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत अनेक ग्रामपंचायती बिनविरोधही निवडून आल्यात. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात 879 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून, जवळपास राज्यातील सर्वाधिक म्हणजे साताऱ्यातील 221 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झालीय. त्या खालोखाल रत्नागिरीतील 479 ग्रामपंचायत निवडणुकींपैकी 119 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून गेल्यात.

नगरमध्ये 9 ग्रामपंचायतींचा निवडणुकीवर बहिष्कार
विशेष म्हणजे या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेकांनी बहिष्कारही घातलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींपैकी 9 ग्रामपंचायतींनी निवडणुकीवरच बहिष्कार घातलाय. राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुकीत 2,14,880 उमेदवारांचं भवितव्य उद्या ठरणार आहे. राज्यात एकूण 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालेलं असून, 26,718 जागा बिनविरोध निवडून आल्यात.

राज्यात कोणत्या पक्षांच्या ताब्यात किती ग्रामपंचायती?
काँग्रेस 124, राष्ट्रवादी 218, शिवसेना 278, भाजपा 257, मनसे 5 आणि स्थानिक पक्षांच्या ताब्यात 520 ग्रामपंचायत आहेत. रायगड जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतील शिवसेनेचा वरचष्मा आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा हात आहे. तर सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या ताब्यात 82 ग्रामपंचायती आहेत.

राज्यातील एकूण 14 हजार 070 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक
ठाणे 158, पालघर 3, रायगड 88, रत्नागिरी 479, सिंधुदुर्ग 70, पुणे 748, सोलापूर 658, सातारा 879, सांगली 152, कोल्हापूर 433, औरंगाबाद 618, बीड 129, जालना 475, परभणी 566, लातूर 408, हिंगोली 495, उस्मानाबाद 428, नांदेड 1014, नाशिक 621, धुळे 218, जळगाव 783, अहमदनगर 767, नंदुरबार 87, नागपूर 130, वर्धा 50, वाशिम 163, यवतमाळ 980, बुलडाणा 527, अकोला 225, अमरावती 553, गडचिरोली 199, गोंदिया 189, चंद्रपूर 629, भंडारा 148

https://www.tv9marathi.com/ वर सकाळी 8 वाजल्यापासून तुम्हाला निकाल पाहता येईल. मराठीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीची अपडेट सकाळपासूनच दाखवली जाईल. वेबसाईटच्या फ्रंट पेजवरच महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांचा विशेष लाईव्ह ब्लॉग सुरू असेल. टीव्ही 9 मराठीला तुम्ही सोशल मीडियावर फॉलो करत असाल तर आणखी चांगल्या पद्धतीने अपडेट्स तुमच्यापर्यंत येतील.

🛑निकाल पाहण्यासाठी काय कराल?🛑      

💠सर्वात अगोदर https://www.tv9marathi.com या वेबसाईटर जा.

💠त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या पक्षाला किती ग्रामपंचायती मिळाल्या. याची आकडेवारी पाहता येईल.

💠भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, इतर असे पाच रकाने तुम्हाला दिसतील. या रकान्यात तुम्हाला याची सर्व अपडेट मिळेल.

🛑ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा🛑

  • निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234
  • प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711
  • एकूण प्रभाग- 46,921
  • एकूण जागा- 1,25,709
  • प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
  • अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
  • वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
  • मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
  • बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718
  • अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880

संबंधित बातम्या :

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Date : काऊंटडाऊन सुरू, उद्या निकाल

Find Out Which Party Has How Many Gram Panchayats At Present, Information Of Gram Panchayats