ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा, बेळगावमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान

राज्यातील 14 हजाराहून अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक लागली आहे. रोज काही जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भातील माहिती इथे वाचायला मिळेल.

ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा, बेळगावमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान

बेळगाव: बेळगाव, खानापूरसह पहिल्या टप्प्यात होणाऱ्या 7 तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी आज मतदान पार पडत आहे. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात बेळगाव, खानापूर, हुक्केरी, बैलहोंगल, कित्तुर, गोकाक आणि मुडलगी या 7 तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडत आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 259 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 259 जागांसाठी 256 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर 437 जणांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. बेळगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी 30 डिसेंबरला होणार आहे. (Maharashtra Gram panchayat election 2021)

मतदानावेळी कोणते कागदपत्र सोबत घ्याल?

 1. मतदान ओळखपत्र
 2. आधार कार्ड
 3. पॅन कार्ड
 4. वाहन परवाना
 5. केंद्र, राज्य सरकार, निमशासकीय, सार्वजनिक उद्योगांनी कर्मचाऱ्यांना दिलेलं ओळखपत्र
 6. स्टेट बँक, पोस्ट कार्यालयाने दिलेले ओळखपत्र
 7. रोजगार हमी योजनेअंतर्गत दिलेले प्रमाणपत्र
 8. आरोग्य विम्याचे स्मार्ट कार्ड
 9. कामगार मंत्रालयाने दिलेले ओळखपत्र
 10. ओळखपत्रासह पेन्शन योजनेतील कागदपत्रे
 11. खासदार, आमदारांनी दिलेली कार्यालयीन ओळखपत्रे

औरंगाबाद :

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनाकडून काही नियमावली जारी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढवायची असेल तर इच्छुक उमेदवाराला घरी शौचालय असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर शौचालय असण्याबरोबरच ते वापरात असल्याचा ठरावही बंधनकारण करण्यात आला आहे. उमेदवाराने आपल्या उमेदवारी अर्जासोबत शौचालय वापरात असल्याचा ग्रामसभेचा ठराव जोण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

सोलापूर :

सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे आता चांगलेच वाहू लागले आहेत. ग्रामपंचायतीचा प्रचार आता सोशल मीडियावरुनही सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. अनेक उमेदवारांनी आपली प्रचार यंत्रणा सोशल मीडियावर उतरवली आहे. मिस्किंग केलेले व्हिडीओ आणि ऑडिओ गाण्यांमधून उमेदवारांच्या प्रचाराला एकप्रकारे सुरुवातही करण्यात आली आहे. दरम्यान, अद्याप नामनिर्देशन पत्र भरण्यापासून सर्व प्रक्रिया बाकी आहे. असं असलं तरी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले उमेदवार सोशल मीडियाद्वारे प्रचारात उतरल्याचं पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या:

मुदतबाह्य 1566 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली, तर 12,668 ग्रामपंचायत निवडणुकांना स्थगिती

तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

Maharashtra Gram panchayat election 2021

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI