महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : 40 वर्षांपासून काँग्रेसची एकहाती सत्ता; ‘या’ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा दबदबा कायम

भोर वेल्हा मुळशी मतदारसंघातील गावांमधल्या निवडणुकीतही काँग्रेसनं वरचष्मा राखलाय.

  • आश्विनी सातव डोके, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 19:09 PM, 18 Jan 2021
महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : 40 वर्षांपासून काँग्रेसची एकहाती सत्ता; 'या' ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा दबदबा कायम

पुणेः मागील 40 वर्षांपासून भोर वेल्हा मुळशी मतदारसंघातील मतदारांनी काँग्रेस पक्षावर विश्वास कायम ठेवलाय. विशेष म्हणजे यंदाही ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला मतदारांनी भरभरून मतदान केलंय. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत 63 पैकी 46 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेत, तर वेल्हा तालुक्यात 31 पैकी 20 जागांवर काँग्रेसनं स्वबळावर उमेदवार निवडून आणलेत. तर महामार्गावरील गावांमधल्या निवडणुकीतही काँग्रेसनं वरचष्मा राखलाय. (Maharashtra Gram Panchayat Election Result 2021 : Congress Victory On Bhor Constituency Gram Panchayat)

भोर वेल्हा मुळशी मतदारसंघ हा काँग्रेस विचारधारेला मानणारा मतदारसंघ : संग्राम थोपटे

मुळशीत काँग्रेस गटाचे उमेदवार विजयी झालेत, त्यामुळे 40 वर्षांपासून या मतदारसंघावर काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं असून, काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी मतदारांचे आभार व्यक्त केलेत. भोर वेल्हा मुळशी मतदारसंघ हा काँग्रेस विचारधारेला मानणारा मतदारसंघ असल्याचं त्यांचं वैशिष्ट्य आहे. या मतदारसंघात काँग्रेसला नेहमीच मोठ्या प्रमाणात यश मिळत आलंय. आतासुद्धा भाजप आणि शिवसेनेतल्या ताब्यातील ग्रामपंचायतीत काँग्रेसनं विजय मिळवलाय.

नागपुरात काँग्रेसचा 53 ग्रामपंचायतींवर विजय 

नागपुरात ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस सर्वात पुढे असल्याचं चित्र दिसत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार नागपुरात काँग्रेसला 53 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे. त्यामुळे नागपूर गडावरील वर्चस्व राखण्यात काँग्रेसला यश आलं आहे. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीला 21 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार शिवसेनेला फक्त दोन ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे. तर भाजपला 29 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला. नागपुरात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्याने काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली. यावेळी त्यांनी काँग्रेस 90 जागांवर विजयी होणार, असा दावा केला. त्यांच्या दावा कितपत खरा ठरतो हे पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल. मात्र, सध्या तरी नागपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे.

संबंधित बातम्या

नागपूर गडावर वर्चस्व राखण्यात काँग्रेसला मोठं यश, आतापर्यंत 53 ग्रामपंचायती खिशात

Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra LIVE | सोलापुरात राष्ट्रवादी अव्वल, 213 ग्रामपंचायतींवर मुसंडी!

Maharashtra Gram Panchayat Election Result 2021 : Congress Victory On Bhor Constituency Gram Panchayat