औरंगाबादः राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल बऱ्यापैकी हाती आलेला आहे. अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये काँटे की टक्करही पाहायला मिळालीय. 60 ते 70 टक्के जिल्ह्यात भाजपची सत्ता असल्याचा दावा भाजप नेते करत आहेत. तर शिवसेनेनंही बऱ्यापैकी ग्रामपंचायती ताब्यात घेतल्यात. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायती यंदा भाजपने खेचून आल्यात. विशेष म्हणजे औरंगाबादेतही कधी नव्हे ते एमआयएम ग्रामपंचायतींच्या 65 जागांवर विजय मिळवलाय. तसेच एमआयएमच्या नेत्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत आणखी जागा मिळण्याची अपेक्षा आहे. (Maharashtra Gram Panchayat Election Result 2021 : MIM Aurangabad winning 65 seats says imtiaz jaleel)
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनीसुद्धा एमआयएम राज्यभरात ग्रामपंचायतींच्या अनेक जागा जिंकेल, असा आशावाद व्यक्त केलाय. औरंगाबाद जिल्ह्यात एमआयएमने आतापर्यंत 65 जागा जिंकल्या आहेत. मतमोजणी सुरू असून, आणखी जागा जिंकण्याची आम्हाला आशा आहे. हळूहळू आमचा पक्ष महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत पोहोचत असल्याचंही इम्तियाज जलिल यांनी अधोरेखित केलंय.
Gram panchayat elections: Till now AIMIM has won over 65 seats in just Aurangabad district! More seats expected as counting still on. Slowly steadily our party making grounds in rural Maharashtra also. Final tally from State awaited. Will update @asadowaisi @aimim_national
— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) January 18, 2021
राज्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पाटोदा या गावात भास्करराव पेरे पाटील यांच्या पूर्ण पॅनलचा पराभव झालाय. भास्करराव पेरे यांनी त्यांचा संपूर्ण हयातीत पाटोदा या गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले. मात्र यंदाच्या निवडणुकीत पेरे यांना पराभवाचा सामाना करावा लागला आहे. त्यांच्या पूर्ण पॅनलसोबतच त्यांची मुलगी अनुराधा पेरे यांचाही पराभव झालाय. तब्बल 30 वर्षांनंतर पेरे पाटील पाटोद्याच्या राजकारणातून बाद झाले आहेत.
या वर्षी पाटोदा येथील ग्रामपंचायतीची निवडणूक चांगलीच चर्चेत आली होती. कारण यावेळी भास्करराव यांच्या विरोधात पॅनल उभे केले होते. एकूण 11 जागांपैकी 8 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. तर उर्वरित तीन जागांसाठी निवडणूक झाली होती. मात्र या तिन्ही जागांवर भास्कर पेरे यांचे पॅनल पराभूत झाले आहे. येथील 11 जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांनी विजय मिळवलाय.
संबंधित बातम्या
Maharashtra Gram Panchayat Election Result 2021 : MIM Aurangabad winning 65 seats says imtiaz jaleel