महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : शिवसेनेचं बालेकिल्ल्यातील वर्चस्व अबाधित; संजय राऊत म्हणतात…

तर काकोळे ग्रामपंचायतीमध्ये मनसेने आपले खाते उघडलेय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:24 PM, 18 Jan 2021
महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : शिवसेनेचं बालेकिल्ल्यातील वर्चस्व अबाधित; संजय राऊत म्हणतात...

ठाणेः अंबरनाथ तालुक्यातील ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा शिवसेनेने दबदबा राखलाय. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी राज्यात स्थापन झाल्यानंतर ही पहिली ग्रामपंचायत निवडणूक होती. अंबरनाथ तालुक्यात महाविकास आघाडीने 27 पैकी 19 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. तर भाजपनेही 7 ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवलाय. तालुक्यात शिवसेनेने 12, राष्ट्रवादी काँग्रेसने 4 ग्रामपंचायतींमध्ये स्पष्ट विजय मिळवलाय. (Maharashtra Gram Panchayat Election Result 2021 : Shiv Sena Victory Maintained The Ambernath)

ही तर विजयाची सुरुवात: संजय राऊत

तर काकोळे ग्रामपंचायतीमध्ये मनसेने आपले खाते उघडलेय. महाविकास आघाडीचा प्रयोग 3 ग्रामपंचायतींमध्ये यशस्वी ठरलाय. एकंदरीत शिवसेनेने आपल्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम राखले आहे. विशेष म्हणजे या विजयानंतर संजय राऊत यांनीसुद्धा सूचक प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर भाष्य केलं. ही तर विजयाची सुरुवात आहे, असं ते म्हणालेत. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने मोठं यश मिळवलं आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी राज्यभरात जल्लोष सुरू केला आहे.

मनसेनं इभ्रत राखली?

यापूर्वी राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही मनसेचे पानिपत झाले होते. तेव्हापासून मनसे सुस्तावलेली होती. मात्र, पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीपासून राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले होते. मात्र, त्या निवडणुकीतही मनसेचा फारसे यश मिळाले नव्हते. त्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीतही मनसेची थोड्या फार प्रमाणात यश प्राप्त झालंय.

शिवसेनेची राज्यभरात जोरदार घोडदौड

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला महाविकासआघाडीने एकत्र निवडणूक लढवल्याचा मोठा फायदा होताना दिसत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार महाविकासआघाडीत शिवसेना सर्वाधिक 714 ग्रामपंचायतींमध्ये आघाडीवर आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनाप्रणित पॅनेल्सनी बाजी मारली आहे. भाजपने शिवसेनेला कांटे की टक्कर दिली आहे. 678 ग्रामपंचायतींमध्ये भाजपचा झेंडा फडकला.

यवतमाळमध्ये झंझावात

ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या (Gram panchyat election results) सकाळच्या सत्रात खातेही न उघडू शकलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) इंजिन दुपारनंतर जोरात धावायला लागले आहे. यवतमाळमध्ये तर मनसेला घवघवीत यश मिळाले आहे. येथील वणी मतदारसंघ हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. येथील 15 ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे. मनसेने जिंकलेल्या 15 ग्रामपंचायतींमध्ये शिरपूर, मोहूर्ली, येनक, खांदला, खांदला, चंडकापुर, बाबापूर, मोहदा, शिंदी, माहागाव , गदाजी बोरी, करणवाडी या गावांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

राज ठाकरेंच्या मनसेने मुंबईचं दार ठोठावलं, BMC पासून हाकेच्या अंतरावरील ग्रामपंचायत जिंकली

maharashtra gram panchayat election 2021 : Shiv Sena Victory Maintained The Ambernath