अमरावतीः बडनेरा मतदारसंघात 90% ग्रामपंचायतींवर युवा स्वाभिमानचा झेंडा फडकलाय, आमदार रविभाऊ राणा आणि खासदार नवनीत रवी राणा यांच्या विकासकामाच्या झंझावताने गावकऱ्यांनी युवा स्वाभिमान पॅनलच्या उमेदवारांना भरभरून मतदान केलेय. (Maharashtra Gram Panchayat Election Result 2021 : Youth Swabhiman flag on 90% Gram Panchayat in Badnera constituency)
गावाच्या विकासात राजकारण न आणता सर्वांनी एकजुटीने कार्य करा: रवी राणा
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी गंगा सावित्री निवासस्थानी भेट देऊन जल्लोष केलाय. आमदार रविभाऊ राणा, खासदार नवनीत रवी राणा यांनीसुद्धा विजयी उमेदवारांचे अभिनंदन केलेय, पराभूत उमेदवारांनी खचून जाऊ नये, लोकसेवेच्या माध्यमातून कार्यरत राहून नव्या उमेदीने कामाला लागावे, असं आमदार रवी राणा म्हणालेत. निवडणूक संपली आता गावाच्या विकासात राजकारण न आणता सर्वांनी एकजुटीने कार्य करावे, असं आवाहन खासदार नवनीत रवी राणा यांनी केलंय.
विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही : युवा स्वाभिमान
विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. कोरोनामुळे शासन निर्देशांचे पालन करून संयम बाळगून आनंद साजरा करावा, गावातली शांतता कायम ठेवावी, असं आवाहनही युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांना केलंय, उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व स्वाभिमानी शिलेदारांचे आणि मतदारांचे युवा स्वाभिमान पार्टीने आभार मानले आहेत.
आमदार रवी राणा यांनी अंजनगाव, बारी, गोप, गव्हाण, गौरखेडा, सावरखेड, खारतळेगाव, पिंपळखुटा, मलकापूर, हिवरा, पोहरा, भानखेडा खुर्द, उत्तखेड इंदला, ऋणमोचन, बादरपूर, हातूणा, हरताळा या ग्रामपंचायतींवर युवा स्वाभिमान पार्टीचा झेंडा फडकलाय. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वाधिक पाना आणि टीव्ही या चिन्हाचा जिल्हाभर बोलबाला आहे.
संबंधित बातम्या
Maharashtra Gram Panchayat Election Result 2021 : Youth Swabhiman flag on 90% Gram Panchayat in Badnera constituency