Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : काऊंटडाऊन सुरू, लवकरच निकालाची प्रतीक्षा संपणार

तर मतमोजणीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 1:17 AM, 18 Jan 2021
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : काऊंटडाऊन सुरू, लवकरच निकालाची प्रतीक्षा संपणार

मुंबईः राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच गाव पातळीवर निवडणुकीबद्दल प्रचंड उत्साह आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान पार पडलंय, तर मतमोजणीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Countdown Begin Today)

भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यातील मुक्ताईनगर ग्रामपंचायत निवडणुकीत काय होणार याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. तसेच अनेक नेत्यांनी या ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही स्वतःची सर्व ताकद पणाला लावलीय. विशेष म्हणजे कधी नव्हे ते मनसेसुद्धा यंदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उतरलेली आहे.

राज्यात एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 11 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अंशत: बिनविरोध झाल्या. त्यामुळे अंतिमतः 12,711 ग्रामपंचायतींसाठीच मतदान प्रक्रिया पार पडली असून, आता 18 जानेवारीला या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतमोजणी होणार आहे.

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | ग्रामपंचायत निवडणुका 2021 निकाल लाईव्ह

अकोला जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी
सरपंच आणि सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द झालीय. दुसरीकडे अकोला जिल्ह्यातल्या अकोला तालुक्यांत झालेल्या ग्रामपंचायतींची आज (18 जानेवारी) मतमोजणी होणार आहे, त्यासाठी मतमोजणीच्या गोडावूनवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे, तसेच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायत निवडणुका?
ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. अशाप्रकारे राज्यात एकूण 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलंय.

ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा
निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234
आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711
एकूण प्रभाग- 46,921
एकूण जागा- 1,25,709
प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718
अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880

संबंधित बातम्या

Special Story : राज्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, पण बिघडलेल्या संबंधांचं काय होणार?

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Countdown Begin Today