Sindhudurg Gram Panchayat Election Results 2021: मालवणमध्ये वैभव नाईकांना धक्का; नितेश राणेंनी गड राखले!

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना मालवण ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: nitesh naik defeated vaibhav naik in sindhudurg)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:38 PM, 18 Jan 2021
Sindhudurg Gram Panchayat Election Results 2021: मालवणमध्ये वैभव नाईकांना धक्का; नितेश राणेंनी गड राखले!

सिंधुदुर्ग: शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना मालवण ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. मालवणमधील 6 पैकी 5 ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. तर, देवगडमध्ये भाजपने 23 पैकी 17 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. त्यामुळे नाईक यांच्यासह शिवसेनेलाही हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. तर भाजप आमदार नितेश राणे यांना देवगड आणि मालवण राखण्यात मोठं यश आलं आहे. (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: nitesh naik defeated vaibhav naik in sindhudurg)

मालवणमधील 6 पैकी 5 ग्रामपंचायती जिंकण्यात भाजपला यश आलं आहे. भाजपने चिंदर, पेंडुर, गोळवन, कुंकवळे, मसदे ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. तर आडवली ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. मालवण हा वैभव नाईक यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे हा पराभव नाईक यांच्यासाठी अत्यंत अडचणीचा ठरणारा असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दुसरीकडे देवगड तालुक्यातील 23 पैकी 17 आणि वैभववाडीतील 12 पैकी 9 ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. देवगडमध्ये शिवसेनेला अवघ्या 6 ग्रामपंचायतींवर विजय मिळवता आला आहे. देवगडमधील हा पराभव शिवसेनेसाठी धक्कादायक असल्याचं सांगण्यात येतं.

केसरकरांना धक्का

दुसरीकडे शिवसेना नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांना सिंधुदुर्गात मोठा फटका बसला आहे. तळवडे, कोलगाव, मळगाव आणि इन्सुली या ग्रामपंचायतीत भाजपने मुसंडी मारली असून शिवसेनेची मोठी घसरण झाली आहे. शिवसेनेकडे असलेल्या या चारही ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आली आहे. केसरकरांच्या मतदारसंघातच भाजपने जोरदार कामगिरी केल्याने केसरकर यांची डोकेदुखी वाढली आहे.

कणकवलीत राणेंना धक्का

दरम्यान,नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला धक्का बसला आहे. कणकवली तालुक्यातील भिरंवडे ग्रामपंचायतचा पहिला निकाल हाती आला आहे. भिरवंडे ग्रामपंचायतीत 7 पैकी 4 जागा बिनविरोध निवडून आणण्यात शिवसेनेला यश आले आहे. त्याशिवाय कणकवली तालुक्यातील एकूण तीन ग्रामपंचायतींपैकी दोन शिवसेनेकडे तर एक भाजपकडे गेली आहे. तालुक्यातील भिरवंडे व गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेकडे तर तोंडवली-बावशी ग्रामपंचायत भाजपकडे आली आहे. कणकवली हा नितेश राणेंचा मतदारसंघ असून राणेंसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: nitesh naik defeated vaibhav naik in sindhudurg)

 

संबंधित बातम्या:

Kolhapur Gram Panchayat Election Results 2021: प्रकाश आबिटकरांनी करुन दाखवलं, खानापुरात चंद्रकांत पाटलांना हरवलं, सेनेचा झेंडा

ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: सत्ताधारी शिवसेनेची राज्यभरात विजयी घौडदौड

Gram Panchayat Election Results 2021: राज ठाकरे म्हणाले ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढवा; पण मनसेचं इंजिन धावलंच नाही

(Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: nitesh naik defeated vaibhav naik in sindhudurg)