Hotel Lodge Reopen | महाराष्ट्रातील हॉटेल आणि लॉज पुन्हा खुले, पाहुण्यांनी काय काळजी घ्यावी?

निवासी हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस अशा सुविधा पुरवणारी कंटेन्मेंट झोनबाहेरील हॉटेल्स 33 टक्के क्षमतेसह चालवण्याची मुभा देण्यात आली आहे. (Maharashtra Hotel Lodge Reopen)

Hotel Lodge Reopen | महाराष्ट्रातील हॉटेल आणि लॉज पुन्हा खुले, पाहुण्यांनी काय काळजी घ्यावी?


मुंबई : महाराष्ट्रातील हॉटेल आणि लॉज आजपासून (8 जुलै) पुन्हा सुरु होणार आहेत. ‘कोव्हिड’संबंधी सूचनांचे पालन करत 33 टक्के क्षमतेसह हॉटेल आणि लॉज उघडण्यास राज्य सरकारकडून सशर्त परवानगी मिळाली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये मात्र तूर्तास हॉटेल आणि लॉज सुरु करता येणार नाहीत (Maharashtra Hotel Lodge Reopen)

निवासी हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस अशा सुविधा पुरवणारी कंटेन्मेंट झोनबाहेरील हॉटेल्स 33 टक्के क्षमतेसह चालवण्याची मुभा देण्यात आली आहे. जर या संस्था क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरात असतील, तर महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत त्या क्वारंटाईन सुविधेसाठीच वापरल्या जातील. किंवा त्यांचा उर्वरित भाग (67 टक्के) महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाकडून क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरला जाऊ शकतो, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.

हॉटेल, लॉज सुरु करण्यापूर्वी मालकांना सूचना

1) कोव्हिडपासून बचावासाठी उपाययोजनांची माहिती देणारे फलक/पोस्टर/एव्ही मीडिया दर्शनी भागात लावावेत.
2) हॉटेल आणि पार्किंगसारख्या भागात गर्दीचे योग्यरित्या नियोजन करावे. रांगा किंवा आसन व्यवस्थेत सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी वर्तुळे आखावीत.
3) प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक. रिसेप्शन टेबलजवळ प्रोटेक्शन ग्लास आवश्यक
4) पायाने वापरता येणारी (पेडल ऑपरेटेड) हँड सॅनिटायझर मशीन रिसेप्शन, गेस्ट रुम, लॉबी इथे मोफत उपलब्ध करावीत.
5) फेस मास्क, फेस कव्हर, ग्लोव्हज या गोष्टी हॉटेल कर्मचारी आणि ग्राहक (पाहुणे) या दोघांसाठी उपलब्ध करावीत.
6) चेक इन आणि चेक आऊट करण्यासाठी QR कोड, ऑनलाईन फॉर्म, डिजिटल पेमेंट, ई-वॉलेट अशी विनासंपर्क वापरता येणारी प्रणाली ठेवावी.
7) सोशल डिस्टन्सिंग पाळून लिफ्टमधील व्यक्तींची संख्या मर्यादित ठेवावी.
8) एसी सुरु करण्याबाबत सीपीडब्ल्यूडीच्या मार्गदर्शक सूचना पाळाव्यात. सर्व एअर कंडीशनचे तापमान 24 ते 30 अंश सेल्सिअस या मर्यादेत असावे. आर्द्रता 40 ते 70 टक्के राखावी. ताजी हवा खेळती राहावी यासाठी क्रॉस व्हेंटिलेशन उत्तम असावे.

पाहुण्यांसाठी सूचना

1. कोव्हिडची लक्षणे नसलेल्या Asymptomatic व्यक्तींनाच प्रवेश
2. फेस मास्क असल्यासच प्रवेश मिळणार, हॉटेलमध्ये असताना संपूर्ण वेळ मास्क घालणे आवश्यक
3. प्रवाशांचे तपशील (प्रवासाचा इतिहास, वैद्यकीय स्थिती) आणि ओळखपत्र रिसेप्शनवर देणे बंधनकारक
4. आरोग्य सेतू अ‍ॅप वापरण्याची ग्राहकांना सक्ती
5. हाऊसकीपिंग सुविधा कमीत कमी वापरण्यावर ग्राहकांनी भर द्यावा.

हेही पाहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची हॉटेल असोसिएशसोबत 5 जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या बैठकीत हॉटेल आणि लॉज सुरु करण्यावर हॉटेल असोसिएशनच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती. यावेळी त्यांनी लवकरच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

मुख्यमंत्री आणि हॉटेल्स असोसिएशनच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

  • पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान; हॉटेल्स, रेस्टॉरंटसाठी कार्यपद्धती निश्चित
  • हॉटेल्स आणि लॉज सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल.
  • हॉटेल्समध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी करावी लागेल.
  • एका कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीमुळे हॉटेलमधील सर्व कर्मचारी आजारी पडू शकतात.
  • राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धती, नियमांचे पालन करावे लागेल.
  • स्थानिक कामगार, कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना काढू नका.
  • कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत याची काळजी घ्यावी.

संबंधित बातम्या : 

राज्यातील हॉटेल-लॉज लवकरच सुरु करण्याचा विचार, मुख्यमंत्री आणि हॉटेल्स असोसिएशनच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

Mahajobs | उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना संधी, एमआयडीसीच्या ‘महाजॉब्स पोर्टल’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

(Maharashtra Hotel Lodge Reopen)