LIVE | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा नाशिक जिल्ह्याला फटका, रेशनचे धान्य अडकल्याने 6 तालुके प्रभावित

महाराष्ट्र आणि देशातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर

LIVE | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा नाशिक जिल्ह्याला फटका, रेशनचे धान्य अडकल्याने 6 तालुके प्रभावित
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 8:32 AM

[svt-event title=”कोरोनाच्या सवाटात झालेल्या पदवीधर निवडणुकीला मतदारांचा चांगला उत्साह, जवळपास 60 टक्क्यांपर्यंत मतदान” date=”02/12/2020,8:32AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : कोरोनाच्या सवाटात झालेल्या पदवीधर निवडणुकीला मतदारांचा चांगला उत्साह, अंदाजे 60 टक्क्यांपर्यंत मतदान, वाढीव मतांचा फायदा नेमका कुणाला होणार, दुपार नंतर मतदारांनी मोठया प्रमाणात बाहेर पडून केलं मतदान, 2014 मध्ये 34.70 टक्के झालं होतं मतदान, नवीन मतदारांचे मत निर्णायक ठरण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा नाशिक जिल्ह्याला फटका, रेशनचे धान्य अडकल्याने 6 तालुके प्रभावित” date=”02/12/2020,8:30AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा नाशिक जिल्ह्याला फटका, रेशनचे धान्य अडकल्याने 6 तालुके प्रभावित, पंजाबवरुन येणारा गहू आणि तांदूळ अडकून पडल्याने रेशन दुकानावरील व्यवस्था कोलमडली, जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी, पेठसह 6 तालुक्यात धान्य नाही, तर शहरात देखील रेशन दुकानांवर गहू तांदुळाचा काही ठिकाणी तुटवडा, आंदोलन लांबल्यास धान्य वितारकाना काही दिवसांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”साहित्य खरेदीमध्ये अनियमितता, सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमधील दोषींना घरी बसविण्याचा दत्तात्रय भरणे यांचा इशारा” date=”02/12/2020,8:28AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : सिव्हिल हॉस्पिटलमधील दोषींना घरी बसविण्याचा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा इशारा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सुनील हॉस्पिटल रुग्णालयात वस्तू आणि साहित्य खरेदीमध्ये अनियमितता, खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं माहिती अधिकारातून उघड, कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा नियोजन विकास समितीकडून साडेसहा कोटी निधी [/svt-event]

[svt-event title=”नागरिकांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर थेट हॉटलाईन नंबर म्हणून प्रसिद्ध, नाशिक पोलीस अधीक्षकांचं गृहमंत्र्यांकडून कौतुक ” date=”02/12/2020,8:26AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : गृहमंत्र्यांकडून ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे कौतुक, नागरिकांना तक्रार करण्यास भीती वाटू नये यासाठी सुरु केली हॉटलाईन, अधीक्षक सचिन पाटील यांनी स्वतःचा आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नंबर थेट हॉटलाईन नंबर म्हणून प्रसिद्ध केला, भीती न बाळगता नागरिकांनी थेट तक्रार करण्याचं पोलीस अधीक्षकांचं आवाहन, पोलीस अधीक्षकांच्या उपक्रमाच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरुन केलं कौतुक [/svt-event]

[svt-event title=”अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुसऱ्या नियमित प्रवेशफेरीची गुणवत्ता यादी 5 डिसेंबरला जाहीर होणार” date=”02/12/2020,8:24AM” class=”svt-cd-green” ] पुणे : अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुसऱ्या नियमित प्रवेशफेरीची गुणवत्ता यादी 5 डिसेंबरला जाहीर होणार, अडीच महिन्यांनंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा 26 नोव्हेंबरपासून सुरु, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत एकूण 304 कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असून यात 1 लाख 7 हजार 30 जागांसाठी 1 लाख 992 विद्यार्थ्यांनी केली नोंदणी, आतापर्यंत 30 हजार 544 जणांचे प्रवेश निश्‍चित झाले असून 76 हजार 486 जागा रिक्‍त, 84 हजार 471 विद्यार्थ्यांचे ऑनलाइन भरलेले अर्ज लॉक झाले असून त्यातील 84 हजार 115 अर्जांची पडताळणी पूर्ण [/svt-event]

[svt-event title=”नाशिक शहर पोलिसांचे संत कबीर नगर झोपडपट्टीत धाडसत्र, तडीपार गुंड पवन गोरखला अटक” date=”02/12/2020,8:21AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : शहर पोलिसांचे संत कबीर नगर झोपडपट्टीत धाडसत्र, तडीपार गुंड पवन गोरखला अटक, तडीपार असतानाही शहरात फिरत असल्याची मिळाली माहिती, तडीपार गुंडांचे फोटो प्रत्येक पोलीस स्टेशनबाहेर लावण्याचा परिणाम [/svt-event][svt-event title=”कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरु” date=”02/12/2020,8:20AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरु, लॉकडाऊननंतर पहिल्यांदा न्यायालयाचा परिसर गजबजला, याआधी अनलॉकमध्ये न्यायालय सुरु झाली असली तरी मर्यादित वकिलांनाच होता प्रवेश, सात महिन्यानंतर सर्वस्व वकिलांसह पक्षकारांना मिळाला प्रवेश, कोरोनाचे नियम पळून होणार नियमित कामकाज [/svt-event]

[svt-event title=”भाजप-शिवसेनेतील वाद भुजबळ यांच्या दरबारात, भूमिगत पार्किंगसाठी जिल्हा परिषद स्टेडियमच्या जागेची भाजपची मागणी” date=”02/12/2020,8:19AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : महापौर सतीश कुलकर्णींचे पालकमंत्र्यांना पत्र, भूमिगत पार्किंगसाठी जिल्हा परिषदे स्टेडियमच्या जागेची मागणी, भाजप सेनेतील वाद पालकमंत्री भुजबळ यांच्या दरबारात, छत्रपती शिवाजी स्टेडियमची जागा देण्यास जिल्हा परिषदेतील सत्ताधारी शिवसेनेचा विरोध, शहराच्या मध्यवस्तीत 800 वाहनांच्या पार्किंगसाठी प्रशस्त वाहनतळ उभारण्याचा भाजपचा प्रस्ताव [/svt-event]

[svt-event title=”पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल रोको” date=”02/12/2020,7:25AM” class=”svt-cd-green” ] पालघर : रेल्वे प्रवाशांचं रेल रोको आंदोलन सुरु, पालघर आणि सफाळे स्थानकात प्रवाशांचं आंदोलन, सफाळे स्थानकात प्रवाशांनी 1 तास मुंबईकडे जाणारी राजधानी रोखून धरली, डहाणूवरुन सकाळी सुटणारी चर्चगेट लोकल 3 डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांचं आंदोलन [/svt-event]

[svt-event title=”बॉलिवूड अभिनेता सनी देओलला कोरोनाची लागण ” date=”02/12/2020,7:21AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि गुरदासपूरचे भाजप खासदार सनी देओल यांना कोरोना व्हायरसची लागण, हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी मंगळवारी रात्री उशिरा याबाबत माहिती दिली [/svt-event]

[svt-event title=”हिंगोलीत रब्बीची पेरणी उरकून शेतातून घरी परतताना तीन बैलांचा मृत्यू” date=”02/12/2020,7:16AM” class=”svt-cd-green” ] हिंगोली : रब्बीची पेरणी उरकून शेतातून घरी परतताना तीन बैलांचा मृत्यू, विजेची तार रस्त्यात तुटून पडल्याने त्याला स्पर्श होऊन तीन बैलांचा मृत्यू, कळमनुरी तालुक्यातील सालेगाव शेत शिवरातील घटना [/svt-event]

[svt-event title=”भाईंदरमध्ये गेस्ट हाऊसला आग, सामान जळून खाक” date=”02/12/2020,7:10AM” class=”svt-cd-green” ] मिरा भाईंदर : भाईंदर पूर्व नवघर रोड परिसरातील ओम साई गेस्ट हाऊसमध्ये सकाळी 4 च्या सुमारास आग, घटनास्थळी मनपा अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल, आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश, परंतु गेस्ट हाऊसमध्ये असलेलं सर्व सामान आगीत जळून खाक, या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही [/svt-event]

[svt-event date=”02/12/2020,7:06AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.