राज्याचे मिनी काश्मीर पर्यटकांनी बहरलं, नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर सज्ज

गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जाणार महाबळेश्वर पर्यटकांनी बहरलं आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी याठिकाणच्या बाजारपेठाही विद्युत रोषणाईने सजल्या (Mahabaleshwar in winter) आहेत.

Mahabaleshwar in winter, राज्याचे मिनी काश्मीर पर्यटकांनी बहरलं, नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर सज्ज

सातारा : नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी राहिले (Mahabaleshwar in winter) आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण विविध ठिकाणी फिरायला जात असतात. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जाणार महाबळेश्वर पर्यटकांनी बहरलं आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी याठिकाणच्या बाजारपेठाही विद्युत रोषणाईने सजल्या आहे. तसेच नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात जत्रेचं स्वरुप आलेले पाहायला मिळत (Mahabaleshwar in winter) आहे.

राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा दिवसेंदिवस खाली घसरत आहेत. मिनी कश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्येही अनेकजण गुलाबी थंडीचा आनंद घेत आहे. महाबळेश्वरमध्येही अनेक पर्यटक नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. समुद्र सपाटीपासून सुमारे 4700 फूट उंचीवर असलेले थंडगार हवेचं ठिकाण अशी महाबळेश्वरची ओळख आहे.

Mahabaleshwar in winter, राज्याचे मिनी काश्मीर पर्यटकांनी बहरलं, नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर सज्ज

गेल्या दहा दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. बाजारपेठेतील खरेदीसोबतच अनेक पर्यटक नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णा लेकची सफर करत आहेत.

“महाबळेश्वरमध्ये सध्या संपूर्ण मार्केटमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी केलेली विद्युत रोषणाई पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. महाबळेश्वरमध्ये आलेला प्रत्येक जण या मार्केटची सफर करतो आहे. विशेष म्हणजे थंडीसोबत या ठिकाणचा निसर्गही पर्यटकाला भारावतो आहे. डोळ्यात साठवून किती ठेवावं तितकं कमीच,: अशी प्रतिक्रिया पर्यटकांनी व्यक्त करत (Mahabaleshwar in winter) आहे.

Mahabaleshwar in winter, राज्याचे मिनी काश्मीर पर्यटकांनी बहरलं, नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर सज्ज

महाबळेश्वरच्या सौंदर्यात भर टाकणार ठिकाण म्हणजे वेण्णा लेक. अथांग पाण्याचा सागर आणि तेही एवढ्या मोठ्या उंचीवर. या सागरावर महाबळेश्वरच्या गिरीस्थान नगरपालिकेच्या बोटी पर्यटकांना आकर्षित करतात. तसेच या ठिकाणच्या घोडेस्वारीचा आनंद घेताना हि पर्यटक दिसत आहेत.

यंदाच्या वर्षीचा दिवाळीचा हंगाम म्हणावा तितका चांगला झाला नाही. यावर्षी नववर्षासाठी पर्यटक महाबळेश्वरला पसंती देत असल्याने या ठिकाणचे व्यासायिक समाधान व्यक्त करत आहे.

Mahabaleshwar in winter, राज्याचे मिनी काश्मीर पर्यटकांनी बहरलं, नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर सज्ज

सध्या महाबळेश्वरच चित्र पहाता एखाद्या जत्रेचं स्वरुप या महाबळेश्वरला आलं आहे. यामुळे मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरला नववर्षाच स्वागत जोमाने होणार असल्याचे दिसत (Mahabaleshwar in winter) आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *