सुसरी धरणाच्या पाण्याचा फुगवटा, रस्ता बंद, पीकं पाण्याखाली, शेतकरी-गावकऱ्यांना आर्थिक फटका, समस्या वाढल्या

शहादा तालुक्यातील सुसरी धरण पूर्ण क्षमतेने अर्थात ६.१८७ टीएमसी पाणी भरले आहे. त्यामुळे धरणाच्या बॅकवॉटरमुळे परिसरातील शेतात पाणी साचले आहे. तर गोदीपूर ते नवलपूर रस्ता पाण्यात गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

सुसरी धरणाच्या पाण्याचा फुगवटा, रस्ता बंद, पीकं पाण्याखाली, शेतकरी-गावकऱ्यांना आर्थिक फटका, समस्या वाढल्या
सुसरी धरणाच्या बॅकवॉटरचा मोठा फटका स्थानिकांना बसला आहे.

नंदूरबार : शहादा तालुक्यातील सुसरी धरण पूर्ण क्षमतेने अर्थात ६.१८७ टीएमसी पाणी भरले आहे. त्यामुळे धरणाच्या बॅकवॉटरमुळे परिसरातील शेतात पाणी साचले आहे. तर गोदीपूर ते नवलपूर रस्ता पाण्यात गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वारंवार निवेदनं देऊनही उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय.

शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान, प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

शहादा तालुक्यातील सुसरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाचे बॅकवॉटर शेतात आणि रस्त्यावर आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जवळपास सहाशे एकर क्षेत्रावरील पिके तर नवलपूर हा रस्ता पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तर दुसरीकडे आठ किलोमीटर फिरुन जाऊनही वाहने शेतापर्यंत जाऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. वारंवार निवेदन देऊनही पाटबंधारे विभाग याकडे लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली असून तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.

साडे चारशे क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग

सुसरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला असल्याने यावर्षी धरण शंभर टक्के भरले असून धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी एक दरवाजा उघडून साडे चारशे क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून पाणी साठा नियंत्रित केला जात आहे.

दरवर्षी सुसरी धरणाच्या बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांना समस्या येत असते शेतकरी राजकीय नेते आणि प्रशासनाला निवेदन देत असतात मात्र उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

(maharashtra nandurbar Susri Dam overflow)

हे ही वाचा :

गृहमंत्री झाल्यावर शुगर-बीपी त्रास हमखास सुरु होतो, RR आबांनी मला त्याचवेळी सांगितलं होतं, जयंत पाटलांची फटकेबाजी

शिवाजी पार्कवर इटलीचे दिवे, हा योगायोग की ‘इटली’चं लांगुलचालन?, मनसेचा खोचक सवाल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI