घरात पेस्ट कंट्रोलची फवारणी भोवली, ठाण्यात चार वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू

घरात केलेली पेस्ट कंट्रोलची फवारणी एका चार वर्षीय चिमुरडीच्या जिवावर बेतल्याची (Four Year Old Girl Died) घटना ठाण्यात घडली आहे.

घरात पेस्ट कंट्रोलची फवारणी भोवली, ठाण्यात चार वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू
Thane Pest Control
Nupur Chilkulwar

|

Mar 16, 2021 | 3:31 PM

ठाणे : घरात केलेली पेस्ट कंट्रोलची फवारणी एका चार वर्षीय चिमुरडीच्या जिवावर बेतल्याची (Four Year Old Girl Died) घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरात ही घटना घडली. मुलीच्या आईची प्रकृती उपचारांनंतर स्थिर असली तरी मुलगी गमावल्याचा जबर धक्का या कुटुंबाला बसला आहे (Maharashtra News Four Year Old Girl Died After Pest Control In House In Thane).

नेमकं काय घडलं?

फेब्रिकेशनचा व्यवसाय असलेले राजू पांडुरंग पालशेतकर हे पत्नी आणि चार वर्षांची मुलगी ऋत्वीसह कासारवडवली येथील डेफोडिल सोसायटीत राहत होते. त्यांच्या घरात शनिवारी 13 मार्चला पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. पेस्ट कंट्रोलचे काम दुपारी 3.30 ला संपले. त्यानंतर पाच वाजता कुटुंब आपल्या घरात गेले होते. त्यावेळी पेस्ट कंट्रोलचा वास येतच होता.

पेस्ट कंट्रोलनंतर या रसायनाचा वास येत असतानाही पालशेतकर कुटुंबांने त्याकडे दुर्लक्ष केले. हाच उग्र वास थोड्या वेळाने या कुटुंबासाठी घातक ठरला. या वासामुळे ऋत्वीला रात्री अडीचच्या सुमारास उलटी झाली. पत्नीलाही मळमळ जाणवू लागली.

पेस्टकंट्रोलच्या वासामुळे हा त्रास होत असल्याचे गृहित धरुन या दोघांना थोड्या वेळाने बरे वाटेल, असे पालशेतकरांना वाटले. पण, सकाळनंतर पुन्हा या दोघींना त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पत्नी आणि मुलीला घोडबंदर येथील नोबल रुग्णालयात 14 मार्चला पालशेतकरांनी दाखल केले.

उपचार सुरु झाल्यानंतर पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा झाली. सायंकाळपर्यंत मुलीच्या प्रकृतीत फारसा फरक पडला नाही. अखेर सायंकाळी सहाच्या सुमारास या चिमुरडीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यामुळे पालशेतकर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Maharashtra News Four Year Old Girl Died After Pest Control In House In Thane

संबंधित बातम्या :

विक्रोळीतील नाल्यात मृतदेह सापडला, ओळख पटवण्याचे प्रयत्न

एकतर्फी प्रेमातून कॉलेज तरुणीवर प्राणघातक हल्ला, नंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांचं कॅन्सरने निधन, जिद्दी मुलाचं MPSC तून अधिकारी होण्याचं स्वप्न, मात्र गणेशला नियतीने गाठलं!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें