Maharashtra News Live Update : सगळ्या गोष्टींची लिंक या मातोश्रीवर लागत असतील तर उद्धव ठाकरेंचीही चौकशी करा; आमदार रवी राणा यांच खळबळजनक वक्तव्य

| Updated on: Aug 01, 2022 | 3:39 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : सगळ्या गोष्टींची लिंक या मातोश्रीवर लागत असतील तर उद्धव ठाकरेंचीही चौकशी करा; आमदार रवी राणा यांच खळबळजनक वक्तव्य
मोठी बातमी

मुंबई : आज सोमवार 1 ऑगस्ट 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. माथेरानचे शिवसेना नेते प्रसाद सावंत यांना अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिलीये. सावंत यांना रविवारी फोनवरून ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी सावंत यांनी माथेरान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Aug 2022 03:00 PM (IST)

    सोलापूरच्या अनगरमधील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठेनी व्यक्त केली पक्ष श्रेष्ठींवर नाराजी

    सोलापूरच्या अनगरमधील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बळीराम साठेनी व्यक्त केली पक्ष श्रेष्ठींवर नाराजी

    वेळीच लक्ष न दिल्यास राजन पाटलांना तिसरा पर्याय असल्याचे सांगत भाजपात जाण्याचे केले सुचक वक्तव्य

    -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठेंचा घरचा आहेर

    -पक्षातील कुरघोडीवर थेट केले भाष्य; पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर साठेंचा निशाणा

    -पक्ष श्रेष्ठींनी एकनिष्ठ नेते मंडळीवर वेळीच लक्ष न दिल्यास वेगळ्या परिणामाला सामोरे जावे लागेल

  • 01 Aug 2022 02:54 PM (IST)

    जामनेर तहसील कार्यालयावर आदिवासी बांधवांचा आक्रोश मोर्चा; आदिवासी युवक श्याम ठाकरेची जंगलात निघृण हत्या

    जामनेर तहसील कार्यालयावर आदिवासी बांधवांचा आक्रोश मोर्चा

    आदिवासी एकता परिषदेतर्फे संतप्त आदिवासी बांधवांनी केले जळगाव रोडवर रस्ता रोको आंदोलन

    आदिवासी युवक श्याम ठाकरे यांची जंगलामध्ये निघृण हत्येच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा

    आरोपीवर कारवाई करण्याची केली मागणी

  • 01 Aug 2022 02:37 PM (IST)

    ज्यांच्यावर कारवाई होते त्यांचं घर उद्ध्वस्त होतं; छगन भुजबळ

    राऊत यांच्यावरील कारवाई फारच दुःखद

    ज्यांच्यावर कारवाई होते ते फारच अडचणीचं होतं

    घरदार उद्ध्वस्त होत

    शिंदे गटांनी असं करू नये

    वर्षानुवर्षे आपण एकत्र राहिलेलो असतो

    एवढं कटू कुणी बोलू नये

  • 01 Aug 2022 02:34 PM (IST)

    संजय राऊत यांना विशेष कोर्टात हजर करणार; ईडी कोठडीची मागणी करणार

    संजय राऊत यांना विशेष कोर्टात हजर करणार

    तीन वाजता सुनावणीला सुरुवात होणार

    ईडीकडून संजय राऊत यांच्या कोठडीची मागणी करणार

  • 01 Aug 2022 02:29 PM (IST)

    ईडीच्या अटकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांची जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी

    ईडीच्या अटकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांची जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी

    संजय राऊत यांची सुमारे 40 मिनिटे वैद्यकीय तपासणी

    संजय राऊत डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर येताच रुग्णालयातून शिवसेना कार्यकर्त्यांची समर्थनाथ घोषणाबाजी

    त्यानंतर संजय राऊत यांनी हात हलवून कार्यकर्त्यांचे मानले आभार.

    संजय राऊत यांच्या वैद्यकीय तपासणीपूर्वी रुग्णालयाच्या आत आणि बाहेर पोलीस बंदोबस्त

  • 01 Aug 2022 02:09 PM (IST)

    शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेचा शिवसेनेकडून चंद्रपुरात निषेध

    शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेचा शिवसेनेकडून निषेध

    जटपूरा गेट परिसरात शिवसैनिकांनी केलं जोरदार निषेध आंदोलन आणि घोषणाबाजी

    राऊत यांची अटक हे भाजपचे घाणेरडं राजकारण असून भाजपची आम्ही शरणागती पत्करावी म्हणून हे दबावाचं राजकारण सुरू

    राऊत हे भाजपचं राजकारण उघड करत होते म्हणून त्यांना अटक

  • 01 Aug 2022 01:59 PM (IST)

    सर्व राज्यच रामभरोसे चालले;दिलीप वळसे-पाटील

    राज्यात सत्ता स्थापन होऊन महिना उलटला तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार नाही

    त्यामुळे सर्व राज्यच रामभरोसे चालले असून एकीकडे जनतेचे प्रश्न प्रलंबित

    कुठल्याच खात्याचा मंत्री नाही अशा शब्दात दिलीप वळसे-पाटील यांनी सरकारवरती निशाणा साधला

    संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईचे समर्थन करता येणार नाही अस मत वळसे पाटील यांनी व्यक्त केलं आहे

  • 01 Aug 2022 01:50 PM (IST)

    काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर; मुरुगराजेंद्र मठालाही भेट देण्याची शक्यता

    काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर

    2 आणि 3 ऑगस्ट

    बेंगळुरू, हुबळी, चित्रदुर्ग आणि दावणगिरी इथं पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार

    मुरुगराजेंद्र मठालाही भेट देण्याची शक्यता

  • 01 Aug 2022 01:48 PM (IST)

    मागासलेला वर्ग पुढे जात आहे ही सर्व महापुरुषांची देणः काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे

    काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरेंकडून अण्णा भाऊ साठे जयंतीच्या शुभेच्छा

    मागासलेला वर्ग पुढे जात आहे ही सर्व महापुरुषांची देणं आहे

    प्रचंड त्यांच कार्य आहे व योगदान आहे त्यामुळे भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे

    लोकशाही पद्धतीने सरकार चालायला पाहिजे ते चालत नाही

  • 01 Aug 2022 01:36 PM (IST)

    संजय राऊत हे अडीच वर्ष खलनायकी भूमिकेत होते;सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

    शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या ईडीने केलेल्या अटकेवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

    संजय राऊत हे अडीच वर्ष खलनायकी भूमिकेत होते.

    त्यांनी कधीही महाराष्ट्राचे-शेतकऱ्यांचे-वंचितांचे प्रश्न मांडले नाहीत.

    त्याऐवजी आमदारांना रेडे म्हणत महिलेलाही अपशब्द वापरले.

    70 सेकंदात 70 शिव्या देण्याचा विक्रम ज्यांच्या नावे आहे

    अशांनी महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी शेतकरी आंदोलनातील टीकेत त्यांचीही गळाभेट घेतली होती याकडे त्यांनी लक्ष वेधले.

  • 01 Aug 2022 01:20 PM (IST)

    उद्धव ठाकरे राऊत कुटुंबियांच्या भेटीसाठी रवाना, मैत्री निवासस्थानी भेट घेणार

    उद्धव ठाकरे राऊत कुटुंबियांच्या भेटीसाठी रवाना,

    मैत्री निवासस्थानी भेट घेणार

  • 01 Aug 2022 12:32 PM (IST)

    संजय राऊत यांना सूडबुद्धीने अटक; काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खरगे

    संजय राऊत यांना सूडबुद्धीने अटक

    काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खरगे

    विरोधक मुक्त संसद सत्ताधाऱ्यांना हवी आहे, म्हणून ते हे करत आहेत

    पण राऊत हे लढत आहेत

  • 01 Aug 2022 12:29 PM (IST)

    सगळ्या गोष्टींची लिंक या मातोश्रीवर लागत असतील तर उद्धव ठाकरेंचीही चौकशी करा; आमदार रवी राणा यांच खळबळजनक वक्तव्य

    सगळ्या गोष्टींची लिंक या मातोश्रीवर लागत असतील तर

    उद्धव ठाकरेंचीही चौकशी करा

    आमदार रवी राणा यांच खळबळजनक वक्तव्य

    उद्धव ठाकरेंवरही कारवाई व्हायला हवी

    काँग्रेस आणि एनसीपीसोबत संजय राऊतांनी डील केलं

    आणि डील केली म्हणून उद्धव ठाकरे काँग्रेससोबत बसलेत

    मातोश्रीपर्यंत लिंक लागेल

    ईडी ही एक सक्षम यंत्रणा आहे

    ज्या राज्यात ज्या सरकारने घोटाळे केले

    अशा लोकांवर कारवाई करते

    सात आठ महिन्यापासून चौकशी सुरू होती

    पुरावे समोर आले म्हणून ईडीनं अटक केली

    अनिल परबची चौकशी सुरू आहे

    घोटाळ्याचे फाईलही चार्ज झालेत

    काँग्रेस आणि एनसीपीकडून मोठं डील झालं आहे

    जर काही लिंक या मातोश्रीपर्यंत जाणार असतील तर चौकशी झाली पाहिजे

    संजय राऊतांवरील कारवाई राजकीय;नाही

    ईडी हे एक स्वायत्त संस्था आहे

    आता पुढच्या काळात अनिल परब गजाआड झालेले दिसतील

  • 01 Aug 2022 12:27 PM (IST)

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा; राज ठाकरे यांनी केली मागणी

    - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा,

    - मनसे नेते बाबू वागस्कर यांची राज्य सरकारकडे मागणी,

    - यासंदर्भात राज्य सरकारने पाठपुरावा करावा,

    - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यासंदर्भात मागणी केली आहे.

  • 01 Aug 2022 12:04 PM (IST)

    गुजरातमधील एकाच बंदरातून सुमारे 22 हजार कोटी रुपयांची ड्रग्ज जप्त; सरकारी यंत्रणेकडून मौन; प्रियंका गांधींचे ट्विट

    गुजरातमधील एकाच बंदरातून सुमारे 22 हजार कोटी रुपयांची ड्रग्ज जप्त

    माध्यमांमधूनही त्याची बातमी नाही सरकारी ययंत्रणां बाळगले मौन

    भाजप सरकारच्या काळात माफिया देशभर ड्रग्ज वितरीत करत आहेत.

    कायदा आणि सुव्यवस्था हतबल आहे की माफियांची मिलीभगत आहे?

    काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे ट्विट

  • 01 Aug 2022 11:50 AM (IST)

    पालघर जिल्ह्यातही शिवसैनिक आक्रमक; घोषणाबाजी करत ईडी विरोधात निषेध

    पालघर जिल्ह्यात वाडा येथे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत

    संजय राऊत यांच्या अटके विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून

    बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या फोटोला हार घालून

    घोषणाबाजी करत ईडीविरोधात निषेध

  • 01 Aug 2022 11:43 AM (IST)

    नाशिकात संजय राऊतांच्या समर्थनाथ शिवसैनिकांचे आंदोलन

    -संजय राऊतांच्या कारवाईविरोधात शिवसेना आक्रमक

    -सेना कार्यालया बाहेर शिवसैनिकांचे आंदोलन

    -घोषणाबाजी करत ईडी आणि भाजप विरोधात घोषणाबाजी

  • 01 Aug 2022 11:04 AM (IST)

    अनिल देसाई म्हणतात...

    जे पी नड्डा फार शक्तीशाली व्यक्ती आहे

    भाजपा कसा राष्ट्रीय कार्यक्रम राबवतोय

    मात्र या देशात तरी लोकशाही आहे आणि लोक हे सगळं बघतायेत

  • 01 Aug 2022 10:48 AM (IST)

    औरंगाबादेत शिवसेनेचे तीव्र निषेध आंदोलन

    औरंगाबादेत शिवसेनेचे तीव्र निषेध आंदोलन

    संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन

    चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

    आंदोलनात शेकडो शिवसैनिक सहभागी

    ईडी आणि भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

  • 01 Aug 2022 10:35 AM (IST)

    श्रीरंग बारणे म्हणतात...

    संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली हे आपल्या माध्यमातून समजतंय

    मात्र मी या विषयावर जास्त काही बोलणार नाही,

    तो सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर भाग आहे त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही

    शिंदे गटाच्या आमदार खासदार टीका केली जात होती,

    मात्र टीका करणे लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे

    ईडीच्या दुरुपयोगाच्या आरोपावर बोलण्यास श्रीरंग बारणे यांचा नकार

  • 01 Aug 2022 10:24 AM (IST)

    चलो राजभवन, राष्ट्रवादीचा राज्यपालांविरोधात मोर्चा

    चलो राजभवन...

    राष्ट्रवादीचा राज्यपालांविरोधात मोर्चा

    बंद करो होशियारी महाराष्ट्र से भागावो कोश्यारी

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा जाहीर निषेध

    बसेसवर बॅनर लावत राष्ट्रवादीकडून निषेध

  • 01 Aug 2022 10:12 AM (IST)

    संकेत सरगरला मदतीचा हात

    कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगरच्या कुटूंबाला अभिजीत कदम मेमोरियल फाउंडेशन कडून एक लाखाची मदत तर ज्या अकॅडमीमध्ये संकेतने सराव केला त्या दिग्विजय अकॅडमी ला पाच लाखाची मदत काँग्रेस नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी जाहीर केली आहे.

  • 01 Aug 2022 09:53 AM (IST)

    महात्मा फुले कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद, व्हीडीओ व्हायरल...

    महात्मा फुले कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटात संघर्ष

    वसतिगृहात रहाणारे ( अधिकृत ) आणि न रहाणाऱ्या ( अनाधिकृत ) विद्यार्थ्यांमध्ये झाले वादंग

    रविवारी पहाटेच्या सुमारास घडला प्रकार

    अधिकृतपणे राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती

    मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विद्यार्थ्यांचा गोंधळ

    दोन गटात वाद वाढल्यानं अनेक विद्यार्थी बसले होते लपून

    सुरक्षा रक्षक आणि प्रशासनाने हस्तक्षेप करत वाद मिटविला

    वसतिगृहात राहणारे आणि बाहेरून अभ्यासाला येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये झाले होते वादंग

    वादाचा व्हीडीओ व्हायरल

  • 01 Aug 2022 09:42 AM (IST)

    विश्वजीत कदम यांचा केंद्र सरकारवर निशाणा

    देशात लोकशाही राहिले की नाही, असा प्रश्न देशातील सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झाला आहे. ज्या हुकूमशाही पद्धतीने आज केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून राजकीय द्वेष डोळ्यासमोर ठेऊन विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातोय. हे देशासाठी घातक आहे, अश्या शब्दात काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

  • 01 Aug 2022 09:32 AM (IST)

    राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटात संघर्ष

    महात्मा फुले कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटात संघर्ष... वसतिगृहात रहाणारे (अधिकृत) आणि न रहाणाऱ्या (अनाधिकृत) विद्यार्थ्यांमध्ये झाले वाद रविवारी पहाटेच्या सुमारास घडला प्रकार अधिकृतपणे राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विद्यार्थ्यांचा गोंधळ दोन गटात वाद वाढल्यानं अनेक विद्यार्थी बसले होते लपून सुरक्षा रक्षक आणि प्रशासनाने हस्तक्षेप करत वाद मिटविला वसतिगृहात राहणारे आणि बाहेरून अभ्यासाला येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाद

  • 01 Aug 2022 09:26 AM (IST)

    संजय राऊत यांच्या वैद्यकीय तपासणीपूर्वी जेजे रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

    संजय राऊत यांच्या वैद्यकीय तपासणीपूर्वी जेजे रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे,

    रुग्णालयाच्या दोन्ही गेटवर प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात

    जेजे रुग्णालयाच्या आजूबाजूचे रस्ते मोकळे करण्यात आले

    संजय राऊत यांना गोरेगाव पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी ईडीने अटक केली असून वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना आज न्यायालयात हजर करणार

  • 01 Aug 2022 09:15 AM (IST)

    आगामी काळात देशातील सर्व पक्ष संपतील; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

    आगामी काळात देशातील सर्व पक्ष संपतील

    फक्त भाजप हाच एकमेव पक्ष शिल्लक राहील.

    भाजप हा विशिष्ट विचारधारेवर चालणारा पक्ष आहे.

    आपल्या विचारांसमोर सर्व पक्ष नष्ट होतील.

    जे उरतील ते देखील संपून जातील - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा

    बिहारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जे.पी. नड्डा यांचे वक्तव्य

    बिहारमधील भाजपच्या 16 जिल्हा कार्यालयांचे उद्घाटन

  • 01 Aug 2022 09:08 AM (IST)

    संजय राउताना अटक करण्यासाठी हा प्लॅन ; ही सूडबुद्धीची कारवाई असल्याची सुनील राऊतांची टीका

    न्यायालयीन लढाई लढणार पाहू काय होत ते

    आयोध्याचे पैसे होते काल मिळालेले ते पैसे पक्षाला जमा करायचे होते

    पत्रा चाळ बोगस प्रकरण आहे

    दादरच्या फ्लॅटसाठी कर्ज घेतलं होतं

    स्वप्ना पाटकरच ते बोगस आहे, हे किरीट सोमय्याचा हात आहे

    संजय राउताना अटक करण्यासाठी हा प्लॅन आहे

    सगळं बोगस आहे

    सूडबुद्धीची कारवाई आहे

    नोटीस येउ द्या आम्ही बाळासाहेब यांचे सैनिक आहोत

    शिवसेनेचे भोंगे बंद होत नाही ते संजय राउत आहे मला जरी अटक केली तरी आम्ही लढत राहू

    कोण रवी राणा त्याची काय लायकी त्याने त्याचे घर संभाळाव

    संजय राऊताना अटक करण्यासाठी ही कारवाई केली गेली आहे

    एकनाथ शिंदेचा भोंगा काही दिवसांनी बंद होईल

  • 01 Aug 2022 08:50 AM (IST)

    शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदीचं राज्यसभा अध्यक्षांना पत्र; केंद्रीय यंत्रणांच्या दुरूपयोगावर चर्चा घेण्यासाठी पत्र

    -शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदीचं राज्यसभा अध्यक्षांना पत्र

    -आजच्या सत्रात केंद्रीय यंत्रणांच्या दुरूपयोगावर चर्चा घेण्यासाठी पत्र

    - इडी , सीबीआय, आयटीचा देशात दुरूपयोग होत असलेयाचा प्रियंका चतुर्वेदींचा आरोप

    - इतर विषय सस्पेंड करून यंत्रणांच्या दुरुपयोगावर चर्चा करण्याची मागणी

  • 01 Aug 2022 08:45 AM (IST)

    संजय राऊत यांना अटक यापूर्वी व्हायला हवी होतीः रवी राणा यांची टीका

    संजय राऊत यांना अटक यापूर्वी व्हायला हवी होती

    उद्धव ठाकरे सरकारमध्ये संजय राऊत यांच्यासह अनेक बांधकाम व्यावसायिकांचा घोटाळा

    संजय राऊत यांनी पैसे घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले

    आता अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

  • 01 Aug 2022 08:41 AM (IST)

    पवना धरण परिसरात पावसाची तीन दिवसांपासून दडी; गुरुवारी 81.47 टक्के असलेला पाणीसाठा 0.24 टक्क्यांनी घटला

    पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ वासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाची तीन दिवसांपासून दडी

    -गुरुवारपासून शनिवारपर्यंत शुन्य मिलिमीटर पाऊस

    -त्यामुळे गुरुवारी 81.47 टक्के असलेला पाणीसाठा 0.24 टक्क्यांनी घटून 81.23 टक्के इतका झाला

    -आज सकाळपर्यंत एकूण 1581 मिलिमीटर पावसाची नोंद

    -गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला एकूण पाऊस 1806 मिमी

    -त्यामुळे 215 मिमी पाऊस यावर्षी आजपर्यंत कमी झाला

    -आजचा पाणीसाठा 81.23 टक्के आहे.

    गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 86.04 टक्के होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेने आजचा पाणीसाठा 4.81 टक्के कमी

  • 01 Aug 2022 08:30 AM (IST)

    पुण्यात मंकी पॉक्सची लक्षणे असलेल्या 13 संशयित रुग्णांचे नमुने तपासले

    राज्यात मंकी पॉक्सची लक्षणे असलेल्या 13 संशयित रुग्णांचे नमुने तपासले

    त्यापैकी कोणालाही या आजाराचा संसर्ग झाला नाही

    प्रयोगशाळेतर्फे निर्वाळा देण्यात आला

    देशात केरळपाठोपाठ दिल्लीमध्ये मंकी पॉक्सचे रुग्ण आढळले

    त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचे सतर्कतेचे आदेश

    त्यासाठी या संसर्गजन्य आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि साथरोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

  • 01 Aug 2022 08:08 AM (IST)

    नाशिकमधील पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त त्रंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी

    पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त त्रंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी

    मंदिराबाहेर दर्शनासाठी लांब रांगा

    महापूजन आणि आरतीनंतर मंदिर भाविकांसाठी खुले

    संस्थांच्यावतीने ऑनलाईन दर्शनाचीदेखील व्यवस्था

  • 01 Aug 2022 08:04 AM (IST)

    युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर; कुडाळमध्ये वेलकम ओरिजनल टायगर म्हणून झळकले बॅनर

    युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

    तळ कोकणातून शिवसेनेच्या शिव समर्थन अभियानाचा दुसरा टप्पा

    कुडाळ आणि सावंतवाडीत शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन

    कुडाळमध्ये वेलकम ओरिजनल टायगर म्हणून झळकले बॅनर

    कुडाळ इथल्या शिवसेना शाखेसमोर आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा

    आदित्य ठाकरे यांचे चिपी विमानतळ होणार जोरदार स्वागत

  • 01 Aug 2022 07:45 AM (IST)

    वसतिगृहातील मेस कॅान्ट्रॅक्टरने विद्यार्थ्यांना मारण्याचा प्रयत्न; जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार

    - वसतिगृहातील मेस कॅान्ट्रॅक्टर मुलांवर धावला मारायला

    - मेसचालकाकडून सायकल विद्यार्थ्यांवर टाकण्याचा प्रयत्न

    - विद्यार्थ्यांना मारण्याचा प्रयत्न करण्याचा सीसीटीव्ही टीव्ही 9 च्या हाती

    - नागपूरातील मनिषनगर बाळासाहेब आंबेडकर सरकारी वसतिगृहातील धक्कादायक प्रकार

    - विद्यार्थ्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची केली तक्रार

    - वसतिगृहाच्या वॅार्डनकडे केली तक्रार

    - मेसचालकावर कारवाई होणार?

  • 01 Aug 2022 07:38 AM (IST)

    नागपूर मेडिकलमध्ये दोन डॅाक्टरांना चावले मोकाट कुत्र्याचा हल्ला; आठवडाभरातील चौथी घटना

    - नागपूर मेडिकलमध्ये दोन डॅाक्टरांना चावले मोकाट कुत्र्यांचा हल्ला

    - दोन्ही डॅाक्टरांवर मेडिकल रुग्णालयात उपचार

    - रविवारी रात्री दोन तासांत दोन डॅाक्टरांवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला

    - नागपूर मेडिकल परिसरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस

    - मेडिकल परिसरात मोकाट कुत्रे चावण्याची आठवडाभरातील चौथी घटना

    - मोकाट कुत्र्यांमुळे डॅाक्टरांमध्ये भितीचं वातावरण

    - महानगरपालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास डॅाक्टरांचा संपाचा इशारा

  • 01 Aug 2022 07:33 AM (IST)

    आम्ही न्यायालयीन लढाई लढू - महापौर

    आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढू, पण शिवसेना सोडणार नाही अशी प्रतिक्रिया राऊतांच्या अटकेनंतर राऊतांनी दिली आहे

  • 01 Aug 2022 07:27 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात महिनाभरात कोरोनाचे 5 हजारपेक्षा जास्त रुग्ण; महिनाभरात 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू

    - नागपूर जिल्ह्यात महिनाभरात कोरोनाचे पाच हजारपेक्षा जास्त रुग्ण

    - जुनच्या तुलनेत जुलै महिन्यात 77 टक्के वाढले कोरोनाचे रुग्ण

    - महिनाभरात 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू

    - गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 174 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

  • 01 Aug 2022 07:25 AM (IST)

    अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी दहा वर्षांचा कारावास; भंडारा जिल्ह्यातील शिवनाळा येथील घटना

    अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी दहा वर्षांचा कारावास.

    शिवनाळा येथील घटना.

    आरोपी कवडू दोषी सिद्ध होत आरोपी कवळू सिंदीमेश्राम यास कलम 6 पोक्सो एक्ट 2012 भादंवि अंतर्गत 19 वर्षे सश्रम कारावास व 10 हजारचा दंड

    जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

  • 01 Aug 2022 07:21 AM (IST)

    अतिरुद्र महायागाला श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात प्रारंभ; 9 ऑगस्टपर्यंत दररोज धार्मिक विधी

    अतिरुद्र महायागाला श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात प्रारंभ,

    - अकरा दिवसीय अतिरुद्र महायागाला दगडूशेठ गणपती मंदिरात प्रारंभ,

    - जगाच्या कल्याणाकरीता आणि आरोग्यसंपन्न समाजाकरीता 125 ब्रह्मवृंद हा याग करीत आहेत,

    - 9 ऑगस्टपर्यंत दररोज दुपारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी मंदिरात सुरु रहाणार,

    - गंगा, यमुना, इंद्रायणी, पंचगंगा, मुठा, अष्टविनायक येथील नद्या, ज्योर्तिलिंग नद्या, रामेश्वरम 21 कुंडांचे जल याकाळात वापरले जात आहे.

  • 01 Aug 2022 07:18 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पुणे दौऱ्यावर; पुरंदर येथे जाहीर स

    - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पुणे दौऱ्यावर

    - पुणे दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची पुरंदर येथे जाहीर सभा

    - शिवाय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या पुण्यात आढावा बैठकीचे आयोजन

    - पुण्यातील विकासकामांच्या उद्घाटनांसोबत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची महाआरती

  • 01 Aug 2022 07:03 AM (IST)

    प्रशासनाच्या रेकॅार्डनुसार नागपूर जिल्ह्यात केवळ ११४ शाळाबाह्य मुलं; ‘मिशन झिरो ड्रॅापआऊट’चा नागपूर जिल्ह्यातील अहवाल सादर

    - प्रशासनाच्या रेकॅार्डनुसार नागपूर जिल्ह्यात केवळ ११४ शाळाबाह्य मुलं

    - ‘मिशन झिरो ड्रॅापआऊट’चा नागपूर जिल्ह्यातील अहवाल सादर

    - सामाजिक कार्यकर्त्यांच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांची संख्या दीड ते दोन हजार

    - सरकार बदलल्यावर ‘मिशन झिरो ड्रॅापआऊट’ रखडले?

    - प्रशासनाने गांभीर्याने शाळाबाह्य मुलांचा शोध घेणं गरजेचं

  • 01 Aug 2022 06:50 AM (IST)

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या सर्व याचिका फेटाळून लावा ; शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा याचिका

    शिंदे गट पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात

    शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या सर्व याचिका फेटाळून लावा

    'खरी' शिवसेना कोणत्या गटाची आहे, याचा निर्णय निवडणूक आयोगाला ठरवू द्या

    या मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल

  • 01 Aug 2022 06:45 AM (IST)

    संजय राऊतांना अटक केल्यानंतर आमदार संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया

    संजय राऊतला अटक झालेली ही प्रोसेस गेल्या चार सहा महिन्यापासून होते . चार वेळा नोटीस देणे आणि नोटीस ला उत्तर न देणे , हजर न राहने  . कदाचित संजय राऊतला जास्त आत्मविश्वास होता की माझ्यावर काय होणार नाही परंतु ही अशी संस्था आहे  . पूर्ण कागपत्र घेतल्याशिवाय कुणावर कारवाई करत नाही . मला आश्चर्याचा धक्का यावर बसला की त्यांच्याकडे दहा-अकरा लाख रुपये सापडले आहेत आणि त्यावर शिंदे साहेबांचे नाव होतं .

    म्हणजे रामाचं मंदिर उभारण्यासाठी शिंदे साहेबांनी दिलेले पैसे तेही या माणसाने घरी ठेवले काय की ,

    जैसा करेगा वैसा भरेगा त्याच पद्धतीने संजय राऊत चा हा टाईम आलेला आहे .

    तुम्ही दुसऱ्यांना नावं ठेवणं दुसऱ्यांची प्रेत यात्रा काढणे दुसऱ्यांना रेडे म्हणणं , बायांना वेष्या म्हणन हा सर्व तळतळात तुम्हाला लागला आहे.

    आम्हाला संजय लावताना कारवाई झाली त्यापेक्षा आनंद शिवसेना फोडणाऱ्या त्या संजय राउतांवर कारवाई झाली याचा आनंद थोडा अधिक आहे .

    संजय राऊत यांना जर वाटत असेल की पेढे वाटा तर खरच ही पेढे वाटण्याची वेळ आहे . लोकांना युतीचे सरकार हवे होते .

    आठ आठ नऊ नऊ तास एकदा घरात ED चे लोक घरात गेले की याचा अर्थ असा आहे की ते पूर्ण तयारीनिशी घरात जातात .

    आता जेलमध्ये जाऊन त्या दोन मंत्र्या सोबत पुन्हा युतीच्या गप्पा करेल की काय असे वाटते . दोन मंत्री ऑलरेडी मध्ये आहेत हे तिसरे महाशय तिथे गेले आहेत .

    वाईट एका गोष्टीचं वाटतं की यांनी त्या मातोश्रीला फसवलं . आणि उद्धव साहेबाला बाळासाहेबांना फसवलं , शिवसैनिकाला फसवलं शिवसैनिकांना मी विनंती करेन या माणसापासून सावध राहा . सर्वांचे घर फोडले आहे त्या माणसाला माफ करू नका .

    पेढे वाटण्यासंदर्भात उगाच ह्या माणसांवर पैसे खर्च करण्यासंदर्भात  काय अर्थ नाही.

Published On - Aug 01,2022 6:27 AM

Follow us
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.