पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात, कोणत्या जिल्ह्यात किती जागा?

परीक्षा प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केल्यानंतर महापोर्टलच्या माध्यमातून पहिल्यांदाच भरती होत आहे. मुंबईसाठी (Mumbai police recruitment 2019) सर्वाधिक 1076, तर त्यानंतर पिंपरी चिंचवडसाठी सर्वाधिक 720 जागांसाठी भरती होईल. अपेक्षित जागा नसल्याने अनेक जिल्ह्यातील उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात, कोणत्या जिल्ह्यात किती जागा?

Maharashtra Police Bharti 2019 : राज्यातील लाखो तरुणांचं लक्ष लागलेली पोलीस भरती (Maharashtra Police Bharti 2019) अखेर जाहीर झाली. 3450 जागांसाठी ही भरती होणार असून जिल्हानिहाय जाहिरात झाली आहे. 3 सप्टेंबर 2019 ते 23 सप्टेंबर 2019 या काळात महापरीक्षा पोर्टलवर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. परीक्षा प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केल्यानंतर महापोर्टलच्या माध्यमातून पहिल्यांदाच भरती होत आहे. मुंबईसाठी (Mumbai police recruitment 2019) सर्वाधिक 1076, तर त्यानंतर पिंपरी चिंचवडसाठी सर्वाधिक 720 जागांसाठी भरती होईल. अपेक्षित जागा नसल्याने अनेक जिल्ह्यातील उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

यावेळचा अभूतपूर्व बदल म्हणजे यावेळी लेखी परीक्षा अगोदर होईल आणि पात्र उमेदवारांनाच मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात येईल. दरम्यान, या निर्णयाला विरोधही करण्यात आला होता. कारण, ग्रामीण भागातील या निर्णयामुळे मागे राहतील, असाही आरोप करण्यात आला होता.

लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणीचं स्वरुप

लेखी परीक्षा पूर्वीप्रमाणेच 100 गुणांची असेल, ज्यासाठी 90 मिनिटांचा कालावधी असेल. लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धीमत्ता आणि मराठी व्याकरण या घटकांचा समावेश आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला लेखी परीक्षेत (Mumbai police recruitment 2019) किमान 35 टक्के, तर मागास प्रवर्गातील उमेदवाराला 33 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. लेखी परीक्षेत एका जागेसाठी 10 या प्रमाणे मैदानी चाचणीसाठी संधी दिली जाईल.

मैदानी चाचणीतही मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. मुलांसाठीची मैदानी चाचणी 100 ऐवजी 50 गुणांची होईल. यावेळी मुलांच्या चाचणीत लांबउडी आणि पूलअप्सचा समावेश नसेल. 50 गुणांपैकी 30 गुणांसाठी 1600 मीटर धावणे, 10 गुणांसाठी 100 मीटर धावणे आणि 10 गुणांसाठी गोळाफेक असेल. तर मुलींच्या मैदानी चाचणीत 800 मीटर धावण्यासाठी 30 गुण, 100 मीटर धावणे 10 गुण आणि गोळाफेकसाठी 10 गुण असतील. लेखी परीक्षेतील 100 आणि मैदानी चाचणीतील 50 अशा 150 गुणांपैकी अंतिम निवड केली जाईल.

एसआरपीएफसाठी बदल नाही

राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) आणि भारत राखीव बटालियन (आयआरबी) या जागांसाठी 100 गुणांचीच मैदानी चाचणी होईल. 5 किमी धावणे आणि 100 मीटर धावणे याचाही यामध्ये समावेश आहे. एसआरपीएप आणि आयआरबीसाठी लेखी परीक्षा 100 आणि मैदानी चाचणी 100 या 200 गुणांमधून निवड केली जाईल.

https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice या वेबसाईटवर जिल्हानिहाय जाहिरात पाहता येईल.

कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा?

 1. रत्नागिरी पोलीस भरती 2019 / Ratnagiri Police bharti 66
 2. रायगड पोलीस भरती 2019 / Raigad Police bharti 81
 3. पालघर पोलीस भरती 2019 / Palghar Police bharti 61
 4. सिधुदुर्ग पोलीस भरती 2019 / Sindhudurg Police bharti 21
 5. जालना पोलीस भरती 2019 / Jalna Police bharti 12th Pass 14
 6. नंदुरबार पोलीस भरती 2019 / Nandurbar Police bharti 25
 7. भंडारा पोलीस भरती 2019 / Bhandara Police bharti 22
 8. कोल्हापूर पोलीस भरती 2019 / Kolhapur Police bharti 78
 9. सोलापूर पोलीस भरती 2019 / Solapur Police bharti 76
 10. पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2019 / PCMC Police bharti 720
 11. पुणे रेल्वे पोलीस भरती 2019 / Pune Railway Police bharti 77
 12. पुणे ग्रामीण पोलीस भरती 2019 / Pune Gramin Police bharti 21
 13. पुणे पोलीस भरती 2019 / Pune Police bharti 214
 14. धुळे पोलीस भरती 2019 / Dhule Police bharti 16
 15. जळगाव पोलीस भरती 2019 / Jalgaon Police bharti 128
 16. मुंबई पोलीस भरती 2019 / Mumbai Police bharti 1076
 17. सांगली पोलीस भरती 2019 / Sangli Police bharti 105
 18. सातारा पोलीस भरती 2019 / Satara Police bharti 58
 19. औरंगाबाद पोलीस भरती 2019 / Aurangabad Police bharti 91
 20. नागपूर पोलीस भरती 2019 / Nagpur Police bharti 288
 21. मुंबई रेल्वे पोलीस भरती 2019 / Mumbai Rail Police bharti 60
 22. नवी मुंबई पोलीस भरती 2019 / Navi Mumbai Police bharti 61
 23. ठाणे पोलीस भरती 2019 / Thane Police bharti 12th Pass 100

(यामध्ये नसलेल्या जिल्ह्यांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाईल)

फॉर्म कसा भराल? (Police bharti online form)

https://exams.mahapariksha.gov.in/registrationPolice या वेबसाईटवर गेल्यानंतर उमेदवाराला स्वतःचं अकाऊंट तयार करावं लागेल. अगोदरच अकाऊंट असल्यास युजरनेम आणि पासवर्ड वापरुन लॉग इन करता येईल. रजिस्ट्रेशन करण्यासाठी REGISTER या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर स्वतःचं युजरनेम टाका, त्यानंतर मेल आयडी टाकून पासवर्ड व्हेरीफाय करा. रजिस्टर केल्यानंतर REGISTER यावर पुन्हा क्लिक करा. तुमचं अकाऊंट तयार होईल. पुन्हा तुम्ही होम पेजवर याल. तुम्ही तयार केलेलं युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. यानंतर पुढील सांगितलेली प्रक्रिया पूर्ण करा. तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी तुमचं युजरनेम आणि पासवर्ड अचूकपणे लिहून ठेवा. शिवाय माहिती भरतानाही वाचून खात्री करा आणि मगच माहिती टाका.

 • पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी पात्रता – 12 वी पास
 • पुरुषांसाठी शारीरिक पात्रता – उंची 165 सेंमी, छाती 79 सेंमी (न फुगवता)
 • महिला उमेदवारासाठी शारीरिक पात्रता – उंची 155 सेंमी
 • वयाची अट – 18 ते 28 (आरक्षित वर्गासाठी 5 वर्षांची सूट)
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *