Maharashtra Police | 87 एसपीआरएफ, 30 हजारांवर होमगार्ड तैनात,15 हजाराहून अधिकांवर कारवाई, अनेकांना नोटीस; पोलीस महासंचालकांनी सांगितला प्लान!

सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. एसआरपीएफ आणि होमगार्ड राज्यात तैनात केल्या आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली आहे.

Maharashtra Police | 87 एसपीआरएफ, 30 हजारांवर होमगार्ड तैनात,15 हजाराहून अधिकांवर कारवाई, अनेकांना नोटीस; पोलीस महासंचालकांनी सांगितला प्लान!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 1:38 PM

मुंबईः राज्यातील कायदा व राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) सक्षम असून कोणतीही जातीय तेढ निर्माण झाल्यास आम्ही त्यावर कडक कारवाई करू, असा इशारा पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिला आहे. राज्यात रमजान ईद (Ramadan Eid) आणि अक्षय्य तृतीयेच्या (Akshay Tritiya) पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. राज्यातील लोकांनीही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिला आहे. सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. एसआरपीएफ आणि होमगार्ड राज्यात तैनात केल्या आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली आहे.

’87 एसआरपीएफ कंपनी, 30 हजारावर होमगार्ड तैनात’

समाजात कोणीही जातीय तेढ निर्माण केली तर आम्ही त्यावर कडक कारवाई करू. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. नोटीसा दिल्या आहेत. 87 एसआरपीएफ कंपनी 30 हजारावर होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तसेच 13 हजार जणांना 149 ची नोटीस दिली असून 15 हजार लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. कायद्याची अंमलबजावणी ही पोलिसांची जबाबदारी आहे. कुणीही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्यात येईल.त्यामुळे जनतेला आवाहान करतो, शांतता व सुव्यवस्था राखून पोलिसांना सहकार्य करावं. ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना पोलीस महासंचालकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचा असा प्लॅन सांगितला.

‘राज ठाकरेंवर औरंगाबाद पोलीस कारवाई करतील’

दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होणार का, याबाबत विचारले असता त्यांच्यावरील कारवाईचं काम औरंगाबाद पोलीस आयुक्त करतील . राज ठाकरे यांच्या भाषणाचा अभ्यास करून ही कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.