यवतमाळमध्ये मोदी म्हणाले, सर्व शहिदांना सलाम, बलिदान व्यर्थ जाणार नाही!

यवतमाळ: “दहशतवादी हल्ला करणारे हल्लेखोर कुठेही लपले असतील, तरी त्यांना शोधून काढू. आमच्या सैनिकांना सर्व स्वातंत्र्य दिलं आहे. देशाच्या गुन्हेगारांना शिक्षा कुठे द्यायची, कधी द्यायची, कोण देणार हे सर्व आमचे जवान ठरवतील, असं पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी ठणकावून सांगितंल. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यवतमाळमधील पांढरकवडा इथल्या सभेला मोदींनी संबोधित केलं. त्यावेळी मोदींनी …

यवतमाळमध्ये मोदी म्हणाले, सर्व शहिदांना सलाम, बलिदान व्यर्थ जाणार नाही!

यवतमाळ: “दहशतवादी हल्ला करणारे हल्लेखोर कुठेही लपले असतील, तरी त्यांना शोधून काढू. आमच्या सैनिकांना सर्व स्वातंत्र्य दिलं आहे. देशाच्या गुन्हेगारांना शिक्षा कुठे द्यायची, कधी द्यायची, कोण देणार हे सर्व आमचे जवान ठरवतील, असं पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी ठणकावून सांगितंल. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यवतमाळमधील पांढरकवडा इथल्या सभेला मोदींनी संबोधित केलं. त्यावेळी मोदींनी जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असं सांगितलं.

यावेळी मोदींनी विविध विकासकामांचं उद्घाटन केलं. विकासकामांची माहिती देण्यापूर्वी मोदींनी पुलवामा हल्ल्यातील शहिदांना वंदन केलं. मोदी म्हणाले, “महाराष्ट्राच्या दोन वीरांनी देशासाठी बलिदान दिलं. पुलावामा हल्ल्यात बुलडाण्याच्या दोन जवानांना वीरमरण आलं. मात्र शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. दहशतवादी हल्ला करणारे हल्लेखोर कुठेही लपले असतील, तर त्यांना शोधून काढू, आमच्या सैनिकांना सर्व स्वतंत्र दिलं आहे. देशाच्या गुन्हेगारांना शिक्षा कुठे द्यायची, कधी द्यायची, कोण देणार हे सर्व आमचे जवान ठरवतील”

वाचा: Pulwama Attack Live: सर्वपक्षीय बैठक सुरु, भारत नवा प्लॅन आखणार  

विकासकामांचं उद्घाटन

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत यवतमाळमधील पांढरकवडा इथं विविध विकासमाकांचं उद्घाटन केलं.

मोदी म्हणाले, “काही दिवसांपूर्वी या परिसरातील आदिवासी तरुणांनी एव्हरेस्ट शिखर पार केलं होतं. त्यांच्याशी मी दिल्लीत संवाद साधला होता. त्यावेळी त्यांचं कष्ट, त्यांची मेहनत, त्यांची स्वप्नं पाहून मला यवतमाळ, चंद्रपूरच्या ऊर्जेचा सुखद अनुभव आला होता”

इथली कोलाम जातीचं स्वच्छतेप्रती जो आग्रह आहे, त्याचा उल्लेख मी मन की बात कार्यक्रमात केला होता, चंद्रपुरातील युवकांनी गडकिल्ले स्वच्छ करुन देशातील तरुणांना प्रेरणा दिली, असं मोदींनी नमूद केलं.

आज पांढरकवडा, यवतमाळसाठी शेकडो कोटी विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण होत आहे. यामध्ये गरिबांच्या घरं, रस्ते, रेल्वे, रोजगार, शिक्षणासंबंधी अनेक प्रकल्पांचा समावेश आहे, असं मोदींनी नमूद केलं.

देशाच्या सुरक्षेसह देशाची समृद्धी, विकासासाठी आमचं सरकार कटिब्ध आहे. त्यासाठी विकासाची पंचधारा जसे, शिक्षण, रोजगार, आरोग्य, सिंचन आणि संवाद यावर भर दिला जाईल, असं मोदी म्हणाले.

सरकारी क्षेत्रात येणाऱ्या शेतीपीकांच्या किमान हमीभावात वाढ केली. सरकारने शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत योजना तयार केली. पाच एकरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देण्यात येतील. महाराष्ट्रातील जवळपास दीड कोटी शेतकऱ्यांना याचा थेट लाभ होईल, असं मोदी म्हणाले.

यवतमाळमध्ये जवळपास साडे 14 हजार गरीब कुटुंबांनी आज नव्या घरांत प्रवेश केला. केंद्र सरकारने 2022 पर्यंत सर्वांना पक्कं घर देण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. आतापर्यंत देशभरात दीड कोटी घरं गरिबांसाठी घरं बनवण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं.

संबंधित बातम्या

भारताचा पहिला दणका, पाक ‘डर्टी मनी ब्लॅकलिस्ट’मध्ये, युरोपीयन युनियनची घोषणा  

Pulwama Attack: जावेद अख्तर आणि शबाना आझमींवर कंगणांचं टीकास्त्र  

Pulwama Attack : शहिदांच्या कुटुंबाला कोणत्या राज्याची किती मदत? 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *