Rain Update | राज्यभरातील पावसाची बित्तंबातमी

नाशिकमधील प्रसिद्ध दुतोंडया मारुतीच्या डोक्यावरून पाणी गेले. तर पेणमधील अंतोरे गावातील घरांत पाणी शिरल्यामुळे नागरिकांची सुटका करण्यात आली.

Rain Update | राज्यभरातील पावसाची बित्तंबातमी
Follow us
| Updated on: Aug 04, 2019 | 9:08 PM

[svt-event title=”फोर्टीज हॉस्पिटलमध्ये 5 फूट पाणी” date=”04/08/2019,9:08PM” class=”svt-cd-green” ] कल्याण : फोर्टीज हॉस्पिटलमध्ये 5 फूट पाणी, हॉस्पिटलमध्ये वीज पुरवठा खंडित,जनरेटरही बंद पडला, व्हेंटिलेटरवरील 4 जणांचा जीव धोक्यात, अग्निशमन दल हॉस्पिटलमध्ये दाखल,रुग्णांना रेस्क्यू करून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याच्या तयारीत @CMOMaharashtra [/svt-event]

[svt-event title=”घरातील पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू” date=”04/08/2019,8:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जोरदार पावसाने हाहाकार” date=”04/08/2019,8:32PM” class=”svt-cd-green” ] मुंबई, ठाणे, कल्याण, वसई-विरारमध्ये पावसाचा हाहाकार, अनेक घरं पाण्यात, रायगडमधील कणे गावात पाणी शिरलं, 72 जणांना सुखरुप बाहेर काढलं, नवी मुंबईतही जोरदार पाऊस [/svt-event]

[svt-event title=”5 हजार प्रवासी अडकले” date=”04/08/2019,8:26PM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील पावसामुळे बाहेरगावी जाणाऱ्या अनेक रेल्वे रद्द, 5 हजार प्रवासी मुंबईतील कुर्ला टर्मिनसवर अडकले, कोकणाचाही संपर्क तुटला [/svt-event]

[svt-event title=”हिंजवडीत पुणे-बेंगलोर महामार्गावरील पूल खचला” date=”04/08/2019,8:19PM” class=”svt-cd-green” ] आयटी हब म्हणून ओळखलं जाणाऱ्या हिंजवडीची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे-बेंगलोर महामार्गावर बांधण्यात आलेला पूल खचलाय, मोठ्या भेगाही पडल्या आहेत. मुळा नदीतील पाण्याच्या प्रवाहामुळे ही परिस्थिती उदभवली आहे. पण केवळ दोन ते तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेला हा पूल धोकादायक झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून ठेकेदाराने हा पूल कसा बांधलाय असा प्रश्न विचारला जातोय. [/svt-event]

[svt-event title=”पावसामुळे शाळांना सुट्टी” date=”04/08/2019,8:13PM” class=”svt-cd-green” ] पावसामुळे ठाणे, पुणे, नाशिक, रायगड आणि साताऱ्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर, पाऊस आणि पुराच्या पाण्यात न उतरण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन [/svt-event]

[svt-event title=”कोकण-मुंबईचा संपर्क तुटला” date=”04/08/2019,8:13PM” class=”svt-cd-green” ] मध्य रेल्वेकडून लांबपल्ल्याच्या 57 गाड्या रद्द, अन्य 30 गाड्यांचे मार्ग बदलले, तर कोकण रेल्वेवरही पुढील 12 तास एकही रेल्वे धावणार नाही, पावसामुळे कोकण-मुंबईचा संपर्क तुटला [/svt-event]

[svt-event title=”मध्य रेल्वे 12 तासांनी रुळावर” date=”04/08/2019,8:12PM” class=”svt-cd-green” ] मुंबईत मध्य रेल्वे तब्बल 12 तासांनी हळूहळू रुळावर, रात्री 8 वाजता CSMT वरुन ठाण्याच्या दिशेने पहिली लोकल रवाना, दिवसभर स्टेशनवर अडकलेल्या प्रवाशांना दिलासा [/svt-event]

[svt-event title=”साताऱ्यात उद्या शाळांना सुट्टी” date=”04/08/2019,7:59PM” class=”svt-cd-green” ] सातारा : आपत्कालिन आणि पूरसदृश्य स्थिती लक्षात घेऊन उद्या सोमवार दि.५ ऑगस्ट २०१९ रोजी सातारा जिल्ह्यात ( माण तालुका वगळून ) सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक, महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश [/svt-event]

[svt-event title=”भिंवडीतील उच्चभ्रू वसाहतीत पाणी” date=”04/08/2019,7:50PM” class=”svt-cd-green” ] भिवंडी – 24 तासात झालेल्या मुसळधार पावसात पुन्हा एकदा उच्चभ्रू टाटा आमंत्रण हाऊसिंग काॅम्पलेक्समध्ये पाणी शिरले, भिवंडी कल्याण बायपास राजनोली नाका येथील घटना [/svt-event]

[svt-event title=”मुंबईतून लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द” date=”04/08/2019,7:48PM” class=”svt-cd-green” ] लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द, LTT स्थानकावर प्रवाशांची गर्दी, 5000 प्रवासी अडकले [/svt-event]

[svt-event title=”कोकण- मुंबईचा संपर्क तुटला” date=”04/08/2019,7:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अलिबाग येथील जिल्हा मुख्यालय जलमय” date=”04/08/2019,3:23PM” class=”svt-cd-green” ] अलिबाग येथील जिल्हा मुख्यालय पहिल्यांदाच जलमय झालं आहे. अलिबाग बाजारपेठ, रहिवाशी क्षेत्र, एसटी बस स्थानक परिसरातही पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत [/svt-event]

[svt-event title=”ताम्हिणी घाट पर्यटकांसाठी बंद” date=”04/08/2019,3:20PM” class=”svt-cd-green” ] ताम्हिणी घाट पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. मुळशी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने सध्या मोठ्या प्रमाणात येथे पाणी साचलं आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन पाण्यात अडकलेल्यांना मदत करत आहे. [/svt-event]

[svt-event title=”कसारा स्टेशनवर एक्स्प्रेस अडकल्या” date=”04/08/2019,12:18PM” class=”svt-cd-green” ] कसारा रेल्वे स्थानकात पाणी भरल्याने मुंबई-हैद्राबाद एक्स्प्रेस कसारा स्थानकात उभी, त्यापाठोपाठ सिंहगड, दुरांतो, कोणार्क आणि अमृतसर एक्स्प्रेसही खोळंबल्या [/svt-event]

[svt-event title=”कोकणकन्या कुर्ल्यात अडकली” date=”04/08/2019,12:01PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : मडगांव-सीएसएमटी कोकण कन्या एक्स्प्रेस सात तासांपासून कुर्ला रेल्वे स्थानकावर अडकून, सायनमध्ये पाणी भरल्यामुळे ट्रेन अडकली, प्रवाशांचा खोळंबा [/svt-event]

[svt-event title=”आदित्य ठाकरेंच्या सभेपूर्वी मंडप कोसळला” date=”04/08/2019,11:54AM” class=”svt-cd-green” ] बीड : आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत सभेपूर्वीच मंडप पडला, गेवराई शहरातील शास्त्रीनगर चौकातील घटना, अचानक वादळ सुटल्याने मंडप पडला, मंडपात कोणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली, दुपारी एक वाजता मंडपात सभा आयोजित [/svt-event]

[svt-event title=”नाशिक-मुंबई महामार्ग बंद” date=”04/08/2019,11:43AM” class=”svt-cd-green” ] नाशिक-मुंबई महामार्ग बंद, कसारा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद, दरड हटवण्याचे काम सुरु [/svt-event]

[svt-event title=”सांगली : सांगलीला महापुराचा धोका, कृष्णेची पातळी 40 फूट, सांगलीतील मगरमच्छ कॉलनीत पुराचं पाणी शिरलं” date=”04/08/2019,10:33AM” class=”svt-cd-green” ] सांगली : सांगलीला महापुराचा धोका, कृष्णेची पातळी 40 फूट, सांगलीतील मगरमच्छ कॉलनीत पुराचं पाणी शिरलं. मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट येथील 576 लोकांना स्थलांतरित केलं. वारणा धरणातून 17 हजार तर कोयना धरणातुन साडे 19 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग, तर कृष्णा, वारणा, मोरणा, येरळा या नद्यांना पूर [/svt-event]

[svt-event title=”नाशिक शहरात पूरस्थिती, गोदावरी नदीच्या बाजूला असलेल्या सखल भागात पाणी शिरले” date=”04/08/2019,10:26AM” class=”svt-cd-green” ] नाशिक शहरात पूरस्थिती, गोदावरी नदीच्या बाजूला असलेल्या सखल भागात पाणी शिरले, सराफा बाजारातही मोठ्या प्रमाणात पाणी, मिलिंद नगर मध्ये देखील पावसाचं पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल, महापुराची निशाणी समजल्या जाणाऱ्या नारोशंकराच्या घंटेपर्यंत पाणी पोहोचलं [/svt-event]

[svt-event title=”रायगड : कोकण रेल्वे ठप्प” date=”04/08/2019,10:22AM” class=”svt-cd-green” ] रायगड : कोकण रेल्वे ठप्प, पेण हद्दीतील दुष्मी रेल्वे गेटच्या मागे भूस्खलन होऊन रेल्वे ट्रॅकवर मातीचा ढिगारा आला. त्यामुळे सकाळी 6 .30 वाजल्यापासून राजधानी एक्सप्रेसचा खोळंबा [/svt-event]

[svt-event title=”बारवी धरणाचे दरवाजे उघडणार” date=”04/08/2019,8:19AM” class=”svt-cd-green” ] बदलापुरातील बारवी धरणाचे दरवाजे कुठल्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. उल्हास नदीकाठची गावं आणि शहरी परिसराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”भातसा धरणातून 934 क्युमेक्स विसर्ग प्रवाहित” date=”04/08/2019,8:18AM” class=”svt-cd-green” ] सततच्या पावसामुळे शहापूरजवळच्या भातसा धरणाचे पाच दरवाजे 2.50 मीटर इतके उघडण्यात आले आहेत. भातसा धरणातून सुमारे 934 क्युसेक्स विसर्ग प्रवाहित केला जात आहे. भातसा नदी काठावरील शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगांव पूल, सापगांव आणि इतर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याच्या व दक्षता घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उप जिल्हाधिकारी ठाणे यांनी दिल्या आहेत. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात भिडे पूल पाण्याखाली” date=”04/08/2019,8:18AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात खडकवासला धरणातून 27 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे . मुठा नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर नदीपात्रातील रस्ते पाण्याखाली गेलेत [/svt-event]

[svt-event title=”दुतोंड्या मारुतीच्या डोक्यावरुन पाणी” date=”04/08/2019,8:18AM” class=”svt-cd-green” ] नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या भागात मुसळधार पाऊस झाला. धरण क्षेत्रात पाऊस जास्त असल्याने गंगापूर धरणातून 20 हजार क्युसेक्सने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गोदावरी काठची मंदिर-दुकानं पाण्याखाली गेली. तर दुतोंडया मारुतीच्या डोक्यावरून पाणी गेले. [/svt-event]

[svt-event title=”सांगलीला महापुराचा धोका” date=”04/08/2019,8:17AM” class=”svt-cd-green” ] सांगलीत कृष्णा नदीची पातळी 40 फूटांवर गेली आहे. सांगलीतील मगरमच्छ कॉलनीत पुराचं पाणी शिरलं. मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट येथील 576 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं. वारणा धरणातून 17 हजार तर कोयना धरणातून 19 हजार 500 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. कृष्णा, वारणा, मोरणा, येरळा या नद्यांना पूर आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”पेणमधील अंतोरे गावातील घरांत पाणी शिरलं, नागरिकांची सुटका” date=”04/08/2019,8:17AM” class=”svt-cd-green” ] रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असलेल्या अंतोरे गावात पावसामुळे अनेक घरांत पाणी शिरलं होतं. भरतीची वेळ 1.45 पर्यंत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. पोलीस, महसूल आणि समाजसेवकांच्या सहाय्याने आपात्कालीन यत्रंणेने मदत कार्य करुन गावातील 35 ते 40 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. भोगावती नदी धोक्याच्या पातळीच्या पलिकडे गेल्याने संपूर्ण रात्र नागरिकांनी जागून काढली. रात्रभर पावसाची बॅटिंग चालूच असल्याने संपूर्ण पेण तालुक्यावर पुराचं सावट आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा प्रशासनाने इशारा दिला आहे. रस्त्यावरुन पाणी जात असेल तर वाहनं पुढे नेऊ नका, असं आवाहन करण्यात येत आहे. [/svt-event]

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.