आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आता सॅटेलाईटद्वारे शिक्षण, हजारो विद्यार्थ्यांना दिलासा

मोबाईल नेटवर्क नसल्याने अनेक हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे आदिवासी विकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आता सॅटेलाईटद्वारे शिक्षण, हजारो विद्यार्थ्यांना दिलासा
ऑनलाईन शिक्षण

नंदुरबार : राज्यातील दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आता सॅटेलाईट शिक्षण सुरु करण्यात येणार आहे. मोबाईल नेटवर्क नसल्याने अनेक हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे आदिवासी विकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

विद्यार्थ्यांना सॅटेलाईटच्या माध्यमातून शिक्षण

राज्यात कोरोना काळात शाळा बंद पडले आहे. त्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा आधार घेतला जात आहे. मात्र सातपुड्याच्या दुर्गम भागात मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे आदिवासी भागातील आश्रमशाळा आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. या भागात स्वतंत्र काळापासून कनेक्टिव्हिटी नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना सॅटेलाईटच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री के .सी पाडवी यांनी दिली आहे. धडगाव तालुक्यात खावटी अनुदान आणि धान्य वाटपादरम्यान त्यांनी हे आदेश दिले आहेत.

कोरोना काळात शाळा बंद

राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आण्यासाठी शासकीय आणि अनुदानित आश्रम शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच या भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळाही सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र राज्यात कोरोना काळात शाळा बंद ठेवण्यात आल्या. पण यादरम्यान शिक्षणात खंड पडू नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले.

मात्र यामुळे आदिवासी दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे आता आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी भागात विद्यार्थ्यांसाठी सॅटेलाइट शिक्षण सुरु केले जाणार आहे. यासाठीची तयारीही सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री के .सी पाडवी यांनी दिली आहे .

विद्यार्थ्यांना शैक्षणिक फायदा

आदिवासी दुर्गम भागात शिक्षण घेणाऱ्या सुमारे 5 लाख विद्यार्थ्यांना या सॅटेलाईट शिक्षणाचा फायदा होऊ शकतो. यातून विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्वक शिक्षण मिळू शकते. तसेच यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक फायदा होईल, असेही सांगितले जात आहे.

(Maharashtra remote areas Satellite education now started for tribal students)

संबंधित बातम्या :

VIDEO: राज्याला मुख्यमंत्रीही नाही, प्रशासनही नाही, राज्य आम्हाला द्या, आम्ही वेटिंगवरच आहोत: नारायण राणे

धबधबा पाहायला आलेले बाप-लेक पोहायला उतरले, पुण्यात तिघांचा बुडून मृत्यू

पुण्यात अतिवृष्टीचा फटका, 12 गावं अंधारात, 7 गावांचा संपर्क तुटला, संपूर्ण कोंढरी गाव स्थलांतरीत

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI