Maharashtra school reopen : आता सर्व शाळा पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली, पुढील आठवड्यात महत्त्वाची बैठक

राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक होत आहे. सध्या 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत.

Maharashtra school reopen : आता सर्व शाळा पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली, पुढील आठवड्यात महत्त्वाची बैठक
कोरोनामध्ये अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 5:22 PM

मुंबई : राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक होत आहे. सध्या 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू होणार आहेत. 1 ऑगस्टला ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोनामुळे बंद आहेत. आता लवकरच शाळा सुरू करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाने केल्या आहेत.

आठवी ते बारावीचे वर्ग सुरु 

राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये 15 जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 15 जुलैपासून राज्यातील किती शाळा सुरु झाल्या याची माहिती दिली होती.  15 जुलै रोजी राज्यातील शाळांत इ. 8 वी ते इ. 12 वी पर्यंतचे वर्ग भरवण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यातील एकूण शाळांची संख्या व त्यापैकी किती शाळा उघडल्या तसेच जिल्ह्यातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या व त्यापैकी किती विद्यार्थी शाळेत आले, याची माहिती ट्विटरवरुन शेअर केली आहे.

59747 शाळा उघडल्या

राज्यात एकूण शाळांची संख्या 19997 असून त्यापैकी 5947 शाळा उघडण्यात आल्या. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची एकूण संख्या 45,07,445 असून त्यापैकी 4,16,599 विद्यार्थ्यांनी शाळेत आपली हजेरी नोंदवली, असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

या जिल्ह्यातील शाळा बंद

शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे, सिंधुदुर्ग, हिंगोली, मुंबई, नागपूर, नाशिक, पालघर, परभणी, रायगड, सातारा, मुंबई मनपा या ठिकाणी एकही शाळा सुरु झालेली नाही. सर्वाधिक शाळा कोल्हापूरमध्ये 940 तर औरंगाबादमध्ये 631 शाळा सुरु झाल्या आहेत.

81 टक्के पालकांचा शाळा सुरु करण्याला कौल

कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीच्या वर्गाबरोबरच अन्य वर्ग सुरू करण्यासाठी 81 टक्के पालकांनी होकार दर्शवला आहे. आवश्यक त्या खबरदारी घेऊन शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याला जवळपास 5 लाख 60 हजार 819 पालकांनी सहमती दर्शवली असल्याचं दिनकर टेमकर यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर समोर आली आहे.

संबंधित बातम्या  

School Fee: ठाकरे सरकारचा विद्यार्थी पालकांना मोठा दिलासा, खासगी शाळांची 15 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय  

 मोठी बातमी, कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार, ठाकरे सरकारकडून शासन निर्णय जारी

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.