राज्यात गारठा, तीन जणांचा मृत्यू

सचिन पाटील

सचिन पाटील | Edited By:

Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी तापमानात घट झाल्याचे दिसत आहे. एकीकडे गुलाबी थंडीची मजा लुटण्यासाठी लोक घराबाहेर पडत आहे तर दुसरीकडे कडाक्याच्या थंडीमुळे रस्त्यावर झोपणाऱ्या बेघरांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. नुकतेच कोल्हापूर आणि अकोल्यात तिघांचा थंडीमुळे मृत्यू झाला आहे. मृतांमधील हे तिघेही 60 ते 65 वयोगटातील होते. नाशिक, धुळे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि […]

राज्यात गारठा, तीन जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी तापमानात घट झाल्याचे दिसत आहे. एकीकडे गुलाबी थंडीची मजा लुटण्यासाठी लोक घराबाहेर पडत आहे तर दुसरीकडे कडाक्याच्या थंडीमुळे रस्त्यावर झोपणाऱ्या बेघरांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. नुकतेच कोल्हापूर आणि अकोल्यात तिघांचा थंडीमुळे मृत्यू झाला आहे. मृतांमधील हे तिघेही 60 ते 65 वयोगटातील होते.

नाशिक, धुळे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी गारठा वाढलेला आहे. तर राज्यातील सर्वात जास्त कमी 6.6 अंश सेल्सिअस तापमान निफाडमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

राज्यातील वाढलेल्या गारठ्यामुळे काही ठिकाणी पिकांना पुरक असे वातावरण निर्माण झाले आहे, तर काही ठिकाणी धुक्यांमुळे रब्बी पिकांचे नुकसान होत आहे. राज्यातील प्रत्येक ठिकाणी धुक्यांची चादर पसरली आहे. याचा त्रास रस्त्यावरील वाहनांना तसेच दम्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांना होत आहे.  या गुलाबी थंडीत मोठ्या प्रमाणात लोकांनी थेट चहाची दुकांन गाठले आहे. हुडहुडी घालवण्यासाठी चहा पिऊन थंडीची मजा घेत आहेत.

अकोला

अकोल्यातील धिंग्रा चौकात आज सकाळी एका रिक्षा चालकाचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृत्यू थंडीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. अंदाजे 65 वर्षीय हा इसम रिक्षा आणि हाथठेला चालवून आपला उदारनिर्वाह करायचा आणि रस्त्यावर जागा मिळेल तिथे झोपायचा. आज सकाळी त्याचा मृतदेह आढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या इसमाचा मृत्यू थंडीमुळे झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

नाशिक

राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये नोंद करण्यात आली आहे. 6.6 अंश सेल्सिअस तापमान नाशिक शहरात झाले आहे. प्रचंड गारठा पसरल्यामुळे लोक दिवसांही स्वेटर आणि शेकोटीचा आधार घेत आहेत.

वाशिम

दिवसेंदिवस वातावरणात होत असलेल्या बदलामुळे वाशिम जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यातच आज जिल्ह्यात सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली आहे. यामुळे रब्बीतील ऐन मोसमात हरबरा आणि गहू पिकांवर परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. तसेच सकाळच्या धुक्यामुळे वाहनांना दूरपर्यंत दिसत नसल्याने वाहन चालकास त्रास होत असल्याचे चित्र आहे.

सोलापूर

सोलापूर शहरांसह ग्रामीण भागतही कडाक्याची थंडी पडली आहे. येथील तापमान 14 अंशावर गेले आहे. तसेच जिल्ह्यात धुक्यांचेच लोट पाहायला मिळत आहे. तर पंढरपूर शहरात पहाटेपासून धुके पडले आहे.

वर्धा

वर्ध्यातही मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीने सारेच हैराण झाले आहेत. आज तर सकाळी वर्ध्याचे तापमान 10.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. सकाळी असणाऱ्या थंडीनंतर सुसाट वाऱ्यासह थंड हवेमुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. थंडीतून बचावासाठी नागरिक दिवसातही शेकोटी लाऊन बचाव करत आहे. तसेच थंडीपासून बचावाचे कपडे घालून नागरिक घराबाहेर पडत आहे. शहरात चहाच्या दुकानांवरही नागरीकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

भंडारा

भंडारा शहरांत आज सकाळपासून दाट धुकं पसरली असून वाहन चालकांना वाहनाचे दिवे सुरू ठेऊन वाहन चालवावे लागत आहेत. तसेच सकाळच्या वेळी फिरायला जाणाऱ्या लोकांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. झाडांच्या खाली सडा  शिंपल्यासारखे दवबिंदू पडले होते.

धुळे

धुळे शहरातील हवामानात बदल झाले आहेत. काल तापमान हे 6.8 अंश सेल्सिअस होते तर आजचे तापमान हे 5.0 होते. या थंडीमुळे शेतकऱ्यांच्या गहू, हरबरा पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. अस धुळे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठता डॉ. अशोक मुसमाडे यांनी सांगितले.

औरंगाबाद

औरंगाबादमध्ये थंडीचा तडाखा वाढला आहे. जिल्ह्यात सर्वत्र धुक्याची चादर पाहायला मिळाली, धुक्याचा परिणाम पिकांवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इतकंच नाही तर वाढत्या थंडीचा सर्वसामान्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

नागपूर

उन्हाळ्यात तापमानाच्या उच्चांक गाठणारे नागपूरही या थंडीत गारठलेले आहे. तसेच सर्वत्र ढगाळ वातावरण आणि धुक्यांची चादर पसरली आहे.

राज्यातील या थंडीमुळे कोल्हापूर आणि अकोल्यात अशा एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू कडाक्याचा थंडीमुळे झाले असल्याचं बोललं जात आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे सरासरी तापमान

 • वाशिम : तापमान कमाल -26.00, किमान -11.00
 • अकोला – कमान  12.1 अंश सेल्सिअस
 • नागपूर – कमान तापमान 13 अंश सेल्सिअस
 • पुणे – कमान तापमान 15.0 अंश सेल्सिअस
 • वर्धा – कमान तापमान 10.5 अंश सेल्सिअस
 • अमरावती – कमान तापमान 12 अंश सेल्सिअस
 • नांदेड – कमान तापमान 11 अंश सेल्सिअस
 • नाशिक निफाड – कमान तापमान 6.6 अंश सेल्सिअस
 • धुळे – कमान तापमान 7 अंश सेल्सिअस
 • चंद्रपूर –  कमान तापमान 10.4 अंश सेल्सिअस
 • सातारा-  कमान तापमान 13.2 अंश सेल्सिअस
 • महाबळेश्वर- कमान तापमान 10.1 अंश सेल्सिअस
 • नाशिक – कमान तापमान  7.9 अंश सेल्सिअस
 • सोलापूर – कमान तापमान 14 अंश सेल्सिअस
 • बुलडाणा – कमान तापमान  18.0 अंश सेल्सिअस
 • परभणी – कमान तापमान 10 अंश सेल्सिअस
 • रायगड – कमान तापमान – 18 अंश सेल्सिअस
 • कोल्हापूर – कमान तापमान 19° अंश सेल्सिअस

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI