Breaking News | राज्यात 6 हजार शिक्षण सेवकांच्या भरतीचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील, वर्षा गायकवाडांनी दिली आनंदाची बातमी

राज्यात 6 हजार शिक्षण सेवकांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल, प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश

Breaking News | राज्यात 6 हजार शिक्षण सेवकांच्या भरतीचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील, वर्षा गायकवाडांनी दिली आनंदाची बातमी
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 9:34 PM

मुंबई : राज्यात तब्बल 6 हजार 100 शिक्षण सेवकांची आता लवकरच भरती होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सध्या लागू असलेल्या पदभरती बंदीतून शिक्षण सेवकांची भरती वगळण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता शिक्षण सेवकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. (maharashtra state government will soon recruit 6 thousand teachers announced by varsha gaikwad)

शिक्षण सेवकांची सुमारे 6100 रिक्त पदं भरली जाणार

राज्यात एमपीएससी तसेच इतर पदभरतीवरुन चांगलेच राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एमपीएससी आयोगामार्फत संबंधित सर्व रिक्त जागा भरण्याची घोषणा केली. सरकारच्या या घोषणेनंतर शिक्षण क्षेत्रातील रिक्त जागासुद्धा भरल्या जाव्यात या मागणीने जोर धरला. याच पार्श्वभमीवर राज्य सरकारने प्रलंबित असलेल्या राज्यातील तब्बल 6 हजार 100 शिक्षण सेवकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत आता स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित, अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील, शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड.कॉलेज) शिक्षकांची सुमारे 6100 रिक्त पदं भरली जाणार आहेत.

प्रक्रिया पूर्ण करण्याचा शिक्षण आयुक्तांना निर्देश 

मिळालेल्या माहितीनुसार मागील कित्येक दिवसांपासून शिक्षण सेवाकांच्या पदभरतीचा प्रश्न प्रलंबित होता. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या भरती प्रक्रियेला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यांनी शिक्षण सेवकांच्या भरती प्रक्रियेला सध्या लागू असलेल्या पदभरती बंदीतून वगळण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यानंतर आता ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

इतर बातम्या :

Eknath Khadse ED Inquiry : एकनाथ खडसेंची ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी, सहकार्य करण्याचं खडसेंचं आश्वासन

BMC च्या दोन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा घोटाळा, पत्नीच्या नावे कंपनी बनवून कोट्यवधींची कंत्राटे मिळवली

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास योजना कुणासाठी? मुंबई लोकल कधी सुरु? आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.