खोपोली: गेल्या काही महिन्यांपासून राज्यावर कोरोनाचं संकट आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन असल्यानं अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले, तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केल्याचीही माहिती समोर आली. परंतु कोरोनाच्या लॉकडाऊननंतर राज्यात भरघोस पगारवाढ देण्यात महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाला यश आलंय. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी ही माहिती दिलीय. सचिन अहिर यांनी खोपोलीत पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. (Maharashtra State National Workers Union succeeds in giving huge salary increase to the workers this year)
खोपोलीतील महिंद्रा सँनियो आणि टाटा स्टील या खोपोलीतील उद्योगामधील कामगारांची भरघोस पगारवाढ करण्यात आलीय. टाटा स्टीलमध्ये 900 कामगारांना 8250 रुपये, तर महिंद्रा सँनियोमध्ये 320 कामगारांना एरियर्सपोटी 21 महिन्यांचे 63 हजार एकत्र आणि 8 हजार ते 8800 रुपये महिना पगार वाढीसह इतर सुविधा देण्यात यश आलंय. गेल्या काही दिवसांपूर्वी कामगारांना घरं मिळवून देण्यासाठी सफाई कामगारांना त्यांच्या मालकी हक्काचे घर मिळवून देण्यासाठी म्हाडा, मनपा आणि सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे एकत्रित प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत सर्वाना घर देण्याची घोषणा केली होती. यानंतर देशभरातील सर्वच राज्यात मोठ्या प्रमाणात सरकारी आणि खाजगी गृहनिर्माण उद्योगात वेग आला. महाराष्ट्रात सर्वाधिक घरे बांधण्यात आली आहेत. मात्र मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगरासह संपूर्ण राज्यातील गरीब, सर्वसामान्यांना नियमानुसार त्यांच्या हक्काचे घर मिळावे, यासाठी रामदास आठवले आक्रमक झाले आहेत. या लोकांच्या घरांचा प्रश्न निकाली निघावा म्हणून सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला होता.
राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी बीडीडी प्रकल्प रखडला असल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केल्या होत्या. तर खार जव्हारनगर आंबेवाडी शिवालिक बिल्डरने घरे दिली नाहीत. या रहिवाशांना बिल्डर भाडे देत नाही घरे ही देत नाही असे ही प्रश्न बैठकीत आले. तर म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना हक्काची घरे म्हाडाने द्यावी, पेन्शन द्यावी असा प्रश्न कामगार संघटनांनी मांडला होता. मुंबईतील सफाई कामगारांना मोफत घर मिळण्यासाठीची योजना तात्काळ राबविण्यात यावी, मुंबईतील आणि इतर ठिकाणच्या रखडलेल्या झोपू योजना मार्गी लावण्यात याव्या. धारावीचा रखडलेला पुनर्विकासाला तात्काळ गती द्यावी. तसेच म्हाडातील विविध मंडळातील गृहनिर्माण योजना मार्गी लावाव्यात. अडचणीत असलेलया गृहनिर्माणाबाबत अनेक प्रश्न या बैठकीत मांडण्यात आल्या. यावर विविधांगाने चर्चा झाली होती.
संबंधित बातम्या
मुंबई मनपातील सफाई कामगारांना मालकी हक्काची घर द्या, रामदास आठवलेंची मागणी
Maharashtra State National Workers Union succeeds in giving huge salary increase to the workers this year