महाराष्ट्रात मोठं जल सकंट, धरणातील अर्धा पाणीसाठा संपला

नागपूर: महाराष्ट्र सध्या कधी नव्हे इतक्या भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 47 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच धरणं निम्मी रिकामी झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 20 टक्के कमी आहे. मराठवाड्यात सध्या अवघा 18 टक्के तर पूर्व विदर्भात अवघा 25 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या महिनाभरात राज्यातील धरणातील 06 टक्के पाणीसाठा घटला आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. केवळ 47 टक्के पाण्यात सहा महिने महाराष्ट्राची तहान कशी […]

महाराष्ट्रात मोठं जल सकंट, धरणातील अर्धा पाणीसाठा संपला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

नागपूर: महाराष्ट्र सध्या कधी नव्हे इतक्या भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 47 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच धरणं निम्मी रिकामी झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 20 टक्के कमी आहे. मराठवाड्यात सध्या अवघा 18 टक्के तर पूर्व विदर्भात अवघा 25 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या महिनाभरात राज्यातील धरणातील 06 टक्के पाणीसाठा घटला आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. केवळ 47 टक्के पाण्यात सहा महिने महाराष्ट्राची तहान कशी भागणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

महिन्याभरात महाराष्ट्रातील प्रमुख धरणातील पाणी साठ्यात सहा टक्के घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांवरच मोठे संकट उभं राहणार आहे. दुष्काळामुळे विदर्भासह, मराठवाड्यात अत्यंत वाईट परिस्थिती आहे.  पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांनी जीव दिला आहे, तर अनेकांचे बळी गेले आहेत.

दोन वर्षापूर्वीही अशीच परिस्थिती उद्भवली होती. लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केल्याचं अद्याप सर्वांच्या लक्षात आहे. यंदा त्यापेक्षा बिकट परिस्थितीची चिन्हं आहे. लातूरमध्ये 1 जानेवारीपासून दहा दिवसाआड पाणी सोडण्यात येणार आहे. जशी लातूरची परिस्थिती आहे, तशीच उर्वरित महाराष्ट्राची आहे. बहुतेक जिल्ह्यातील नद्यांची पाणीपातळी खालावत आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट उभं राहणार आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.