स्पेशल रिपोर्ट : महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यादीही ठरली

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात महायुती आघाडी घेण्याची शक्यता आहे. महायुतीची 100 जणांची यादी तयार असून, अजित पवारांच्या संभाव्य यादीची चर्चा सुरु झाली आहे.

स्पेशल रिपोर्ट : महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यादीही ठरली
महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित
Follow us
| Updated on: Sep 13, 2024 | 10:44 PM

महायुतीची 100 जागांची यादी तयार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळालीय. गणेशोत्सव संपल्यानंतर, 100 जागांची यादी महायुतीकडून जारी केली जाणार आहे. ज्यात, भाजपचे 50 उमेदवार, शिंदेंच्या शिवसेनेचे 25 उमेदवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 25 उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत, जागा वाटपावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 3-4 बैठका झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा नुकतेच मुंबईत येऊन गेले आहेत. त्यामुळे ज्या जागांवर वाद नाही, तसेच स्टँडिंग आमदारांची उमेदवारी या महिन्याच्या अखेरपर्यंत जाहीर केली जाईल. त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाव्य 25 उमेदवार ठरले असून बारामतीतून अजित दादाच लढणार असल्याची माहिती आहे.

बारामतीतून अजित पवार, येवल्यातून छगन भुजबळ, आंबेगावातून दिलीप वळसे पाटील, परळी धनंजय मुंडे, कागलमधून हसन मुश्रीफ, दिंडोरीतून नरहरी झिरवाळ, रायगडमधून पुन्हा एकदा अदिती तटकरे, अहमदनगमधून संग्राम जगताप, खेडमधून दिलीप मोहिते पाटील संभाव्य उमेदवारांच्या यादीत आहेत. अहेरीतून धर्मराव बाबा आत्राम, कळवणमधून नितीन पवार, इंदापूरमधून दत्ता मामा भरणे, उदगीर- संजय बनसोडे, पुसद इंद्रनील नाईक, वाईतून मकरंद आबा पाटील, पिंपरीतून अण्णा बनसोडे, मावळमधून सुनिल शेळके, अमळनेरमधून अनिल पाटील, जुन्नरमधून अतुल बेनके, वडगाव शेरीतून सुनिल टिंगरे हे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आहेत. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागावाटपाबाबत अद्याप ठरलं नाही, अंतिम शिक्कामोर्तब झाल्यावर यादी येईल, असं म्हणाले.

राष्ट्रवादीच्या विरोधात लढलेल्या भाजप उमेदवारांचं काय होणार?

मात्र, अजित पवारांच्या स्टँडिंग आमदारांच्या जागी 2019मध्ये भाजपकडून लढलेल्या नेत्यांचं काय?, हाही प्रश्न आहे. जसं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य यादीत इंदापुरात आमदार दत्ता मामा भरणेंचं नाव आहे. इथं भाजपकडून हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत. उमेदवारी मिळणार नाही, या शंकेतून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं कळतंय. मावळमधून आमदार सुनिल शेळकेंचं संभाव्य यादीत नाव आहे. इथून भाजपच्या बाळा भेगडेंचं काय होणार? हा प्रश्न आहे.

वडगाव शेरीतून आमदार सुनिल टिंगरेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. इथं भाजपचे जगदीश मुळीक 2019 मधून लढले होते. अहेरीतून धर्मराव बाबा आत्रामांनाच तिकीट मिळेल, त्यामुळे 2019मध्ये पराभूत झालेल्या राजे अमरीशराव आत्रामांचं काय होणार? याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचं लक्ष आहे. उदगीरमधून आमदार संजय बनसोडेंचं संभाव्य यादीत नाव आहे. इथे 2019 मध्ये पराभूत झालेल्या भाजपच्या अनिल कांबळेचं लक्ष लागलंय.

अंतर्गत सर्व्हेवरुन राऊतांचा भाजपवर निशाणा

दुसरीकडे भाजपच्या अंतर्गत सर्व्हेवरुन संजय राऊतांनी महायुती विशेषत: भाजपवर जोरदार टीका केलीय. संजय राऊतांच्या दाव्यानुसार भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत विदर्भातील एकूण 62 जागांपैकी, भाजपला 18 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 5 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 जागा निवडून येवू शकतात. म्हणजेच महायुतीला 25 जागा मिळतील, असा भाजपचाच अंतर्गत सर्व्हे असल्याचं राऊतांचं म्हणणं आहे. 2019 मध्ये भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती असताना युतीला 31 जागा मिळाल्या होत्या. ज्यात भाजपला 27 आणि शिवसेनेला 4 जागा जिंकता आल्या. मात्र आता भाजपला प्रत्यक्ष 12-13 जागाच मिळतील असं राऊतांनी म्हटलंय.

आता 2024च्या राजकीय परिस्थितीत थ्री सिक्स्टी ड्रिगी अंतर आहे. सध्या 2 शिवसेना आहेत आणि 2 राष्ट्रवादी आहेत. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणांमुळे सहाही पक्षात, इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जागा वाटप आणि उमेदवारांची घोषणा झाल्यावर उड्या मारणाऱ्या नेत्यांचाही मोठा पोळा फुटेल.

टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा.
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा.
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र.
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय.
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्....
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्.....
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?.
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक.
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव.
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती.
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास.