आठवडाभरात 14 लाख जमवले, महिला बचत गटांकडून पूरग्रस्तांसाठी मदत

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटातील महिलांनी एका आठवड्यात 14 लाख 21 हजार रुपयांची रक्कम गोळा केली आहे. महिला बचत गटातील महिलांसह महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनीही यासाठी मदत दिली आहे.

आठवडाभरात 14 लाख जमवले, महिला बचत गटांकडून पूरग्रस्तांसाठी मदत
Follow us
| Updated on: Aug 28, 2019 | 8:21 AM

मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) मार्फत (Mahila Arthik Vikas Mahamandal) स्थापन झालेल्या महिला बचत गटांतील (Mahila Bachat Gat) महिलांनी स्वकमाईतील पैशांची बचत करुन कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना (Kolhapur Sangli Flood) तब्बल 14 लाख 21 हजार 228 रुपयांची मदत केली आहे. हा निधी उद्योगमंत्री सुभाष देसाई, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज (28 ऑगस्ट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला जाणार आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी उद्भवलेल्या भीषण पूरस्थितीमुळे या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या ठिकाणच्या नागरिकांसाठी विविध सामाजिक संघटना, राज्य शासन, स्वयंसेवी संस्थेद्वारे मदत दिली जात असून महिला बचत गटांनीही त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटातील महिलांनी एका आठवड्यात 14 लाख 21 हजार रुपयांची रक्कम गोळा केली आहे. महिला बचत गटातील महिलांसह महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनीही यासाठी मदत दिली आहे. विशेष म्हणजे यात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महिला बचत गटातील महिलांकडून कोणत्याही प्रकारचा निधी गोळा करण्यात आलेला नाही.

बचत गटातील महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी सहयोगिनी, व्यवस्थापक, लेखापाल, समन्वयक यांच्यासह महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना योगदान देत पूरग्रस्तांना मदतीचा हात देत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनीही आपले एक महिन्याचे मानधन कोल्हापूर सांगली पूरग्रस्तांसाठी दिले आहे.

यासोबतच महिला आर्थिक विकास महामंडळाने ओएनजीसी सोबत 9 लाख रुपयांचे साहित्य पाठवले. यामध्ये चार हजार किलो तांदूळ, चार हजार किलो पीठ, दोन हजार किलो तूर दाळ यांसह इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय मसाला, हळद इत्यादी गोष्टी पुरवल्या गेल्या आहेत. हे सर्व साहित्य दोन ट्रकद्वारे गरजुंना पुरवण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.