दादासाहेब मुंडेना मारहाण करणाऱ्या टोळीचा म्होरक्या सापडला!

बीड : बीडमधील भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला म्हणून मुंडे समर्थकांनी काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांना मारहाण केली होती. दोन दिवसांनंतर मुख्य आरोपी स्वप्निल गलधर यांसह तीन आरोपींना औरंगाबाद येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून दुसरा मुख्य आरोपी संतोष राख अद्याप फरार …

दादासाहेब मुंडेना मारहाण करणाऱ्या टोळीचा म्होरक्या सापडला!

बीड : बीडमधील भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला म्हणून मुंडे समर्थकांनी काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांना मारहाण केली होती. दोन दिवसांनंतर मुख्य आरोपी स्वप्निल गलधर यांसह तीन आरोपींना औरंगाबाद येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून दुसरा मुख्य आरोपी संतोष राख अद्याप फरार आहे.

बीडमधील भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी उमेदवारी अर्जातील प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत, अपक्ष उमेदवार कालिदास आपेट आणि काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे आक्षेप नोंदवला होता. त्याची सुनावणी बुधवारी होती. दादासाहेब मुंडे हे उमेदवार नसल्याने त्यांचा आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला होता. मात्र मुंडे जसे जिल्हाधिकारी कचेरीच्या बाहेर आले, तसेच त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

याप्रकरणी दादासाहेब मुंडे यांनी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मुख्य आरोपी स्वप्निल गलधर, संतोष राख यासह तब्बल 25 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. दोन दिवसांनंतर मुख्य आरोपी स्वप्निल गलधर आणि त्याच्या तीन साथीदाराला औरंगाबाद येथून बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. तर दुसरा मुख्य आरोपी संतोष राख अद्याप फरार आहे.

मध्यरात्री आवळल्या मुसक्या

काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांना मारहाण करुन सर्वच आरोपी फरार झाले होते. पहिल्याच दिवशी एकाला अटक झाली होती. मात्र मुख्य आरोपी कुठे आहेत, याचा शोध लागत नव्हता. स्वप्निल गलधरसह तिघे जण औरंगाबाद येथे असल्याची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे आणि त्यांच्या टीमने मध्यरात्री आरोपींना ताब्यात घेवून बीडला आणले. दरम्यान संतोष राख याला लवकरच अटक करण्यात येईल अस पोलिसांनी सांगितले.

अटक आणि जामीन
दादासाहेब मुंडे यांना मारहाणप्रकरणी स्वप्निल गलधर यांच्यासह सात जणांना अटक झाली होती. मात्र दाखल झालेले गुन्हे हे जामीनपात्र असल्याने, स्वप्निल गलधर यांच्यासह सातही जणांना शिवाजी नगर पोलिस ठाण्यातूनच जामीन मंजूर करण्यात आला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *