नागपुरात हॉस्पिटलच्या इमारतीला भीषण आग

नागपूर: नागपुरातील किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीला भीषण आग लागली. या आगीमुळे इमारतीत अनेकजण अडकल्याची भीती आहे. मोहननगर परिसरात ही इमारत आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.  आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु असून, आगीत अनेक जण अडकल्याची भीती आहे. या आगीनंतर अनेकांना इमारतीतून बाहेर काढण्यात आलं. बांधकाम सुरु असलेल्या या इमारतीत आगीचं थैमान …

नागपुरात हॉस्पिटलच्या इमारतीला भीषण आग

नागपूर: नागपुरातील किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीला भीषण आग लागली. या आगीमुळे इमारतीत अनेकजण अडकल्याची भीती आहे. मोहननगर परिसरात ही इमारत आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.  आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु असून, आगीत अनेक जण अडकल्याची भीती आहे. या आगीनंतर अनेकांना इमारतीतून बाहेर काढण्यात आलं. बांधकाम सुरु असलेल्या या इमारतीत आगीचं थैमान पाहायला मिळालं.

“या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आग लागली. आगीवर सध्या नियंत्रण मिळवलं आहे. मात्र आगीपासून वाचण्यासाठी काही कामगारांनी वरच्या मजल्यावर जाऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला”, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.

.

ही इमारत नवी आहे, तीचं बांधकाम सुरु आहे. त्यामुळे या इमारतीत मजूर काम करत होते. आगीमुळे प्रचंड धूर होऊन, ते कामगार या इमारतीत अडकले. मात्र हळूहळू या कामगारांना बाहेर काढण्यात येत आहे, अशी माहिती भाजप आमदार गिरीश व्यास यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *