साताऱ्यात पुणे बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

पुणे-बंगळुरु महामार्गावर (Pune Bengaluru Highway) ट्रक आणि ट्रॅव्हलमध्ये भीषण अपघात (Road Accident) झाला. या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला.

साताऱ्यात पुणे बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

सातारा: पुणे-बंगळुरु महामार्गावर (Pune Bengaluru Highway) ट्रक आणि ट्रॅव्हलमध्ये भीषण अपघात (Road Accident) झाला. या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला. ट्रॅव्हलमधील इतर 16 प्रवासी जखमी झाले. साताऱ्यातील (Satara) राष्ट्रीय महामार्गावर डी-मार्टजवळ हा अपघात झाला. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुरुवारी (12 सप्टेंबर) सकाळी पावणे सहाच्या सुमारास पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर म्हसवे गाव फाट्याजवळ ट्रक आणि ट्रॅव्हलची भीषण धडक झाली. पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने सोयाबीन घेऊन जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून आलेल्या ट्रॅव्हलने जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की ट्रॅव्हलचा पुढील बाजुचा भाग पूर्ण चक्काचूर झाला. यात ट्रॅव्हलमधील ड्रायव्हरसह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. इतर 16 प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. शिवेंद्रराजे ट्रेकर्स यांच्या मदतीने जखमींना तात्काळ ट्रॅव्हल्समधून बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

महामार्गांवर होणाऱ्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वाहतूक नियम न पाळणे हेही यातील एक कारण मानले जात आहे. याला आळा बसण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवा मोटार वाहन कायदा देखील आणला आहे. मात्र, अजूनही त्याची पुरेशी अंमलबजावणी होणे बाकी आहे. त्यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीसह अपघातांच्या संख्येत काही घट होणार का हेही पाहावे लागणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *